Friday, 25 January 2013

आम्ही कोण म्हणुनि काय पुससी……


आम्ही कोण म्हणुनि काय पुससी……

आम्ही कोण म्हणुनि  काय पुससी,
आम्ही  असू लाडके !

देवाचे दिधले ,असे जग तये,
आम्हास खेळावया !!

विश्वी या प्रतिभाबले विन्चरतो
चोहीकडे लीलया !!!

दिक्कालातुनी आरपार आमुची  द्रुष्टि,
पहाया शके !!!!

सारे ही बडिवार येथील पहा ,
आम्हा पुढे फिके !!!!!

ही केशवसुतांची कविता शाळेत असताना ,तुम्ही वाचली असेल. कवितेचे पाठान्तरहि केले असाल. कवितेचे रसग्रहणही केले असाल.

'जे न देखे रवि, ते देखे कवि 'अशा अर्थाची ती कविता होती.
आज पंचवीस / तीस हुन  अधिक वर्षांनी  ती कविता पुन्हा वाचनात आली आणि प्रतिभेचा वेगाळाच अर्थ ध्यानी आला. माझासाठी सारी कविताच बदलुन गेली .

आम्ही कोण म्हणून काय आमची ओळख मागता ……

आम्ही असू लाडके ,लाडके म्हणजे आनंदी ,प्रसंन्न ,सहज अणि ही सारी सृष्टी,
म्हणजे परमेश्वराने निर्माण केलेल्या जगात ,आम्ही कुठेही क्रीडा करू शकतो.

हया जगात, विश्वात कुठेही प्रतिभाबले म्हणजे Creativity ने , कार्यरत  चैतन्याने,सृजनशीलतेने  चोहीकडे लीलया संचार करतो.

दिक्कालातून स्थळ आणि काळाच्या अतीत ,माझी द्रुष्टी जाते आणि विश्वातील, संसारातील जगातील, सर्व सुख, श्रीमंती अर्थहीन होते असे आध्यात्मिक तत्वज्ञान सोप्या शब्दात सांगणारी हि कविता फारच वेगळ्या अर्थाने मला समजली.
Enlightened  झालेल्या आत्मज्ञानियाचे शब्द आहेत ते.

माझासारख्या एका ब्रह्मविद्येच्या अभ्यासाकाचा विचार मी तुमच्याशी share केला . 

अजित भिडे