माझी एक मैत्रीण आहे,
हुशार
आहे, अभ्यासू आहे.तत्वज्ञानाचा
चांगला अभ्यास आहे. पत्नजलि योग सूत्रावर प्रभुत्व आहे.ती वैराग्य विषयावर
प्रबंध लिहित आहे. मला तिचे कौतुक आहे.मनात विचार आला,वैराग्य आणि अभिनिवेश या दोन गोष्ठी
वेगळ्या आहेत.अभिनवेश म्हणजे जगण्याची इच्छया.पुस्तकातले वैराग्य वेगळे असत ,शांत मोकळ्या मनाने विचार करत
होतो, तेव्हा जे मनाला स्पर्शून गेले ते
सांगतो.
आमच्या कडे पेपर टाकायला एक मल्याळी माणूस येत असे.साधा सज्जन माणूस होता.
दहा बारा वर्ष पेपर टाकत असे.एक दिवस दुसराच माणूस पेपर टाकत होता.मी सहज विचारले नायनार कुठे गेला.तो म्हणाला ,'गाव गया था वहा गुजर गये'.मला धक्काच बसला.त्याची चवथीत शिकणारी मुलगी एकेकी अनाथ झाली. हातवर पोट असणारी कितीतरी जीव नियतीचा आघात सहन करत केविलवाणे जीवन जगात असतात.
दहा बारा वर्ष पेपर टाकत असे.एक दिवस दुसराच माणूस पेपर टाकत होता.मी सहज विचारले नायनार कुठे गेला.तो म्हणाला ,'गाव गया था वहा गुजर गये'.मला धक्काच बसला.त्याची चवथीत शिकणारी मुलगी एकेकी अनाथ झाली. हातवर पोट असणारी कितीतरी जीव नियतीचा आघात सहन करत केविलवाणे जीवन जगात असतात.
आपणास जरासा ताप आला, खोकला झाला कि आपण डॉक्टरकडे जातो, रक्त तपासतो.अधिक काही असेल तर
एक्सरे,सोनोग्राफी ,कार्डोओग्रम काढतो.परवाच बातमी कानावर आली, आमचे एक नातेवायिक वय साधारण पन्नास हृदय विकाराने गेले.कोकणात
काहीसा व्यवसाय होता.त्याला एक शाळेत शिकणारा मुलगा आहे.त्याच्या एकाकी झालेल्या एक्झिट मुळे सारेच बदलून गेले,होत्याचे नव्हते झाले.त्याला हृदय विकारा होता, कधी तपासणीच झाली नाही, फक्त कष्ट एवढच जीवन होते.
अश्या गोष्टी कानावर पडल्याकी क्षणभर स्मशान वैराग्य येते.आपण नियती भोग असे म्हणतो
आणि सोडून देतो. आपण नेहमी
जीवनातल्या सु:ख-दु:खाला पूर्व कर्म, नशीब ,प्रारब्ध यात बसवतो.बुद्ध सांगतो सर्वंमं दुक्खम, सर्वंमं क्षणीकमं,दुःखाच कारण
जाणलंत तर दुःख मुक्तीचा मार्गाच हातात येईल.बुध्द दुःख निरोध
म्हणतो. निवृत्तीचा, निर्वाणाचा मार्ग हे
काही उत्तर असू शकत नाही.
नेहमी चांगले वागावे, चांगले वागले कि त्याचे फळ चांगलेच मिळते.पण व्यवहारात
नेमके उलटे पहावयास सापडते. बोलायला तत्वज्ञान सोपे वाटते.असो, कृष्ण सांगतो फळाची अपेक्षा
न धरता आपले कर्म करा सुखी व्हाल.कर्म चांगल वाईट महत्वाचे नाही निष्काम असावे.
उत्तम नावाचे आमचे एक जवळचे नाते संबंधी होते.वय वर्ष बहात्तर ,परवाच वारले असे समजले. गेलेल्या माणसाबद्दल वाइट बोलू नये
असा एक संकेत आहे. उत्तमच्या
मृत्यूची बातमी ऐकली आणि जणू चाळीसपंचे चाळीस वर्षाचा काळ,चलत चित्रपट डोळ्यासमोर आला.उत्तमला
पन्नास वर्षापूर्वी एक मुलगा झाला. उत्तमची बायको दोन वर्षात वारली.मुलगा पोरका झाला.उल्लाहास त्याचे नाव ,आठवीत असे पर्यंत म्हातारे आजी आजोबांनी कसाबसा सांभाळ केला.उत्तमने दुसरे लग्न केले.त्याला दोन
मुले झाली.जन्म दाता उल्लाहासला सावत्र मुलगा मानु लागला.
त्याने वडील म्हणून पहिल्या मुलाची जबाबदारी घेतली नाही. उल्लास पोरका नाही बेवारशी
झाला.वडील सरकारी अधिकारी पण काडीची मदत नाही.त्याला वार्यावर सोडले, शेवटी मामानी शिक्षण केले.कोणाच्या खाद्यावर कोणाचे ओझे.उल्लास
ईन्जीनियर झाला, आज तो व्यवहारिक सुखी आहे, पण बापाने शेवटपर्यंत त्याला जवळ केले नाही,दूर ठेवले असा कसा सावत्र बाप असू शकतो?
उत्तमचे आयुष्य खूप सुखात गेले.नंतरची दोन मुले, एक अमेरीकेत, दुसरा डॉक्टर.उत्तम निरोगी संपन्न आयुष्य्य जगला,डॉक्टर मुलाने मंत्राग्नी दिला.त्याच्या मातीला मी हजर नव्हतो, मनात विचार येतो,कधी कधी वाटते निष्ठुर वागणाऱ्या
माणसाला नियती माफ का करते? याला तुम्ही कर्मयोग म्हणा, वैराय्ग म्हणा,पूर्व पुण्याई म्हणा,पण माझ्या दृष्टीने हा आपमतलबी,बेजबाबदार स्वार्थच होता !
माझ्या वडिलांनी उत्तमला खूप समजावलेले मी जवळून पहिले होते.पण उपड्या घडावर पाणी
अशी गत होती. म्हणूनच संस्काराचे ओझे फेकून देऊन मी उत्तमचा आज एकेरी उल्लेख करून नियतीवर
सूड उगवण्याच समाधान शोधले.
अरे हो ,ह्या शरीराला
चिकटून राहण्याची ,जगण्याची
इच्छया म्हणजेच
अभिनवेश !
पुढील बॉग मध्ये.तोपर्यंत
स्वतलाच प्रश्न विचारा न्याय कशाला म्हणायचं…………
अजित भिडे