Saturday, 7 March 2015

पुण्यस्मरण शिवजयंतीचे !

वणीच्या सप्तश्रुगी भवानीची पूजा कोणी करायची हा तंटा सुलतानी ठाणेदाराकडे जात होता. महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी सुलतानाच्या दैवतांची पूजा-अर्च्या, नवस-सायास आणि उरूस- जुलूस मनोभावे सुरु केले होते.आपल्या पोराबाळाची नावे सुलतानराव, पिराजी,फकीर्जी, शेखोजी अशी ठेवायला सुरवात केली होती. वाईच्या एका धर्ममार्रतनडाचे नाव होते,विश्वनाथ भट्ट सुलतान.
वर्षानुवर्ष  मोगलानच्या स्वार्या दक्षिणेस होत होत्या.बादशहाच्या स्वार्या म्हणजे कत्तली जाळपोळ, शेतीची, संसाराची माती.हाहाकार.सर्वस्वा बरोबर अब्रू लुटली जात होती.तारुण्य आणि सौंदर्य महाराष्ट्रातल्या लेकी सुनांचे अपराध ठरावेत.कोणाही हयवानाने घरात शिरावे, कोणालाही ठार मारावे,अब्रू लुटावी.हंबरडा ऐकालाही वाली नाही.

लोक  वैतागले होते,सैतानी अत्याचार सुरूच होते.तरुणींच्या, अर्भकांच्यावृद्धांच्या अक्रोशानी काळपण, ओशाळला,सर्वोतोपरी हानी होत होती, मरत होती मराठ्यांनची जवान पोरे.कोणत्या ना कोणत्या सुल्तानासाठी ,शूर मराठे लढताहेत, मरत आहेत. कुणी निजामासाठी तर कुणी आदिल्शासाठी लढतो  पण आपल्या बायका मुलांची बाजू घेऊन कोणीच लढायला तयार नव्हते.या बादशाहीतून त्या बादशाहीत जाणे ,चाकरी करणे, स्वाभिमान नाही, कुलाशिलाची चाड नाही, अब्रुचि चीड नाही, लाचार,गुलाम स्वार्थी मने. यवनी जुलमी, पापी,व्यभिचारी अत्याचारापुढे झुकेल तो स्वामी भक्त.

बादशाही जुल्मांची रास वाढत होती.ब्राह्मणाचे सोवळे -ओवळे, क्षत्रीयांची लाचारी,वैशानची लांडी- लबाडी कमी होत नव्हती.सामान्य जणांना कोणी वाली नव्हता.नाथाना हे पाहवत नव्हते. तळमळीने आध्यातमातून जागआण्याचे काम करत होते.वासुदेवाची, वाघ्य्यामुरलीची, रोडक्याची गाणी गात होते,भारुड करत होते.शिमग्याची बॉम सुद्धा तळमळून मारत होते.
आदि शक्तीला आक्रोश करून हाक मारत होते,बये दार  उघड , बये दार  उघड ,

अलाक्ष्पूर भवानी बये दार  उघड ,  माहूर लक्षीमी बये दार  उघड ,
कोल्हापूर लक्षीमी बये दार  उघड , तुळजापूर लक्षीमी बये दार  उघड ,
कन्नड लक्षीमी  बये दार  उघड ,पातळ लक्षीमी बये दार  उघड ,
पंढरपूर निवासनी बये दार  उघड , बये दार  उघड .
तू राम होऊन रावणास मारलेस,   हिरण्यकश्पास फाडलेस बये दार उघड .

जिजाई शिवनेरी शिवाइच्या सहवासात काळ क्रमित होती. जिजाईला दास्यत्वाची कल्पना सहन होत नव्हती, सोसवत नव्हती, तिला स्वताचे राज हवे होते.हवा होता आपला झेंडा, आपला सेनापती, आपला प्रधान.या देशावर राज्ज करतील आमचे सार्वमत चंद्र-सूर्य आमचा राजा.

शके १५५१ शुक्ल नाम संवतसारे,फाल्गुन पोर्णिमा आली.मराठा गडकरी असलेल्या प्रत्येक गडावर होळी साजरी होत होती.वद्य त्रीतीयेची पहाट, गडावर वाद्ये वाजू लागली ,झानझा झानाणु लागल्या.
तो दिवस सोन्याचा होता, सोनियाचा होता. नद्या ,तारे अग्नी सारेच आनंदी झाले. जिजाई  पोटी पुत्र जन्माला, हो, पुत्र जिजाईला झाला,
पुत्र शहाजीराजानंना झाला,पुत्र सह्याद्रीला झाला,पुत्र महाराष्ट्राला झाला,पुत्र भारत वर्षाला झाला. 

आज तिथीने  शिवाजी जयंती. शासनाची शिवाजी जयंती १९ फेबृवारला असते .पण हिंदवी स्वराज्जाचा महामेरूची जयंती हिंदवी काळ गणनेनुसार अधिक भावते.

