Wednesday, 5 December 2012

कार्ल मार्क्स , साम्यवाद आणि आध्यात्म ........

 कार्ल मार्क्स ,साम्यवाद  आणि  आध्यात्म ........                                 


आज मी तुमचाशी जरा वेगळ्या विषयावर बोलणार आहे.
दोन जर्मन माणसांनी इतिहासावर मोठा प्रभाव टाकला होता.
दोन् जर्मन माणसांनी जगावर अधिराज्य केले.
त्या दोन वक्ती वेगवेगळ्या कालखंडात होऊन  गेल्या. 

हिटलर हे वक्तीम्तव तूम्हाला माहित आहे.सार्र्या जगाला युद्धखोर बनवणारा, दुसर महायुद्ध,नाझी  पार्टी, जुलोकांचे जीनोसाईइड हे सारे त्याचाशी निगडीत आहे.

दुसरे वक्तीम्तव ”कार्ल मार्क्स हा जन्माने जर्मन जू होता. त्याचे अर्थशास्त्र, समाजकारण आणि तत्वज्ञान हे क्रांतीच्या  मार्गाने जाणारे होते.त्याच्या विचारांनी अर्ध्याहून अधिक जगावर प्रभाव टाकला, राज्य केले.मार्क्स आधी नंतर हिटलर असा इतिहासाचा क्रम आहे.

एके काळी भारता सारख्या लोकशाही देशात तरुण पिढीला मार्क्सवादाचे आकर्षण होते.
मार्क्सवाद आहे तरी काय हे भारतामधल्या पोथीनिष्ट मार्क्सवाद्यांकडून समजणार नाही.
आर्थिक सुधारणांना विरोध,युनियनगिरी,संप ,हरताळ, खाजगीकारणाला
जागतीकारणाला विरोधस्पर्धेला विरोध,तरीही स्वताला पुरोगामी समजणारा अशी आहे.

हिटलरला मानणारा मोठा वर्ग आहे,तसाच त्याचा विरोधी सारे जग आहे.मार्क्सला  डोक्यावर घेणारा वर्ग आहे ,तसाच त्याला विरोध करणारा  मोठा वर्ग आहे.मार्क्सवाद संपला असे म्हणालो, तरी जगाला त्याचा विचार करायला लागतो.त्याचा कडे दुर्लक्ष करता येत नाही. 

विषयाचा आवाका मोठा आहे,म्हणूनच कार्ल मार्क्स”, साम्यवाद आणि आध्यात्म   हा विषय तीन ब्लोग मध्ये  मांडणार आहे. तो तुम्ही वाचवा आणि विचार करावा.आजच्या जागतीकारणाच्या धावपळीत मार्क्स संमाजून घेणे आवश्यक आहे. मी कोणी  मार्क्सवादी  नाही. आध्यामाचा विचार करताना उपनिषद,पातंजली ,आईन्स्टाइन, होकिंस्कस ,शंकराचार्य ,बुद्ध,  तावो, ओशो  समजणे जेवढे आवश्यक  तेवढीच मार्क्सच्या तत्त्वज्ञानाची ओळख
माझे विचार पटावेत अशा आग्रह नाही, तुम्ही जागे तर व्हा ! 

मार्क्सचे तत्वज्ञान  मी सांगणार आहे अगदी थोड्या शब्दात  ,पण त्याआधी तो कसा घडत  गेला हे जाणणे समजून घेवूया..........................

फ्रान्स आणि जर्मनीच्या सीमेवर ट्रीएर हे गाव.तिथें १८१८ मध्ये  कार्ल मार्क्सचा जन्म झाला. हर्शेल मार्क्स त्याचे वडील जन्माने जू होते. ते पेशाने वकील होते.आईवडलांच्या अनेक पिढ्या धर्मगुरूंच्या होत्या .जू लोकांवर कृत्रिम बंधन होती.कर अतिशय जुलमी होता.शेती वा व्यवसाय करण्यावर बंदी होती. उद्योग करण्यावर बंधन होती. जू लोक सरकारी नोकरी करू शकत नाही, अशी स्थिती होती, त्यामुळे आपली वकिली चालावी म्हणून ते  प्रोतेस्टांत झाले.ते एक प्रकारचे धर्मानंतर होते . 

शालेय शिक्षण झाल्यावर कार्ल बॉन विश्वविद्यालयात कायद्याचे शिक्षण घेऊ लागला .मित्रमंडळी  बरोबर मौजमजा  करतांना त्याला खुप कर्ज झाले.तेव्हा वडिलांनी ते फेडले आणि त्याला  बर्लिनला पाठवले. तिथे त्याचा जीवनाला कलाटणी मिळाली. तत्वज्ञानाचा अभ्यास सुरु झाला, त्याने अनेक चळवळीत भाग घेता ,कविता केल्या, भाषांतर केली ,चर्चा वाद विवाद केले.

जी डब्लू एफ हेगल, हया प्राध्यापकांच्या तत्वज्ञानाचा विचारांचा त्याचावर प्रभाव पडला.
हेगलेच्या तत्वज्ञानाप्रमाणे………….

मानवी मनामध्ये विचार निर्माण होतो( वाद).
त्याचा उणीवा आणि अंतर्विरोध म्हणजे ( प्रतिवाद).
वाद- प्रतीवादाच्या समन्वयात सुसंवाद निर्माण होतो.

