Monday, 28 April 2014

पूजा आणि ध्यान ....

रामकृष्ण दक्षिणेश्वेराच्यामंदिरात काही काळ  पुजारी होते. त्यांची  नेमणूक जिने केली होती ती राणी रासमस्ती ,श्रीमंत होती,राणी होती,पण दलित होती , हरिजन होती.त्यामुळे त्या वेळच्या प्रथेनुसार कोणी पुजारी पूजा करण्यास तयार नव्हता.अगदी क्रिया कर्म करणारा ब्राह्मण सुद्धा तयार नव्हता.रामकृष्ण यांची मंदिरात पुजारी म्हणून नेमणूक झाली. ते इतर पुजार्यांनपेक्षा वेगळे होते. निराळे होते.

रामकृष्णानची पूजा कधी दिवसभर चाले तर कधी ती अर्ध्या तासात उरकून जात.पूजा करताना ते कुठेतरी हरवून जात.कधी दृष्टी एकीकडे तर  चित्त आणखीन कुठे तरी असे.हा माणूस वेडसर वाटे,आता दुसरा पुजारी मिळत नाही तेव्हा चालवून घेणे भाग .कधी कधी ते स्वतच तीन चार दिवस गायब असत.कधी चार चार दिवस पूजेचे नावच नसे . कधी पूजेबरोबर वाजणारी घणटा रात्रभर वाजत राही. कधी कधी  दिवसभर घणटा वाजताच नसे.कधी हातात घणटा घेऊन नाचत नाचत पूजा करत.

ते कोणतेही पूजेचे नियम पाळत नसत.शेवटी विश्वस्थाना राहवले नाही त्यांनी विचारले,हा काय प्रकार आहे. तेव्हा रामकृष्णाननी  करुणेने  पाहिले आणि न बोलताच बोलून गेले,"पूजा थोडीच नियमानुस्रार होते,पूजा थोडाच कर्मकांड आहे.पूजा म्हणजे प्रेम आणि प्रेम थोडेच नियमानुसार होते.प्रेम हे वार्याच्या  झुळूके सारख आहे , झुळूक ती  केव्हा येते ते सांगता येते आणि आलीच तर पकडून थोडीच  ठेवता  येते"

रामकृष्णानची पूजा घड्याळाप्रमाणे  नव्हती, घड्याळाप्रमाणे पूजा करतो तो  धन्देवायिक पुजारी, रामकृष्णानची पूजा हृदययाप्रमाणे  होती.कधी कधी पूजा करताना ढसाढसा रडून पूजा करत, भावविवश होत.मला वाटते, असा दुसरा पुजारी होणे नाही. पतंजली समाधी पादात  ईश्वरप्रनिधानानीद्वा! द्वा म्हणजे ईश्वरप्रनिधानाने सुद्धा समाधीचा अनुभव येऊ शकतो असे म्हणतात याचे रामकृष्ण हेच योग्य उदाहरण होय.

ध्यानाचेही  तसेच आहे.ध्यानाची अमुक  एक अशी पद्धत असू शकत नाही.ध्यान  किती वेळ करता
ते महत्वाचे नाही. रामकृष्णानच्या  पूजेसारखे आहे. ध्यान कधी तास भर ,कधी अर्धा तास, कधी दहा मिनिटे,तर कधी क्षणभर. ध्यान म्हणजे प्रेम,अस्तित्वाप्रती असलेले प्रेम, वारर्र्याच्ची झुळूक,प्रेमाची झुळूक जेव्हा येते, तेव्हा ध्यान होत.

ध्यान म्हणजे  पळापळ  नाही,ध्यान म्हणजे पाठलाग नाही,

ध्यान म्हणजे स्थब्ध् बसणे नाही,ध्यान म्हणजे अट्टाहास नाही,

तोंड बंद करून  मूक होणे  नाही,ध्यान म्हणजे चिकटून बसणे नाही,

ध्यान म्हणजे  अभ्यासक्रम नाही,ध्यान म्हणजे नियमावली नाही,

ध्यान म्हणजे वारर्र्याच्ची झुळूक, पकडून थोडीच ठेवता येते,

तुम्ही सहजतेने,मोकळेपणाने, मनावरची सगळी बंधने सईल करून,
अपेक्षा न ठेवता बसा.

