Tuesday, 30 April 2013

कालाहंडीचा म्हातारा .....

कालच वर्तमान पत्रात बातमी वाचली  ओरिसा मधील कालाहंडी आणि रायगडा जिल्ह्यात वेदांताचा अल्युमिनियम प्लांट पुन्हा सुरु व्हावा ,यासाठी दहा हजार लोकांनी निदर्शन केली.बातमीत कालाहंडीचा  उल्लेख आला आणि जे आठवल  ते तुमचाशी share करतो.

तीन चार वर्षा पूर्वी 'वाईज अन्ड अदरवाईज' हे सुधा मूर्ती यांचे मराठीतले अनुवादित पुस्तक वाचनात आले होते. त्याना आलेला अनुभव  म्हणजे कालाहंडीचा म्हातारा त्यांनी रेखाटला होता . मला तो खूप भावला, तो कालाहंडीचा म्हातारा मला  लाओत्सेचे तत्वज्ञान सांगणारा  ज्ञानी ,प्रज्ञावंत वाटतो. बुद्धत्वाला पोचलेला तो आदिवासी म्हातारा माझ्यावर प्रभाव टाकून आहे.


आदिवासी नेहमी घोळक्याने राहतात ,सुसंस्कृत लोक रूढी परंपरा रितीरिवाज यांचा जसा बाऊ करतात  तसा आदिवासी करत नाहीत . खाजगी मालमत्ता हि संकल्पना त्यांच्या जवळ  आढळत नाही. असाच एक सत्तरिचा म्हातारा ,सुधा मूर्तीना भेटतो ,त्या त्याला विचारतात ; ह्या देशावर राज्ज कोणाचे ?'म्हातारा उत्तर  देतो ,
'कंपनी सरकारचे' कंपनी सरकारचे' म्हणजे East India Company.चे थांबा,   विचार  करा  , ह्या  देशाला  चालवतो  कोण ?


सुधा मूर्ती त्याला १०० रुपयाची नोट दाखवतात , गांधीबाबाचा फोटो दाखवतात,देश प्रजासातक झाला, हे पटून देण्याचा यन्त करतात, पण त्याला पटत नव्हते.
आदिवासीन मध्ये आजही Barter system ने व्यवहार होतात.

"ह्या कागदाच्या नोटेने  तू सरपण,आणू शकतोस ,खूप साड्या, गुळ, मिठाची गोणी,आगपेट्या,ज़मिनीचा तुकडा घेऊ शकतोस, जमीन तुमच्या मालकीची  होऊ शकते" .

तो  म्हातारा दया आल्यागत पाहत जे बोलला ते लाख मोलाचे होते. दुभाष्याच्या  साहयाने संवाद सुरु होता.तो कालाहंडीचा म्हातारा बोलून राहतो ,

"तुम्ही ह्या कागदाच्या तुकड्यासाठी आपापसात भांडता,वाडवडीलांनी ठेवलेल्या जमिनी सोडून दूसरीकडे जाता या कागदाच्या तुकड्यावीणा  आमचे वडील सुध्हा जगले''.

''आम्ही देवाची लेकरे आहोत ,कागदाशिवाय पिढानपीडया जगत आलो आहोत.
इथे जमीन कोणाच्या मालकीची नाही ,इथली नदी आम्ही बनवलेली नाही ,
कोणताही पर्वत आम्ही  बनवलेला नाही ,वारा आमची आज्ञा पाळत नाही ,
पाऊस कोसळण्याआधी ,आमची परवानगी घेत नाही .या परमात्म्याच्या देणग्या आहेत ''.

"भूमि खरेदी कोण करणार, मला तुमच समजत नाही ,इथेले  जर काहीच तुमच्या मालकीचे नाही ,तर मग हे देवाणघेवाणिचे व्यवहार  तुम्ही कश्याच्या जोरावर करता? तुमच्या हया लहानश्या कागदाच्या तुकडयाने, आमच्या आयुष्यात उल्थापालाथ घडेल".

या माणसाला कोणत्या शब्दात  उत्तर  द्यावे ,सुधा मूर्तीना समजले नाही ,त्यांची समजूत होती त्यांचे ज्ञान, त्याच्याहून जास्त आहे . शेयर बाजार ,चलनफुगवटा ,लोकपाल ,२ जी  स्पेक्टरम,बिलगेट, ओबामा IPL, हे आपल्याला ठाऊक आहे .ह्या आदिवासी  म्हाताराला कशाची माहिती  नाही, पण  त्या पेक्ष्या सखोल चिरंतन सत्य तो जाणत होता आणि जगत सुद्धा  होता .

हा कालाहंडीचा म्हातारा ,म्हणजे मला लाओत्से वाटतो.
त्याच्या डोळ्यात विलक्षण चमक असली पाहिजे ज्ञानी , प्रज्ञावंताची   चमक !

बातमी वाचून विचार आला तो म्हातारा आता अनंतात  विलीन झाला असेल,ती भूमी आता Virgin राहिली नाही .सारेच बदल आहे तरी चिरंतन मुल्य नाही बदलणार,असे आज तरी म्हणूया ……

अजित भिडे

1 comment:

  1. Hi,

    Ajeet, sorry comments are in Eng. Excellent info, I had read it in her book but good to recall.

    Milind

    ReplyDelete