Monday, 19 January 2015

मुक्तीच द्वार, इच्छामरणपत्र……


परमेश्वरावर विश्वास ठेवावा, कठीण परिस्थितीत त्याला शरण जावे,त्याचाशी पंगा घेऊ नये,तो कठोर शिक्षा देइल.इतकंच आपल्याला सांगितले जाते, आपणाला तीच शिकवण असते, तोच संस्कार असतो आणि आपण हि तसेच समजतो.

भीती पोटी आणि जीवनात केव्हा काय घडेल हे सांगता येत नाही, म्हणून अनिश्चितते पोटी आपण सर्व परमेश्वरी संकल्पना स्वीकारतो. मला वाटते ती समाज बदलायल हवी.

सामान्य माणसांचा देव निराळा असतो.कोणाचा हत्तीचा,कोणाचा वानराचा,कोणाचा देव पुरुष, तर कोणाचा स्त्री,सामान्य माणसे  देवाकडे  नेवेद्य ठेवतात आणि बदल्यात त्याला वेठीस धरतात.

कोणाचा देव चर्च मध्ये क्रुसावर स्व:ताच असहाय असतो, दर रविवारी त्याची करुणा मागून, गुन्ह्याची कबुली द्यावी, म्हणजे पाप करावे.कोणाचा फायर टेमपल मध्ये जळत असतो.

अल्लाबद्दल प्रश्न उपस्थित केला तर गय नाही. कुराणानुसार पाच वेळा नमाज पडलाच पाहिजे. परमेश्वर नाकारणाऱ्या गौतम बुद्धाच्या मूर्ती जगात सर्वाधिक मूर्ती आहेत, माझा काही आक्षेप नाही.

परमेश्वर न मानणारा, आत्मा न मानणारा बुद्ध आपल्या पूर्वीच्या जन्माच्या कथा ,सांगतो महावीर तर देवी-देवतांचे पत्ते सागतो.माझे काही म्हणणे नाही.

बाप्पाकडे,आकाशातल्या देवाकडे जे आपण मागू ते तो आपल्याला देतो,अल्ला शुक्रिया अदा करनेकेलीये रोजाना नमाज,अशी शिकवण सर्वधर्मात थोड्या फार फरकाने आहे,परमेश्वर वाचक शब्द बदलतात. न्याय निवडा करणारा असा तो ईश्वर असतो.

तत्वज्ञानी माणसांचा परमेश्वर वेगळा असतो, तो सर्वज्ञानी, सर्वव्यापी, विश्वाचे कारण असतो.

साक्षात्कारी संताना भेटलेला देव निराळा असतो, तो करुणामय, प्रेममय,आनंदस्वरूप असेच काहीसा असतो.तिथेही एकवाक्यता नाही.

भीती पोटी माणसे परमेश्वराची करुणा भाकतात.विचार करा किती वेळा परमेश्वराने तुमचे ऐकले आहे.त्याच्याकडे काहीही मागू नये.

परवा आमच्या नात्यातल्या  एका माणसाला पाहायला गेलो होतो परिस्थिती अत्यंत बिकट होतीमाझ्या  उरल्या सुरल्या परमेश्वरावरच्या विश्वासाला तडा गेला. तो मरणाच्या दारात उभा होता, पण परमेश्वेर निष्टुरपणे गंमत पाहत होता.

मरणाचे स्वातंत्र्य प्रत्येक माणसाला असायला पाहिजे.युरीनसाठी पिशवी, ब्रेन जवळ-जवळ डेड सारखा, डोळ्यात जीव नाही.नजर मृत्यूची, निर्वाणाची वाट पहात शून्यात गेली होती.शरीराच्या काड्या झाल्या होत्या,वजन पस्तीस किलो.तोंड बंद, ना बोलता येत होते, तोंड ना, अन्न खाण्यासाठी वापरता येत होते.सलायीनवर जगत होता. प्राणवायू साठी नाकात नळ्या, झोपून झोपून बेडसोर, अत्यंत साधा, गरिबी, आयुष्यात कधी कोणाशी आवाज चढून बोलणे नाही, कोणाचे वाइट चिंतन नाही, साधा सरळ पाप-पाभिरू जीव.गेल्या महिन्याभरापासून असेच आहे.परमेश्वर असुरी आनंद तर घेत नाही ना,मला शंका आली.