विच्रांरापासूनच अंतर वाढवा, जसे  तुम्ही विचारापासून दूर जाल,ध्यान सुरु होऊन जाइल.

ध्यान पकडून  थोडच ठेवता येते.ध्यान करावे लागत नाही ते होऊन जाते.



अजित भिडे

Friday, 25 April 2014

श्रध्येय विमलाजी ठकार , सांगावेसे वाटले म्हणून......


दादा मुंडले नावाचे एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व होते.दादांचे माझावर खूप प्रेम होते ,विश्वास होता. मला ते आदरणीय होते.चेंबूरमध्ये राहत होते.गोधरा पासून सुरवात झालेली गुजरातमधली दंगल नुकतीच शमली होती.दादांनी ठरवले डिसेंबर मध्ये माउंटअबू विमला ठकार यांना भेटायला जायचे.दादांनीच पत्रव्यवहार केला. विमलाबाईनकडून होकाराचे पत्र आले. दादा मुंडले,मिसेस मुंडले, गोपाल देशपांडे आणि मी अशी मोजकीच माणसे होती.प्रकृती आणि वय यामुळे विमलाजी  जास्त कोणाशी भेटत नसत.

माउंटअबूला आम्ही जवळच हॉटेल बुक केले होते, त्यामुळे विमलाजीना भेटणे सोपे जाणार होते
.
विमलाजीनी आम्हाला प्रथम भेटीसजवळ जवळ चाळीस मिनटे दिली.नंतर पुन्हा दुसरे दिवशी अर्धा तास,बस तेवढीच भेट ! 

विमलाजीनची छोटीशी मूर्ती, पांढरी खादीची साडी, स्थूल लोभस पवित्र ,व्यक्तिमत्व आजही मनात घर करून आहे.Spiritual vibrations’ म्हणून जर काही असतील तर 
तेंव्हा ती मी अनुभवली.आजही विमलाजीनची प्रथम भेटीतला सहवास आठवला की शरीरात विदूतलहर गेली असे वाटते,अंगावर रोमांच उभे राहते, चेहऱ्यावर रक्त प्रवाह वाढला आहे अशी वेगळीच स्थिती होते. 

बोलताना दादा मुंडलेनी विमलाबाई बालपणी ११ तास ध्यानावस्थेत होट्या तो विषय काढला. विमलाजीनी डॉ.सर्वपल्ली राधकृष्णांन यांचा ऊलेख केला, आपल्याला प्रेसिडेन्टची दुसरी टर्म मिळावी यासाठी खूप प्रयत्नशील होते, मोह एवढ्या मोठ्या विद्वानाला सुध्हा चुकला नाही.


विषय बदलायच्या ओघात मी म्हणून गेलो ‘आत्मसाक्षात्कार म्हणतात त्यासाठी मी जर मनाला समजावले, तर ते पुरेसे नाही का? मला कधी कधी वाटते मी आयुष्याती महत्वाची वर्ष अध्यात्माच्या नावाखाली फुकट तर घालवत नाहीं ना.” 


विमलाजीनी मला ताबडतोब सांगितले, ‘ती मनाच्या पलीकडली अवस्था आहे .

बेटा, तुला असे वाटते वेळ फुकट जातो तर, वेळ फुकट नको घालवू नकोस,हे सगळे सोडून दे ‘.

रूम वर आल्यावर माझ्या मूर्खपणाचा राग आला.विमलाजीनी झेन धक्का तंत्र वापरले होते.मी काही चूक करत नाही, मी ज्या मार्गावेर आहे तो योग्यच आहे, याची समज आली. या गोष्टीला १५/१६ वर्ष झाली आणि आता मी जे सांगतो ते पण ५ वर्ष जुने, 


पहाटे चार वाजता ध्यानाला बसलो होतो.साधारण पस्तीस मिनटे झाली, ध्यान खूप छान झाले. चहा घेताना माझ्या बायकोला  मी म्हंटले, बरेच दिवसानी ध्यान खूप छान झाले, विमलाबाई ठकार सुध्हा ध्यान करताना बरोबर होत्या.