मार्क्सने विचार ऐवजी वस्तूला महत्व दिले. तो यंग हेगेलीअन ह्या ग्रुप म्हद्ये सामील झाला.पुढे, दास कॅपिटल ह्या ग्रंथात तो म्हणतो वस्तू आधी मग विचार,जमीन आधी दिसते मग पेरणी. करावी हा विचार नंतर येतो .हेगल डोक्यावर चालत होता मी त्याला पायावर उभे केले.

जेनी ,त्याचापेक्ष्या वयाने चार वर्ष मोठी होती, दिसायला अतिशय सुंदर होती, वयाच्या सतराव्या वर्षी त्याचा तिच्याशी प्रेमविवाह झाला. १८३८ साली कार्लच्या वडिलांचं निधन झाले.

जेना विश्वाविद्यालायात डॉक्टररेट  केल्यावर  त्याने १८४२ मध्ये पत्रकारिता सुरु केली. रहाएशिन त्यायतुंग हे प्रत्र मुख्यत्वे  जुन्या कॅथोलिक विचारांवर झोड उठवण्यासाठी  होते.
श्रीमत व कारखानदार त्याचा मालक वर्ग होता.१८४२ तो मुख्यासंपादक झाला.
तो आपली जहाल मते प्रत्रामध्ये नोदवू लागला . त्याच्या जहाल आणि क्रांतिकारी विचार मुळे, ईश्वर, राजसता  आणि धर्म ह्यावरील टीकेमुळे आणि मोसेलवाईन शेतकारांच्या  दारिद्रावर लेख लिहिला हे कारण झाले म्हणून  त्याला पर्सियातून  हद्दपार करण्यात आले.

त्या आधी त्याची  फेडरिक  एंगल्स बरोबर ओळख झाली होती.हा अत्यंत हुशार,श्रीमंत जमीनदाराचा मुलगा होता. त्याची मैत्री शेवट पर्यंत होती. दोघानी  मिळून जगप्रसिद्ध  साम्यवादी जाहिरनामा (Communist manifesto१८४८ मध्ये लिहिला.

१८४३ मध्ये  तो प्यारिस  मध्ये गेला.तिथे त्याने राजकीय अर्थशास्त्राचा अभ्यास आणि फ्रांस राजक्रांतीचा इतिहास वाचला. मार्क्सने  इतिहासाचाEconomic  Interpretation  of History हा शब्द प्रयोग केला.History repeats if self first as tragedy then as farce.असे मत माडले.

राज्जाचा आधार पाशवी शक्ती आहे. 
वर्गीय  हितसंबधातून शोषकानी  राजाची निर्मिती केली.
सर्व राज्ज हि कल्याणकारी नसल्यामुळे ती विलयास गेली पाहिजेत.
इतिहासाच्या पाच अवस्था मांडल्या.
एक इतिहास पूर्व , दोन गुलाम बाळगणारा समाज,तीन सरंजामशाही, चार भांडवलशाही आणि  पाचवी अवस्था साम्यावाद.

सरंजामशाहीत जमीन आणि भांडवलशाहीत  भांडवल हा उत्पादनाटला घटक असतो अस मत मांडले. कार्ल मार्क्स, फेडरिक  एंगल्स यांचा साम्यावादि सिद्धांता प्रमाणे मजूर,कामगार हा उत्पादनाटला घटक प्रमुख मानले आहे.

मार्क्सवादाचा जनक फेडरिक एंगल्स बरोबर कार्ल मार्क्सने १८४४ मध्ये निर्वासितंन्साठी काम करायला सुरवात केली. सर्वत्र कष्टकरी कामगार,भूमिहीन, मजूरवर्गांचे  एकप्रकारे शोषण अशी स्थिती होती !कष्ट जास्त,मोबदला कमी,गुलामगिरीचे नवे स्वरूप शोषितांची नवी फळी अशी स्थिती होती. दोघेहि Communist लीगचे  सदस्य होते.

फ्रांन्स  मध्ये तो जर्मन कामगारांसाठी  लिखाण करू लागला ,फ्रांन्सने  पेर्सिअन राजकार्त्यांच्या सुचनेवरून त्याची १८४५ मध्ये हाकलपट्टी केली. तो आता  ब्रुउस्सेला आला.मार्क्सच्या विचारनी प्रभावित झाल्या मुळे १८४६ मध्ये लंडन मध्ये Communist league ची स्थापना झाली.
१८४८ मध्ये उद्रेक होई पर्यत तो ब्रुउस्सेला तेथे होता, १८४८ नंतर तो लंडनला आला.

आडम स्मिथ च्या wealth Creation या अर्थशास्त्र ग्रंथात उत्पादन्तेतले चार घटक factors of Production कच्चामाल(stock) ,जमीन (land), कामगार (labor) आणि भांडवल(capital).पण अर्थव्यवस्था ही नेहमीच  भांडवलदारांनचे हिताचे रक्षण करणारी, आणि कामगारांचे शोषण करणारी अशी होती.कार्ल मार्क्स, फेडरिक  एंगल्स यांचा सिद्धांता प्रमाणे मजूर,कामगार labor  हेच प्रमुख मानले जायचे.

 “दास कॅपिटल, “German Ideology ", “Economics and Philosophy Manuscript”  हे ग्रंथ लिहिले.स्वताच्या  लिखाणाला तो शात्रीय असे संबोधित असे.

त्याचा जहाल पणा  हा तत्वाज्ञानाच्या  स्वरूपात होता ,तो अजून राजकीय झाला नव्हता.

पुढील  भागात अधिक जाणून घेऊ !

अजित भिडे 




No comments:

Post a Comment