क्षण सौख्याचा, क्षण दुःखाचा,
क्षण प्रितीचा, क्षण भीतीचा,
क्षण आनंदाचा,
क्षणा- क्षणाला, क्षणा-क्षणाचा
हार गुंफला जातो आणि
त्याला आपण जीवन म्हणतो.
क्षणच सारे जीवन बनून जात.
म्हणून प्रत्येक क्षण जगणे महत्वाचे आहे.खरेतर जीवनाला नाकारून नाही तर स्वीकारून
जगणे मोलाचे आहे.अनेक प्रसंग येतात, त्या प्रसंगाना आपण सामोरे जातो ,काही आनंद देतात.काही गोष्ठी दुःख देतात. कधी कधी भीती त्रास देते, तणाव निर्माण करते. कोणताही प्रसंग असो .त्यात दटून राहणे म्हणजे धीरता.
परिस्थिती पासून दूर गेलात
म्हणून वस्तूस्थिती बदलत नाही.जी परिस्थिती आहे तिला challenge चुनौती म्हणून स्वीकारणे आणि त्यातून बाहेर येणे महत्वाचे आहे.
पळून प्रश्न सुटणार नाहीत, भीतीने प्रश्नाचे स्वरूप सौम्य होणार नाही. आत्महत्येने प्रश्न सुटणार
नाहीत.प्रश्न तुमचे तुम्हालाच सोडवावे लागतात.उत्तर तुमची तुम्हीच शोधायची आहेत. जीवनात
tailor
made उत्तर नाहीत.कारण जीवन tailor made नाही.
नशीब, प्रारब्ध जे काही आपण मानतो ते मुळातच निराकार आहे. आपणच त्याला आकार देतो ,रूप देतो. विसरून कसे चालेल, नियती स्व:ताच निराकार आहे.
क्षण म्हणजे moment तिला event समजून चालेल का ?
बघा विचार करा आणि ठरवा आणि कोणताही क्षण कधी हरवू नका.
मृत्यू हा क्षण सुद्धा
हरवू नका.
अजित भिडे
No comments:
Post a Comment