एक महिना होऊन गेला. विजय तेरवणकर म्हणाला ‘सर तुम्ही नेहमी विमला ठकारांचा उल्लेख करता, एक लेख आला तुम्ही वाचलात का?’ विमलाजी गेल्या ही बातमी मी वाचली नह्वती. विमलाजी गेल्या ही बातमी माझ्या वाचनातून सुटून गेली.घरी आल्यावर मी बायकोला सांगितले विमला ठकार गेल्या, मला माहित नव्हत.


माझी पत्नी म्हणाली ध्यानाला बसला होता तो दिवस आठवा .स्मृती जरा मागे नेली, लक्षात आले तो दिवस ११ मार्च,होळी पौर्णिमा होती.विमलाजी गेल्या ११ मार्च २००९ म्हणजे दोन्ही दिवस एकच होते.
ध्यानाला बसलो असता विमलानशी कुठेतरी कनेक्ट झालो, कनेक्शन लागले, आपण जात असल्याचा संदेश बहुदा त्यांनी दिला असावा पण तो मला समजला नाही.योगायोग म्हणावे का
माहित नाही .एकमात्र झाले विमलजीना श्रध्येय का म्हणतात ते मला नव्याने समजले.

विमलाजीनी फारच सुरेख पद्धतीने, किती सोप्या शब्दात “जगावेगळे अध्यात्म “ सांगत.


आधार, आश्रय नव्हे,

आज,आता आणि ईथे महत्वाचे.

अध्यात्मात प्रगती करायची तर मी माझे मला ही 'म' ची बाराखडी विसरायला हवी.

जीवनात समग्रतेने रहा, जे करता,ते करताना अवधान असू द्या,आयाम महत्वाचा आहे.  

गती मध्ये शक्ती असते,त्या पेक्षा स्थिरतेत अधिक शक्ती असते,

शब्दात जेवढ सामर्थ्य आहे, त्यापेक्षा अधिक मौना मध्ये सामर्थ्य आहे.

साधनाही काही मिळवण्यासाठी नाही तर्,

शुद्धीकरणासाठी असते, purification of body, mind, perception.
                      
संतांच्या मांदियाळीत फिट बसणारी,

जे.कृष्णमूर्ती आणि विनोबाशी जवळीक असणारी, 
          


भूदान चळवळीत योगदान देणारी,स्ववेदानाशील चारित्र्यसंपन्न,

निस्पुह:... महान विदुषी     
       
संत श्रध्येय विमलजीना,

माझा नम्र प्रणाम.


अजित भिडे


Monday, 21 April 2014

श्री. नरेंद्र मोदी, कुंडली काय सांगते..


श्री. नरेंद्र दामोदर मोदी,यांचा गजर सर्वत्र सुरु आहे.
'अपकी बार मोदी सरकार'  हे गोष वाक्य सर्वांच्या  मनात रुजले आहे.
अनेकांच्या मनात  संदेह आहे, खरचं मोदी पंतप्रधान होणार का? 
अनेक ज्योतिषी सांगतात  हो मोदी पंतप्रधान होणार, कस असत वाजली तर पुंगी.
काही ज्योतिषी आपल्या विचारसरणी नुसार भविष्य सांगतात,मनात असते मोदी पंतप्रधान होऊ  नये.मग, सांगतात मोदी पंतप्रधान होणार नाहीत.

मी काही  मोठ्ठा ज्योतिषी नाही,  तसेच  कुडमुड्या ज्योतिषीही नाही एवढे मात्र खरे.भविष्य  कथनात अंदाज चुकू शकतात.कारण यात मेदनिय ज्योतिष, निवडणूक प्रक्रिया,वक्तीगत कुंडली, चलीतातले ग्रह, अनेक अंग आहेत.तरीही कुतूहल असते. अर्थात निवडणूक निकाल जाहीर झाले कि सगळेच बदलेल.

मी आपल्या पुढे मोदींची जन्म लग्नकुंडली , वास्तविक प्रमुख ग्रह, महादशा क्रम,  व्यक्तीची देहबोली, तेजोवलय, विचार  संक्रमण याचा सर्व बाजूने विचार करून  पुस्तकी नाही.पण सुटसुटीत शब्दात मांडतो.

                                              श्री. नरेंद्र दामोदर मोदी,जन्म लग्नकुंडली

जन्म१७ /०९/१९५० सकाळी ११;०० मेहसाना गुजरात.
वृश्चिक  लग्न आणि  वृश्चिक रास, लग्नी मंगळ आणि चंद्र. वृश्चिक लग्न ०१:१५;२२ अंश त्यामूळे तुला लग्नाचा सुद्धा प्रभाव आहे.