पूर्वजन्मीचे भोग मला तर ती शिवी वाटायला लागली आहे.याही पेक्ष्या केविलवाण्या स्थितीत मृत्यूची वाट पाहणाऱ्या रूग्णाबदल माणसाना सहानुभूती वाटते तर परमेश्वर एवढा क्रूर का ?

मृत्यू म्हणजे नवा जन्म,आत्मा जुने-जीर्णवस्त्र टाकून नवेवस्त्र धारण करतो.आत्म्याला मृत्यू नाही, मृत्यू शरीराला आहे.आत्मा अमर आहे.तो सतत जन्म-मृत्युच्या प्रवाहात गटांगळ्या खात असतो.चांगल्या  जगण्याने सदगती मिळते, पाप केल्याने नरकात जावे लागते.
भारतीय बनावटीच्या धर्मात पुढील जन्म बहुधा  लगेच मिळतो. इस्लाम,क्रिस्ती धर्मात जज्जमेंट दिवसा ( Judgment Day) पर्यंत वाट पहावी लागते. मसाला तोच. म्हणून म्हणतो, परमेश्वर करुणामय नाही.तो न्यायी तर नाहीच नाही.

मला माहित आहे आई वडील, पत्नी,मुले,मित्र शेजारी भेटतात तसा परमेश्वर भेटत नाही.चंद्र, सूर्य घोडा, झाड, पाणी,माती दाखवता येते, तसा परमेश्वर दाखवता येत नाही.मला त्याचा खूप राग आला. खूप भांडलो मी त्या अव्यक्त परमेश्वराशी. तुम्ही मला वेडा म्हणाल, असेन मी वेडा.

आत्महत्या,  सुसाइड हा गुन्हा,हे कलम इंडिअन पिनल कोड मधून गेले आहे, Right to die with dignity’हा अधिकार प्रत्येकाला मिळायला हवा ,तसे ओपेन Declaration प्रत्येकाने बनवावे.

भारतीय घटनेनुसार Article  २१ नुसार प्रत्येकाला जगण्याचा  हक्क दिला आहे, 'राइत टू लाइफत्यातातच'राइत टू डाय' पण विसावला आहे Right to die with dignity’ हो हा विषय भावनिक आहे, मतभेदाचा आहे पण आत्म-सन्मानाचा आहे. ज्यावेळेला डॉक्टर ,वैदकीय-विज्ञान सांगते, सगळे संपले आहे, तर त्या जीवाची फेरफट करणे, हाल करणे कोणत्या मूल्यात बसते.

सुप्रीम कोर्टाचे म्हणणे आहे, Right to die with dignity’हा अधिकार Article  २१ मधून जात नाही तर Article १८, Right of privacy, autonomy & self determination मध्ये शोधता येतो.

स्वातंत्रवीर सावरकर (२६ फेब्रु ) आणि आचार्य विनोबा भावे  (१५ नाव्हे.यांनी प्रायोपवेशन केले होते. अन्न पाणी ,औषधे यांचा त्याग केला होता ,इच्छेने देह सोडला होता ते इच्छामरण होते.मुक्ती म्हणजे स्व:इच्छेने देह सोडण्याची आस.

इच्छापत्र ( Will ) असते तसे आत्यंतिक क्लेशकारि आणि कोणताही आशेचा किरण शिल्लक नाही अशी स्थिती असले तेव्हा इच्छामरण पत्रातील दोन Executor  मार्फत त्या जीवाची इच्छामरण इच्छा पूर्ण करावी, कायदा होल तेव्हा होउ दे, आपण आपल्या पासून चळवळ सुरु करायला काय हरकत आहे.

या चला, बनवा आजच इच्छामरणपत्र’ ! ! !

अजित भिडे





No comments:

Post a Comment