Friday, 24 May 2013

यशोधरेची खंत !



रविन्द्र्नाथांची  एक कविता मागे मी तुम्हाला सांगितली होती ,ये मृत्यू ये आणि तुझे गुपित तू माझ्या कानात हळुवार सांग !

आणखी एक सुंदर कविता आहे,त्यात यशोधरेची  खंत फारच मार्मिकतेने त्यांनी  व्यक्त केली आहे .

उद्याच्या  बुध्द पौर्णिमेचे औचित्य साधून आज  तुमच्याशी share  करतो.

सिद्धार्थचे  चोर पावलांनी  महालातून जाणे 

सिध्दार्थ हे,गौतम बुद्धाचे  बुद्ध होण्याआधीच नाव.बारा वर्षा नंतर बुद्ध यशोधरेला  भेटावयास येतो. आणि महालात तो यशोधरेची भेट घेतो. त्यावेळेस  यशोधरा आपला राग व्यक्त करते आणि सिद्धार्थला ती विचारते," तुम्ही  बुद्ध झालात  ठीक आहे पण , मला आपण एकाच गोष्ट सांगा, जर तुम्ही मला सागून गेला असता तर मी तुम्हाला अडवलं असते असे आपल्यालाला का वाटले .
मी एक क्षत्रीय स्री आहे,माझ्या क्षत्रीयत्वावर तुमचा विश्वास  नाही का ?


                                                                                         
क्षत्रीणि  आपल्या पतीला टिलक लावून  रणांगणावर  पाठवते  आपण , तर सत्याच्या शोधसाठी, बुद्धत्वासाठी बाहेर  पडला होता .आपण तर समाधीसाठी निघाला होता,चोरून
जाण्याची काय आवश्कता होती ?आपण जर मला सांगून गेला असता तर मी आपले चरण धुतले असते,फुले वाहिली असती, ओवाळले असते,आनंदाने निरोप दिला असता.आपण  इतकाही  भाग्य  मला दिले नाहीत.

आपला माझावर विश्वास नव्हता ? का आपल्याला  भीती वाटत होती मी रडेन,ओरडेन,त्रागा करेन, किंणचाळेन? बारा वर्ष मला एकच बोच, सल लागून राहिली आहे तुम्ही का मला सांगितले नाही,एवढा पण भरोसा नव्हता का ?

बुद्धत्ववासाठी पत्नीला आणि मुलाला सोडून जावे लागते का? कवितेतल्या  बुद्धाला उत्तर देता आले नाही. काय उत्तर होते,चूक त्याची होती,शिक्षा यशोधेरला छोट्या  राहुलला, बुद्धाचे डोळे भरून आले आणि गुपचूप माघारी फिरला .

बुद्धात्वाचा शोध राहू दे, आपण सुद्धा  आपल्या पत्नीला 
विश्वासात घेतो का ? आपण सुद्धा  तिच्यावर  भरोसा
ठेवतो का ?  का आपणही......
गुपचूप माघारी   फिरणार ?

विचारा तुम्हीच  स्वताला !

संसारात दुखं का आहे ,ते दूर करता येत, हे सांगण्यासाठी यशोधेरला  फसवून जाणे  गरजेचे नव्हते,  तुमच्या पत्नीला,यशोधेरेची  बोच देऊ नका !!!


अजित भिडे                                    

No comments:

Post a Comment