मोदीचे  करारी व्यक्तिमत्व, धारदर नेतृत्व, अग्रेसिव लीडरशिप हे वृश्चिक आणि हसरे व्यक्तिमत्व तसेच स्पष्ट विचार हा तुलाचा प्रभाव दाखवतो. जन्मजात शनि महादशा  ०९/१०/१९६१ पर्यंत होती भावचलीतात रवि ,बुध दशम स्थानात येतात शुक्र  आणि रवि महादशा कसोटीच्या गेल्या. हा  कालखंड १०/१०/१९८५ ते ०९/१०/२०११ यात राजकीय  उदय, मुख्यमंत्री, आरोप- प्रत्रारोप.त्यात दटून राहणे, न्यायालीन मुकाबला आपण पहिला आहे.

सध्या चंद्र.महादाश्या  अंतर्गत राहू अंतरदशा १०/०३/२०१३ ते ०९/०९/२०१४ पर्यंत.

गुरु ३१/०५/२०१३ पासून मिथुन राशीत म्हणजे अष्टमात आहे ,तरीही याच  काळखंडात पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून नाव जाहीर झाले. पक्षातले सहकारी यांना मोदी स्वीकारावे लागले,इतर राजकीय विरोधक प्रभाव हरून बसले. सध्या शनि आणि  राहू तूळ मध्ये गेले वर्षभर आहेत.राहू कन्येत १३/०७/२०१४ ला येतो आहे  म्हणून काळजीचे कारण मला दिसत नाही.

गुरु   १७/०९/२०१४ पासून कर्क  राशीत येतो.म्हणून काही  ज्योतिषी   शंका व्यक्त करतात की मोदीना गुरुबळ नाही ते बरोबर वाटत नाही.

एक  वेगळी शक्ती मोदीच्या मागे आहे.कुंडलिनी शक्ती क्रियावती झाली की त्याचा प्रभाव इतरांवरही पडतो. 
Every thought has tendency to realized यालाच   thought dynamics म्हणतात . 

झोपलेल्या माणसाच्या  पत्रिकेतले ग्रहही झोपलेले असतात,जो क्रियावान आहे त्याचे ग्रह ही  फळतात.जो कमकुवत असतो तो ग्रहांचा आधार शोधतो.

मी एवढेच आश्वस्थ करतो की मोदी आपल्या मिशन मध्ये यशस्वी होणार.

अजित भिडे

Saturday, 12 April 2014

शहाणपण !!!


एका लहानश्या गावात एक साधा सरळ माणूस रहात होता. साधा होता, सरळ होता, भोळसट होता.त्याचा हा भोळसटपणा, साधेपणा पराकोटीचा होता. त्या भोळसटपणातून काहीतरी बोलून जायचा, लोक त्याची टेर घायची, टिंगल करायचे, आणि मग तो मूर्ख ठरे .

सगळे गाव त्याची मूर्ख म्हणून सतत टींगल करायचे. तुला काही कळत नाही, तू येडा आहेस, तोंड उघडले काही बोलला की टिंगल, हेटाळणी. सतत टेनशॅन मध्ये असायचा. याचा एकत्रित परिणाम तो भित्रा बनला, कॉंप्लेक्स निर्माण झाला.आयुष्य त्रासदायक झाले.

त्यालाही त्याच्या मूर्खपणाचा कंटाळा आला होता.गावात एक हुशार, बुद्धीवान, धूर्तमाणूस होता.तो त्याला भेटला, आपली लोक कशी मजा उडवतात,मूर्ख बनवतात हे सांगितले.आता मी काय करू काहीच  पर्याय दिसत नाही  असे सांगितले.

त्या हुशार माणसाने त्याला सल्ला दिला ,कोण म्हणतो तू मूर्ख आहेस, येडा आहेस, तू साधा निष्पाप आहेस .लोक तूला टार्गेट करतात.आता तूच त्याना टार्गेट कर.उद्या पासून सारा आविर्भाव बदलायचा, तू स्वताला forcefully project  कर .तुझ्या बोलण्यात आक्रमकता आण,ठासून बोल खरेखोटे विचार करू नकोस.

