एका लहानश्या गावात एक साधा सरळ माणूस रहात होता. साधा होता, सरळ होता, भोळसट होता.त्याचा हा भोळसटपणा, साधेपणा पराकोटीचा होता. त्या भोळसटपणातून काहीतरी बोलून जायचा, लोक त्याची टेर घायची, टिंगल करायचे, आणि मग तो मूर्ख ठरे .
सगळे गाव त्याची मूर्ख म्हणून सतत टींगल करायचे. तुला काही कळत नाही, तू येडा आहेस, तोंड उघडले काही बोलला की टिंगल, हेटाळणी. सतत टेनशॅन मध्ये असायचा. याचा एकत्रित परिणाम तो भित्रा बनला, कॉंप्लेक्स निर्माण झाला.आयुष्य त्रासदायक झाले.
त्यालाही त्याच्या मूर्खपणाचा कंटाळा आला होता.गावात एक हुशार, बुद्धीवान, धूर्तमाणूस होता.तो त्याला भेटला, आपली लोक कशी मजा उडवतात,मूर्ख बनवतात हे सांगितले.आता मी काय करू काहीच पर्याय दिसत नाही असे सांगितले.
त्या हुशार माणसाने त्याला सल्ला दिला ,कोण म्हणतो तू मूर्ख आहेस, येडा आहेस, तू साधा निष्पाप आहेस .लोक तूला टार्गेट करतात.आता तूच त्याना टार्गेट कर.उद्या पासून सारा आविर्भाव बदलायचा, तू स्वताला forcefully project कर .तुझ्या बोलण्यात आक्रमकता आण,ठासून बोल खरेखोटे विचार करू नकोस.
काही नाही ,केवळ येवढच कर, जर कोणी कुणाची स्तुती करत असेल ,तर तू लगेच त्याची नालस्ती करायला लाग. कोणी म्हणाले हा माणूस सज्जन आहे, तर तू तत्काळ सांग ,नाही हो तो पक्का लफंगा आहे.
एकदी स्त्री शालीन आहे, असे कोणी म्हणाले तर हलक्या आवाजात म्हण काय पुरावा आहे तुमच्या कडे. एखादी स्री सुंदर आहे असे जर कोणी म्हणाल तर लगेच विचार काय सुंदर आहे तिच्यात ? तीच नाक सुंदर आहे, डोळे सुंदर आहेत का , केस सुंदर आहेत, सांगा काय सुंदर आहे. सुंदरपणाची व्याख्या करता येत नाही. मला सांगा, तिच्या सुंदरपणाचा काय पुरावा आहे तुमच्याकडे?
कुणी म्हणाले हे पुस्तक चांगले आहे,तर तू तत्काळ सांग ,मी ते वाचले आहे,अभ्यास केला आहे.तू ते वाचले नाहीस याची तमा बाळगू नकोस, सरळ बेधडक सांग ते पुस्तक बेकार आहे.
कुणी म्हणाले सूर्योदय काय छान आहे .तू लगेच म्हण काय छान आहे, ह्यापेक्षा अधिक चांगला सूर्योदय मी पहिला आहे, हा तर अगदीच सामान्य आहे.
कुणी म्हणाले हे चित्र छान आहे. तर सांग ,केवळ कॅनवास आणि नुसते रंग सांडले आहेत,अर्थ शून्य आहे हि कलाकृती एखादे शेंबडे पोर देखील चांगले चित्र काढेल.
कुणी म्हणाले हा माणूस खरोखर समाजसेवा करतो, तर तू तावातावाणे म्हण, ठासून सांग, निस्वार्थी कसला हा पक्का भ्रष्ट आहे, चोर आहे.
तू सतत नकार देत रहा, पुरावे मागत रहा, बेधडक टीका करत रहा.कोणी प्रश्न केला तर तू उलट प्रश्न कर तू उत्तर् दिलस तर दोष काढले जातील,प्रश्नाला उत्तर् न देता तूच उलटा प्रश्न करत जा. प्रत्येक शब्दाचे, प्रत्येक वाक्याचे explanation माग. समोरच्या माणसाला भंडावून सोड,
आठवडाभरात लोकांना वाटायला लागले हा माणूस प्रतिभावान आहे, हुशार आहे, आपण चुकीच समजत होतो त्याला .कोणतेही चित्र दाखवा तो लगेच दोष दाखवतो, ग्रंथ दाखवा त्रुटी दाखवतो त्याचापाशी टीकाकारची बुद्धि आहे.त्याच्या समोर यायला लोक घाबरायला लागली. कोणी प्रश्न विचारयला धजेना.
आता परिस्थिती बदलली, जो सतत घाबरलेला असायचा त्यालाच लोक घाबरु लागले कुठल्याही निषेधात्मक गोष्टीवर चटकन विश्वास बसतो.नकारात्मक गोष्ट असिद्ध करणे कठीण असते.जेथे गुण दिसेल तेथे निषेध करू शकता.
तो बुद्धीवान माणूस महिन्या नंतर परत आला.तो म्हणाला छान असेच चालू ठेव. आता हा नवशहाणा त्या बुद्धीवान माणसाला म्हणतो, तुम्ही खरोखर मूर्ख आहात,मला उपदेश करू नका.
आता ह्या नवप्रतिभावान माणसाने ज्याला आपण आधी हुशार, बुद्धीवान, धूर्त समजत होतो, त्यालाच मूर्ख म्हटले, म्हणजे तो पूर्वीचा बुद्धीवान हा मूर्खच असला पाहिजे, असा गावातल्या लोकांचा समज झाला .गुरुची विद्या गुरुला भारी.
हि शॉर्ट स्टोरी आहे एका जुन्या जमान्यातील रशियन लेखकाची टेर्जीनीव्ह.
आजच्या समाज जीवनाचे प्रतिबीब मला त्यात दिसते.
कथेच नाव फ़ूल (मुर्ख) ,त्यात थोडासा बदल करून सागितली .
अजित भिडे
No comments:
Post a Comment