Monday, 20 October 2014

आठवणीतली दिवाळी....


जमाना बदलला, आपले विचार बदललेत,जुने ते सगळे सोडायचे,
नवीन गोष्ठी स्वीकाराच्या आजच्या जमान्यात दिवाळीचा सण,
उत्सव बदलून राहिला आहे,कात टाकतो आहे.


आकाश कंदील लावत होतो आणि एकदम आठवणीची कॅसेट पळायला लागली,
दिवाळीची  सुट्टी एकवीस दिवस असायची.सहामाही परीक्षेचा
निकाल  पोस्टाने घरी यायचा,त्या साठी पोस्टमनची रोज वाट पाहायची, आजूबाजूचे शेजारीची मुले  पण पोस्टमनची वाट पाहायची,ती मजावेगळीच.


झुकू झुकू अगीन गाडी, धूरांचा रेषा हवेत गाडी मामाच्या गावाला जाऊ या......
दिवाळीच्या सुटीत मामाकडे राहायला जाण्याची मजा औरच  असायची.एखादा सिनेमा
मामाकडे वाहायचाच पुन्हा मामाची मुले परत आपल्या घरी राह्यला यायची,
गंमत असाचची.आज कोणी कोणाकडे राह्यला जात नाही.

आकाश कंदिल बनवण खुप मजा यायची बांबूची काठी तासून शेपटीअसलेला पारंपरिक
आकाश कंदिल बनवण्यातली मजा वेगळीच, कोणी चांदणी बनवायाचे,तर कोणी फिरता
आकाश कंदिल,तर कोणी उत्साही रात्री पतंगबरोबर  कंदिल आकाशात सोडत.दारात
पणत्या  लावल्या जात, पणतीचे दिवे लावले जायचे,माळा  पण लावत.

प्रत्येकघरी साफसफाई व्हायची,दिवाळीची साफसफाई वेगळीच काही जण घराला
रंगरंगोटी करत, उत्साह काही वेगळच असे.लहानमुले विचारत दिवाळी कुठेपर्यंत आली ?
तेव्हा मोठी माणसे सांगत दिवाळी स्टेशन पर्यंत आली,नाक्यापर्यंत आली....
परवा आपल्या घरी येईल !

दारात ठीबक्यानची किवा एखादा सीन रांगोळीत काढला जात असे. दिवाळीत  बराच
ठिकाणी सुंदर अशी रांगोळीची प्रदर्शन भरत.आज सगळे खुप कमी झाले आहे,कमी नाही,
तर नाही असेच  होत आहे,

मला आठवते,दिवाळीतले फटके उंन्हात वाळवायचे,का तर नळे,चंद्राजोय्ती  लवंगी
माळ चांगले वाजवेत आणि सकाळी शेजारच्या घरातून पहिला फटका वाजायच्या
आधी आपला वाजला पाहिजे हि चढाओढ असायची.

दिवाळीला नवीन कपडे ,नवीन वस्तूची  खरेदी वाहायची.सगळी कडे उत्साह असे.
मला आठवते.माझी आजी सकाळी रेडीओवर नरकासुर वधाचे कीर्तन एकेत असे.
वातावरण मंगलदायी असायचे.

सकाळी लवकर उठून  उटणे ,सुवासिक तेलाने आंघोळ , नवीन कपडे ,मग सर्वानी
मिळून देवळात जायचे.घरी परत आल्यावरफराळ करायचा चकली,शेव,चिवडा, लाडू,
शंकरपाळे, चिरोटे,अनारसे असा पारंपारिक फराळ.आपला घरी केलेला फराळ शेजारच्या
घरी वाटायचा,आपल्या घरी त्यांचा फराळ यायचा.त्या सगळ्यात एक आपलेपणा,
ओलावा असायचा! आजच्या  फास्ट फूडच्या जमान्यात किती जणांना हा  फराळ आवडतो ?

सुटीत होमवोर्क दिलेला असायचा तो करू करू म्हणत,शेवट पर्यंत करायचा राहून जायचा
शेवटच्या दिवशी धावपळ  व्हायचीच ती व्हायचीच,ती मजा पण  औरच यार!

भाऊबीजेला आईचे भाऊ म्हणजे मामा मंडळी यायची .भाऊबीज भाऊबीजेला साजरी
वाहायची. आज आपण आपल्या सोयीने केव्हाही करतो चूक ते  आहे, मी म्हणत
नाही.आमचाकडे आदल्या दिवशी दुध आटवून भाऊबीजेला बासुन्दीचा बेत असायचा.
आज  सगळे जण  हेंल्थ बद्दल  जागृत,कोणाला मधुमेह ,तर कोणाच वाढीव वजन
म्हणून गोड नको असते. बाहेरहून मिठाई आणण्याकडे  कल असतो काजुकत्री ,काजुरोल!

लक्ष्मिपूजन  उत्साहात  वाहायचे, मुंबई शेयर बाजारात मुहूर्त trading  ची मजा पण वेगळी
असायची.आज नेट वर पण ते मुहूर्त trading  होते  ट्रान्सफ़रन्सी आहे पण ती मजा नाही.

आजची दिवाळी त्याचे स्वरूप बदलून गेले आहे. अनेक जण  भेट वस्तू देवून हा सण
सेटिंग साठी वापरतात,पोस्टातून पत्र बंद झाली ,पण  पोस्टमन पोस्ट मागतो.घरकाम
करणारी बाई, पेपरवाला दिवाळी मागतो.आपण ती देतो.ते सगळे अजून तसेच आहे

दिवाळी अंक खुप चांगले निघत,आवाज ,दीपावली ,वसंत ,किर्लोस्कर, ,माहेर
प्रत्येक जण विकत घेऊन वाचत ,आज सगळे बंद झाल्यात जमा आहे .म्हणून म्हणतो
दिवाळी कात टाकते आहे. आज आपण सर्वजण दिवाळी साजरी करतो असे न म्हणता
मनावतो असे म्हणणे जास्त योग्य  वाटते.

सहज आठवली एक कविता, दीपावली बद्दलची माझ्या आईने केलेली .....

आज  दिवाळी आली घर हो चला चला ! चला चला मजा करा !

दीपवालीची सुट्टी पडली शाळेची तर कटकट  मिटली !!
लवकर उठण्या आईचा हो लकडा  पाठी नसे तरी !
आज  दिवाळी....

लाडू चिवडा शेव अनरसा !चकली आणिक कानवला !
फराळ करण्या चला बसू रे आई सांगाते  आपणाला !
आज  दिवाळी! !!

तरेतऱ्हेचे  दीप लाउनी आकाश दिवा वर चढवोनी !
आनंदाने  नाचू  गाऊ प्रकाशात ह्या  दीपांच्या ! !

आज  दिवाळी आली घर हो चला चला ! चला चला मजा करा !

अजित भिडे


1 comment:

  1. सर नमस्कार

    आपल्या ह्या लेखनात आलेला फिरता कंदिल.

    तो बनवायची कृती पाहिजे.

    मोहन पोटे गोराई मुंबई
    भ्रमण ध्वनी क्र.९९६९१६५४४६

    ReplyDelete