अफझलखानाचा दगा ,महाराजांनी अफझलखानाचा केलेला वध, शाहिस्तेखानाची बोटे छाटली तो प्रसंग मावळच्या दर्या खोर्यातील पराक्रम,
पन्हाळ गडाचा वेढा, जावळीचे जंगल, तोरणा, विशालगड, राजगड, रायगड, सिंहगड, गडाशी नाते सांगणारा इतिहास  !
पुरंदरचा तह ,मिर्झाराजांशी भेट,औरंजेबाचा दगा, महाराजांना आग्र्यास कैद आणि आग्र्याहून नेत्रदीपक पलायन.बाजी प्रभू देशपांडे, नेताजी पालकर, तानाजी मालुसरे नांव कोणाकोणाची घ्यावी सारीच अनमोल रत्न.

समर्थ म्हणतात

निश्चयाचा महामेरु ! बहुत जनासी आधारू

अखंड स्थितीचा निर्धारु ! श्रीमंत योगी 

यशवंत कीर्तिवंत ! सामर्थ्यवंत  वरदवंत

पुण्यवंत आणि जयवंत! जाणता राजा 

शिव्रराजांचे आठवावे  रूप ! शिव्ररायाचा आठवावा सापेक्ष

शिवरायाचा आठवावा प्रताप! भूमंडळी

शिवरायाचे कैसे  बोलणे! शिवरायाचे कैसे चालणे

शिवरायाची सलगी देणे!  कैसी असे

सकाळ सुखाचा केला त्याग ! करुनी साधिजे तो योग

राज्यसाधनाची लगबग! कैसी केली.

                                                                                         
शिवाजी महाराज धार्मिक होते, पण धर्म भोळे नव्हते, 
कठोर होतेपण क्रूर नव्हते, साहसी होते, पण आतताई नव्हते,
व्यवहारी होते,   पण ध्येयशून्य नव्हते,
उच्चध्येयाची स्वप्ने पाहणारा होते पण स्वप्नाळू नव्हते,
स्वप्न वास्तवात उतरविणारा कठोर वास्तववादी होता.
परर्धर्म सहीष्णुता होती.


आपण आपल्यासाठी महाराजांचे हे गुण जरी आत्मसात केले तरी खूप झाले

अजित भिडे

(बाबासाहेब पुरंदरे यास वंदन करूनशिवजयंतीचे  स्मरण )

.

Monday, 19 January 2015

मुक्तीच द्वार, इच्छामरणपत्र……


परमेश्वरावर विश्वास ठेवावा, कठीण परिस्थितीत त्याला शरण जावे,त्याचाशी पंगा घेऊ नये,तो कठोर शिक्षा देइल.इतकंच आपल्याला सांगितले जाते, आपणाला तीच शिकवण असते, तोच संस्कार असतो आणि आपण हि तसेच समजतो.

भीती पोटी आणि जीवनात केव्हा काय घडेल हे सांगता येत नाही, म्हणून अनिश्चितते पोटी आपण सर्व परमेश्वरी संकल्पना स्वीकारतो. मला वाटते ती समाज बदलायल हवी.

सामान्य माणसांचा देव निराळा असतो.कोणाचा हत्तीचा,कोणाचा वानराचा,कोणाचा देव पुरुष, तर कोणाचा स्त्री,सामान्य माणसे  देवाकडे  नेवेद्य ठेवतात आणि बदल्यात त्याला वेठीस धरतात.

कोणाचा देव चर्च मध्ये क्रुसावर स्व:ताच असहाय असतो, दर रविवारी त्याची करुणा मागून, गुन्ह्याची कबुली द्यावी, म्हणजे पाप करावे.कोणाचा फायर टेमपल मध्ये जळत असतो.

अल्लाबद्दल प्रश्न उपस्थित केला तर गय नाही. कुराणानुसार पाच वेळा नमाज पडलाच पाहिजे. परमेश्वर नाकारणाऱ्या गौतम बुद्धाच्या मूर्ती जगात सर्वाधिक मूर्ती आहेत, माझा काही आक्षेप नाही.

परमेश्वर न मानणारा, आत्मा न मानणारा बुद्ध आपल्या पूर्वीच्या जन्माच्या कथा ,सांगतो महावीर तर देवी-देवतांचे पत्ते सागतो.माझे काही म्हणणे नाही.

बाप्पाकडे,आकाशातल्या देवाकडे जे आपण मागू ते तो आपल्याला देतो,अल्ला शुक्रिया अदा करनेकेलीये रोजाना नमाज,अशी शिकवण सर्वधर्मात थोड्या फार फरकाने आहे,परमेश्वर वाचक शब्द बदलतात. न्याय निवडा करणारा असा तो ईश्वर असतो.

तत्वज्ञानी माणसांचा परमेश्वर वेगळा असतो, तो सर्वज्ञानी, सर्वव्यापी, विश्वाचे कारण असतो.

साक्षात्कारी संताना भेटलेला देव निराळा असतो, तो करुणामय, प्रेममय,आनंदस्वरूप असेच काहीसा असतो.तिथेही एकवाक्यता नाही.

भीती पोटी माणसे परमेश्वराची करुणा भाकतात.विचार करा किती वेळा परमेश्वराने तुमचे ऐकले आहे.त्याच्याकडे काहीही मागू नये.

