रामकृष्ण दक्षिणेश्वेराच्यामंदिरात काही काळ पुजारी होते. त्यांची नेमणूक जिने केली होती ती राणी रासमस्ती ,श्रीमंत होती,राणी होती,पण दलित होती , हरिजन होती.त्यामुळे त्या वेळच्या प्रथेनुसार कोणी पुजारी पूजा करण्यास तयार नव्हता.अगदी क्रिया कर्म करणारा ब्राह्मण सुद्धा तयार नव्हता.रामकृष्ण यांची मंदिरात पुजारी म्हणून नेमणूक झाली. ते इतर पुजार्यांनपेक्षा वेगळे होते. निराळे होते.
रामकृष्णानची पूजा कधी दिवसभर चाले तर कधी ती अर्ध्या तासात उरकून जात.पूजा करताना ते कुठेतरी हरवून जात.कधी दृष्टी एकीकडे तर चित्त आणखीन कुठे तरी असे.हा माणूस वेडसर वाटे,आता दुसरा पुजारी मिळत नाही तेव्हा चालवून घेणे भाग .कधी कधी ते स्वतच तीन चार दिवस गायब असत.कधी चार चार दिवस पूजेचे नावच नसे . कधी पूजेबरोबर वाजणारी घणटा रात्रभर वाजत राही. कधी कधी दिवसभर घणटा वाजताच नसे.कधी हातात घणटा घेऊन नाचत नाचत पूजा करत.
ते कोणतेही पूजेचे नियम पाळत नसत.शेवटी विश्वस्थाना राहवले नाही त्यांनी विचारले,हा काय प्रकार आहे. तेव्हा रामकृष्णाननी करुणेने पाहिले आणि न बोलताच बोलून गेले,"पूजा थोडीच नियमानुस्रार होते,पूजा थोडाच कर्मकांड आहे.पूजा म्हणजे प्रेम आणि प्रेम थोडेच नियमानुसार होते.प्रेम हे वार्याच्या झुळूके सारख आहे , झुळूक ती केव्हा येते ते सांगता येते आणि आलीच तर पकडून थोडीच ठेवता येते"
रामकृष्णानची पूजा घड्याळाप्रमाणे नव्हती, घड्याळाप्रमाणे पूजा करतो तो धन्देवायिक पुजारी, रामकृष्णानची पूजा हृदययाप्रमाणे होती.कधी कधी पूजा करताना ढसाढसा रडून पूजा करत, भावविवश होत.मला वाटते, असा दुसरा पुजारी होणे नाही. पतंजली समाधी पादात ईश्वरप्रनिधानानीद्वा! द्वा म्हणजे ईश्वरप्रनिधानाने सुद्धा समाधीचा अनुभव येऊ शकतो असे म्हणतात याचे रामकृष्ण हेच योग्य उदाहरण होय.
ध्यानाचेही तसेच आहे.ध्यानाची अमुक एक अशी पद्धत असू शकत नाही.ध्यान किती वेळ करता
ते महत्वाचे नाही. रामकृष्णानच्या पूजेसारखे आहे. ध्यान कधी तास भर ,कधी अर्धा तास, कधी दहा मिनिटे,तर कधी क्षणभर. ध्यान म्हणजे प्रेम,अस्तित्वाप्रती असलेले प्रेम, वारर्र्याच्ची झुळूक,प्रेमाची झुळूक जेव्हा येते, तेव्हा ध्यान होत.
ध्यान म्हणजे पळापळ नाही,ध्यान म्हणजे पाठलाग नाही,
ध्यान म्हणजे स्थब्ध् बसणे नाही,ध्यान म्हणजे अट्टाहास नाही,
तोंड बंद करून मूक होणे नाही,ध्यान म्हणजे चिकटून बसणे नाही,
ध्यान म्हणजे अभ्यासक्रम नाही,ध्यान म्हणजे नियमावली नाही,
ध्यान म्हणजे वारर्र्याच्ची झुळूक, पकडून थोडीच ठेवता येते,
तुम्ही सहजतेने,मोकळेपणाने, मनावरची सगळी बंधने सईल करून,
अपेक्षा न ठेवता बसा.
विच्रांरापासूनच अंतर वाढवा, जसे तुम्ही विचारापासून दूर जाल,ध्यान सुरु होऊन जाइल.
ध्यान पकडून थोडच ठेवता येते.ध्यान करावे लागत नाही ते होऊन जाते.

अजित भिडे

No comments:
Post a Comment