एका मल्टीनेशनल कंपनीत मला बोलायचे होते.एका डायनॅमिक ऑफिसरचा तडकाफडकी डेथ झाला होता .कॅन्डोलन्स मिटींग
शेड्युल केली होती .मी गेस्ट स्पीकर होतो. थोडक्यात मला एका शोकसभेत बोलायचं होते. जी व्यक्ति मृत्यू पावली होती, तिला मी ओळखत नव्हतो,
कोणतीच दुरान्वयाने सुध्दा ओळख नाही. तिथे माझ्या उपस्थिती मागे नियतीची निश्चित काय योजना होती, मला महित नाही, सगळंच तर्काच्या पलीकडले होते.
तो काल ऑफिस मध्ये होता .उद्याच्या टारगेटचे, कामाचे जॉटींग करून तो घरी गेला. सकाळी नऊ वाजता तो कॉल करतो ‘आय अं नॉट फिलिंग
वेल’ ,बारा वाजता तो ‘आय सी यू ‘ मध्ये आहे हे समजते आणि तीन वाजता न्यूज येते ,हि ईज नो मोर. या सगळ्या गोष्टी इतक्या पटापट
घडल्या ,त्यातून जीवनाची अनिश्चितता समोर
आली.
पाहिलं सगळा स्टाफ मानसिकदृष्ट्या आजारी बनला होता. मी आध्यत्मिक,स्पीरिचुअल दृष्टीकोनातून बोलावे अशी आऊट लाईन होती. माझं बोलणें
प्रसंगाला अनुसरून होते, अर्धा तास दिला होता, मी दहा मिनीटं अधिक मागुन घेतली, प्रसंगाचा ,वेळेचा आदर ठेवला.गेलेल्या माणसाच्या पुढील प्रवासासाठी प्रार्थना करावी आपण अडवू नये, हे ओघाने आलेच.
बघा, कोणी एक सहकारी
अकस्मात पणे भरल्या
जीवनातून एक्सझीट घेतो , तरुण पत्नी,
लहानगा मुलगा छत्र हरवून बसले.
तेव्हा वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि,
म्हणणे किती केविलवाणं वाटते नाही ?
विदयूत दाहिनीमध्ये देहाची काहीक्षणात राख होते ही वास्तवता पाहिली की
गीतेंतील नैनं
छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः आपल्याला अंतरमुख बनविते.
पण एकच दिलासा वाटतो "जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च
"पण हाती काहीच लागत नाही.
पण इथे तत्त्वज्ञानाची दुलाही
पांघरावी लागते,वास्तवाचे कडू सत्य स्वीकारावेच लागते, काळ औषधाचे काम करतो.
हल्ली आपण सारे ,मी सुद्धा संवेदना हरवलेली माणसे बनलो आहोत .अगदी
कोण जवळच,ओळखीचे गेले कि स्मशानांत जावे लागते, उपचार म्हणुन जातो.
अंत्येष्टी- म्हणजे अंतिम संस्कार, यज्ञच,मृतदेहाला अग्निला अर्पण
करणे आग्नेय स्वाह. आता
ती एक इव्हेंट बनली आहे.
धार्मिक विधी सुरु असतात तेव्हा सध्या
तू कुठे असतोस ,तुझा मुलगा काय म्हणतो, अशी माहितीची देवाणघेवाण , काहींचं क्रिकेट, मार्केट ,पॉलिटिक्स
यावर दबक्या आवाजात बोलणे ,नाहीतर वॅट्स ऍप सुरुच असते. असो कालाय तस्मै नमः !
कधी कधी मला सुद्धा आपण मरणार ही कल्पनाच मुळापासून हादरवते. मृत्यू-मरण म्हणजे ह्या जीवनाशी आपली कायमची ताटातूट, हे जीवन परत कधी भेटणार नाही. तसेच या शरीराशी
असलेले नातं कायमचे संपून जाणे,
सगळे सोडून
अज्ञाताच्या प्रवासाला निघणे, अगदी एकटे ही, कल्पनाच भयावह वाटते.
मरणाची भीती आणि जगण्याची दुर्दम्य इछ्या या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.शरीर
गलित गात्र झाले आहे,मृत्यू हाच एकमेव आशेचा किरण असताना,
जगण्याची केवीलवाणी धडपड याला पतंजली क्लेश म्हणतात, ते पटते.
अकस्मित ,अपघाती निघून जाण्यापेक्ष्या, मरण नेहमी पूर्ण आयुष्य जगल्या नंतर यावं असे वाटते. पण पूर्णाची व्याख्या कोणी करायची ?
मरणाला सुद्धा नशीब लागते आणि हो मरणाचे सुद्धा टायमिंग साधता पाहिजे आले. सन्मानाने एक्झिट घेता आली पाहिजे,काहींच्या बाबतीत मरणाची वाट पहाणे नशिबात असते. तब्येतीत मरण सुखावह वाटते.
अजित भिडे