काही नाही ,केवळ येवढच कर, जर कोणी कुणाची स्तुती करत असेल ,तर तू लगेच त्याची नालस्ती करायला लाग. कोणी म्हणाले हा माणूस सज्जन आहे, तर तू तत्काळ सांग ,नाही हो तो पक्का लफंगा आहे.

एकदी स्त्री शालीन आहे, असे कोणी म्हणाले  तर हलक्या आवाजात म्हण काय पुरावा आहे तुमच्या कडे. एखादी स्री सुंदर आहे असे जर कोणी म्हणाल तर लगेच विचार काय सुंदर आहे तिच्यात ? तीच नाक सुंदर आहे, डोळे सुंदर आहेत का , केस सुंदर आहेत, सांगा काय सुंदर आहे. सुंदरपणाची व्याख्या करता येत नाही. मला सांगा, तिच्या सुंदरपणाचा काय पुरावा आहे तुमच्याकडे?

कुणी म्हणाले हे पुस्तक चांगले आहे,तर तू तत्काळ सांग ,मी ते वाचले आहे,अभ्यास केला आहे.तू ते वाचले नाहीस याची तमा बाळगू नकोस, सरळ बेधडक सांग ते पुस्तक बेकार आहे.

कुणी म्हणाले सूर्योदय काय छान आहे .तू लगेच म्हण काय छान आहे, ह्यापेक्षा अधिक चांगला सूर्योदय मी पहिला आहे, हा तर अगदीच सामान्य आहे.

कुणी म्हणाले हे चित्र छान आहे. तर सांग ,केवळ कॅनवास आणि नुसते रंग सांडले आहेत,अर्थ शून्य आहे हि कलाकृती एखादे शेंबडे पोर देखील चांगले चित्र काढेल.

कुणी म्हणाले हा माणूस खरोखर समाजसेवा करतो,  तर तू तावातावाणे म्हण, ठासून सांग, निस्वार्थी कसला हा पक्का भ्रष्ट आहे, चोर आहे.

तू सतत नकार देत रहा, पुरावे मागत रहा, बेधडक टीका करत रहा.कोणी प्रश्न केला तर तू उलट प्रश्न कर तू उत्तर् दिलस तर दोष काढले जातील,प्रश्नाला उत्तर् न देता तूच उलटा प्रश्न करत जा. प्रत्येक शब्दाचे, प्रत्येक वाक्याचे explanation  माग. समोरच्या माणसाला भंडावून सोड,

आठवडाभरात लोकांना वाटायला लागले हा माणूस प्रतिभावान आहे, हुशार आहे, आपण चुकीच समजत होतो त्याला .कोणतेही चित्र दाखवा तो लगेच दोष दाखवतो, ग्रंथ दाखवा त्रुटी दाखवतो त्याचापाशी टीकाकारची बुद्धि आहे.त्याच्या समोर यायला लोक घाबरायला लागली. कोणी प्रश्न विचारयला धजेना.

आता परिस्थिती बदलली, जो सतत घाबरलेला असायचा त्यालाच लोक घाबरु लागले कुठल्याही निषेधात्मक गोष्टीवर चटकन विश्वास बसतो.नकारात्मक गोष्ट असिद्ध करणे कठीण असते.जेथे गुण दिसेल तेथे निषेध करू शकता.

तो बुद्धीवान माणूस महिन्या नंतर परत आला.तो म्हणाला छान असेच चालू ठेव. आता हा नवशहाणा त्या बुद्धीवान माणसाला म्हणतो, तुम्ही खरोखर मूर्ख आहात,मला उपदेश करू नका.

आता ह्या नवप्रतिभावान माणसाने ज्याला आपण आधी हुशार, बुद्धीवान, धूर्त समजत होतो, त्यालाच मूर्ख म्हटले, म्हणजे तो पूर्वीचा बुद्धीवान हा मूर्खच असला पाहिजे, असा गावातल्या लोकांचा समज झाला .गुरुची विद्या गुरुला भारी.

हि शॉर्ट स्टोरी आहे एका जुन्या जमान्यातील रशियन लेखकाची टेर्जीनीव्ह.
आजच्या समाज जीवनाचे प्रतिबीब मला त्यात दिसते.

कथेच नाव फ़ूल (मुर्ख) ,त्यात थोडासा बदल करून सागितली .

अजित भिडे