Saturday, 27 October 2012

प्रार्थना ! रवींद्रनाथ टागोरांची……….


प्रार्थना !  रवींद्रनाथ टागोरांची……….

आपणाला जे हवे आहे ते मिळवण्यासाठी आपण सर्वजण परमवेश्वराकडे प्रार्थना करतो.

पूर्व संस्कारानुसार कुणी हनुमानाची, कुणी शंकराची,कुणी गणपतीची तर

कुणी येसू क्रीस्ताची,तर कुणी अल्लाकडे ,तर कुणी महावीराकडे प्रार्थना करतो.

आपणाला जे हवे आहे ते  मिळवण्यासाठी परमवेश्वराची करूणा भाकतो,प्रार्थना करतो.
ते चूकिचे असे मी म्हणत नाही. 


प्रार्थनेत आपण म्हणतो मला हे दे, मला ते हवे आहेआणि ते मिळतेहि.मग आपला परमवेश्वरावर 
विश्वास बसतो, श्रद्धा बसते.आपण मागण्य्याची यादी  Charter of Demand नेहमी त्याला प्रार्थनेत देत असतो.

रवींद्रनाथ टागोर परमवेश्वराकडे प्रार्थना करतात. मला ती खूप आवडते, भावते. तुम्हाला देखील विचार करायला लावेल.
रवींद्रनाथ म्हणतात' "हेपरमवेश्वरा माझावर संकटे येवू देवू नकोस, मला तू संकटातून बाहेर काढ, अडचणीतून बाहेर काढ, अशी याचना मी तुझाकडे करणार नाही.पण त्या संकटातून बाहेर येण्यासाठी , कठीण प्रसंगातही तरुन जाण्यासाठी लागणारी शक्ती, सामर्थ्य, धैर्य  तू मला दे. आणि त्या कठीण प्रसंगातही माझी तूझावरची निष्ठा, श्रद्धा काकणभरहि कमी होऊ देवू नकोस............."

परमवेश्वरावरची आपली निष्ठा, श्रद्धा हि मातीच्या ढेकळासारखी भूसबुशीत असते,ठिसूळ असते. मनासारखे घडत गेले कि आपला विश्वास बसतो. आपली श्रद्धा बसते ,परमवेश्ववर माझी प्रार्थना ऐकतो.

बराच वेळेला असे होते ,तुम्ही मागणी करता,प्रार्थना करता. परमवेश्ववर ऐकत नाही.तुमचा विश्वास, श्रद्धा उतरयाला लागते.परमवेश्वराच्या अस्तितवा बद्दल शंका येते.परमवेश्वर वगैरे झूट आहे. खोटे आहे. देव्हाऱ्यातले सगळे देव उचलून माळ्यावर ठेवावेत ,इतपत आपली मजल जाते.

खरे तर, तुमचे प्रयत्न.इतरांचपरिस्थितीचे साहाय्य ,का अनुकूल असला की गोष्ठी घडतात. गोष्ठी जेव्हा घडायचा असतात,तेव्हाच घडतात.तुमची प्रार्थना फक्त निमित्य ठरते. तुमची समज असते,माझी प्रार्थना फळली.

 रवींद्रनाथ प्रार्थनेत म्हणतात माझी तूझावरची निष्ठा, श्रद्धा काकणभरहि कमी होऊ देवू नकोस........." 

मला माझा पायावर उभे राहू दे.किती सोप्प्या भाषेत मोठा आशय सांगितला आहे. श्रद्धा, अंधश्रर्द्धेपासून दूर राहू दे. ईश्वरीय शक्तिप्रती विश्वास पण त्या तत्वाला आपल्या साठी वेठीस धरणे त्यांना मान्य नाही
. 
गीतांजली महाकाव्यात रवींद्रनाथ म्हणतात……..

'O thou the last fulfillment of life,

Death ,my death , come and whisper to me !


माझी अखेरची अपेक्षा…..ये, मृत्यू ये आणि तू तूझे गुपित मला माझ्या कानात हळुवार सांग !
मृत्यूची भीती नाही ,मृत्यू बरोबर मैत्रीची कल्पना किती रम्य आहे नाही ?
जणू काही प्रेयसीला साद घालावीतू  तूझे गुपित हळुवार  माझ्या कानात सांग !

बारा वर्ष नंतर, बुद्ध जेव्हा यशोधारेला भेटावयास येतो, तेव्हा यशोधरा आपली भावना कशी सागते, ते पुढचा ब्लोग साठी राखून ठेवतो रवींद्रनाथानच्या शब्दात ! ! !

अजित  भिडे



No comments:

Post a Comment