परवा आमच्या नात्यातल्या  एका माणसाला पाहायला गेलो होतो परिस्थिती अत्यंत बिकट होतीमाझ्या  उरल्या सुरल्या परमेश्वरावरच्या विश्वासाला तडा गेला. तो मरणाच्या दारात उभा होता, पण परमेश्वेर निष्टुरपणे गंमत पाहत होता.

मरणाचे स्वातंत्र्य प्रत्येक माणसाला असायला पाहिजे.युरीनसाठी पिशवी, ब्रेन जवळ-जवळ डेड सारखा, डोळ्यात जीव नाही.नजर मृत्यूची, निर्वाणाची वाट पहात शून्यात गेली होती.शरीराच्या काड्या झाल्या होत्या,वजन पस्तीस किलो.तोंड बंद, ना बोलता येत होते, तोंड ना, अन्न खाण्यासाठी वापरता येत होते.सलायीनवर जगत होता. प्राणवायू साठी नाकात नळ्या, झोपून झोपून बेडसोर, अत्यंत साधा, गरिबी, आयुष्यात कधी कोणाशी आवाज चढून बोलणे नाही, कोणाचे वाइट चिंतन नाही, साधा सरळ पाप-पाभिरू जीव.गेल्या महिन्याभरापासून असेच आहे.परमेश्वर असुरी आनंद तर घेत नाही ना,मला शंका आली.

पूर्वजन्मीचे भोग मला तर ती शिवी वाटायला लागली आहे.याही पेक्ष्या केविलवाण्या स्थितीत मृत्यूची वाट पाहणाऱ्या रूग्णाबदल माणसाना सहानुभूती वाटते तर परमेश्वर एवढा क्रूर का ?

मृत्यू म्हणजे नवा जन्म,आत्मा जुने-जीर्णवस्त्र टाकून नवेवस्त्र धारण करतो.आत्म्याला मृत्यू नाही, मृत्यू शरीराला आहे.आत्मा अमर आहे.तो सतत जन्म-मृत्युच्या प्रवाहात गटांगळ्या खात असतो.चांगल्या  जगण्याने सदगती मिळते, पाप केल्याने नरकात जावे लागते.
भारतीय बनावटीच्या धर्मात पुढील जन्म बहुधा  लगेच मिळतो. इस्लाम,क्रिस्ती धर्मात जज्जमेंट दिवसा ( Judgment Day) पर्यंत वाट पहावी लागते. मसाला तोच. म्हणून म्हणतो, परमेश्वर करुणामय नाही.तो न्यायी तर नाहीच नाही.

मला माहित आहे आई वडील, पत्नी,मुले,मित्र शेजारी भेटतात तसा परमेश्वर भेटत नाही.चंद्र, सूर्य घोडा, झाड, पाणी,माती दाखवता येते, तसा परमेश्वर दाखवता येत नाही.मला त्याचा खूप राग आला. खूप भांडलो मी त्या अव्यक्त परमेश्वराशी. तुम्ही मला वेडा म्हणाल, असेन मी वेडा.

आत्महत्या,  सुसाइड हा गुन्हा,हे कलम इंडिअन पिनल कोड मधून गेले आहे, Right to die with dignity’हा अधिकार प्रत्येकाला मिळायला हवा ,तसे ओपेन Declaration प्रत्येकाने बनवावे.

भारतीय घटनेनुसार Article  २१ नुसार प्रत्येकाला जगण्याचा  हक्क दिला आहे, 'राइत टू लाइफत्यातातच'राइत टू डाय' पण विसावला आहे Right to die with dignity’ हो हा विषय भावनिक आहे, मतभेदाचा आहे पण आत्म-सन्मानाचा आहे. ज्यावेळेला डॉक्टर ,वैदकीय-विज्ञान सांगते, सगळे संपले आहे, तर त्या जीवाची फेरफट करणे, हाल करणे कोणत्या मूल्यात बसते.

सुप्रीम कोर्टाचे म्हणणे आहे, Right to die with dignity’हा अधिकार Article  २१ मधून जात नाही तर Article १८, Right of privacy, autonomy & self determination मध्ये शोधता येतो.

स्वातंत्रवीर सावरकर (२६ फेब्रु ) आणि आचार्य विनोबा भावे  (१५ नाव्हे.यांनी प्रायोपवेशन केले होते. अन्न पाणी ,औषधे यांचा त्याग केला होता ,इच्छेने देह सोडला होता ते इच्छामरण होते.मुक्ती म्हणजे स्व:इच्छेने देह सोडण्याची आस.

इच्छापत्र ( Will ) असते तसे आत्यंतिक क्लेशकारि आणि कोणताही आशेचा किरण शिल्लक नाही अशी स्थिती असले तेव्हा इच्छामरण पत्रातील दोन Executor  मार्फत त्या जीवाची इच्छामरण इच्छा पूर्ण करावी, कायदा होल तेव्हा होउ दे, आपण आपल्या पासून चळवळ सुरु करायला काय हरकत आहे.

या चला, बनवा आजच इच्छामरणपत्र’ ! ! !

अजित भिडे