Friday, 28 June 2013

थोडासं हटकून, जरा हे करून पहा …


परवा  कुमटा  स्टेशनहून  ट्रेनने मुंबईला येत होतो. मडगावला ट्रेनमध्ये दोन मराठी  कुटुंबे चढली नवरा बायको आणि दोन मुले अशी सहाजण होती .ट्रेन सुरु झाली.त्यांच्या गप्पा रंगायला लागल्या .एका बाईने पर्संमधून  प्लास्टीकच्या अंगठी सारखे बोटात सहाही जणाना  घालावयास दिले.प्रत्येक जण ते छोटेसे यंत्र वापरत होते.कुतूहलापोटी मी विचारले तेव्हा त्यांनी सांगितले ‘आम्ही जप करतो आणि किती जप झाला याची गणना करतो.’

याला नामस्मरण म्हणायचे कि जप? माझ्या अध्यात्मिक साधनेत बसत नव्हते.

टेनिसन(Tennyson) नावाचा एक इंग्रजी कवी होता. Early spring आणि Break, Break, Break ह्या कविता तुम्ही वाचल्या असतील, नसतील तरीही हरकत नाही.

त्याने लिहून ठेवले आहे कि "मी जेव्हा लहान होतो तेव्हा मला लवकर झोपायला पाठवत. घरातले लोक उशिरा पर्यंत जागे असत,मुलांना मात्र लवकर झोपायला पाठवत.प्रत्येकाच्या खोल्या स्वतंत्र होत्या .

टेनिसन म्हणतो" मला लवकर झोप येत नसे. दरवाजे बंद केले असत, खोलीत अंधार असे रात्री अंधारया खोलीत मी एकटा, झोप येत नाही म्हणून बिछान्यावर पडलेला असे. कुठे काही आवाज झाला भीती वाटायची लहानपणी भुताच्या गोष्टी ऐकलेल्या असायच्या भीतीने थरकाप व्हायचा"

'माझे वडील नास्तिक होते त्यांनी मला प्रार्थना शिकवली नाही, देवाचे नाव घ्यायला शिकावले नाही, मग मी काय करणार?
घाबरून कोणाला हाक मारावी कोणी येणार नाही, हे मला माहित होते. मग मी स्वताःलाच  हाक मारायला सुरवात केली, मी म्हणू लागलो, ‘टेनिसन ,टेनिसन, टेनिसन......
मला थोडासा धीर येई मी मोकळा होई मग मला झोप लागे.बघा तुम्ही घरी एकटे आहात तुम्हाला झोप येत नाही, वाचनाची हि आवड नाही मग तुम्ही  T.V. लावता. Channel फिरवता समोर चित्र दिसतात, आवाज ऐकू येतो तुम्हाला सुरक्षित वाटू लागते टेनिसन म्हणतो" टेनिसन टेनिसन म्हणायची मला सवय लागली.कधी
कुठलाही तणाव वाटला कि टेनिसन म्हणत असे. टेनिसन हा माझा मंत्र झाला.

कोणी म्हणतात मला गुरूने अमुक एका नावाचा  जप सांगितला आहे.कोणी म्हणते मला "नाम" द्या मग मी जप सुरु करतो .


तुम्ही टेनिसनची गोष्ट ऐकलीत मी म्हणतो, तुम्ही स्वताःच्या नावाचा जप सुरु केलात तरीही खूप आहे ते ! स्वताःचे नामहि तुम्हाला परमात्म्याकडे पोचवू शकते .

दोन शब्दाच्या उच्चारामध्ये, अंतर्यामी एक स्पंद, शांतता अनुभवता येते. हळूहळू तुम्ही साक्षी होता.

जप नामस्मरण हे काही गप्पा मारताना time pass  चे साधन नाही.

अजित भिडे


Monday, 17 June 2013

सांगावेसे वाटले म्हणून .................


सांगावेसे वाटले म्हणून   ......

संकल्प  प्रत्येक जण करतो .पण अनेकांचे संकल्प हे वरवरचे असतात्त .स्वताचे अपयश झाकण्यासाठी संकल्प केलेला असेल तर त्यात प्रामाणिकपणा असतोच,असे ठामपणे म्हणता येत नाही .आमच्या कार्यालयात एक महाभाग आहे,अनेक वेळेस त्याने  प्रोमोशन साठी प्रयेत्न केला ,  परीक्षात  पास होई, मुलाखत चांगली होई ,पण माशी कुठे शिंके समजायचे नाही. गेली चार/पाच वर्ष हेच घडते , इतरानचे प्रोमोशन होते ,पण त्याचे नाव लिस्ट मधून गायब असायचे .

मग तो सांगू लागला , माझ्या प्रोमोशनची पार्टी  मी देईपर्यंत इतरांच्या प्रोमोशनत  पार्टी सहभागी होणार नाही. ह्या विचाराला त्याने संकल्पाचे गोंडस रूप देले . इतरांची सहानभूती मिळवली. इतरांनचे प्रोमोशन होते माझच का नाही, हा प्रश्न पडू शकतो, म्हणून मी  इतरांच्या  आनंदात  प्रोमोशनत  पार्टीत, मी सहभागी होणार नाही  हे काही ह्या प्रश्नाचे उत्तर बनू  शकत  नाही ? हा नसविकृती प्रकार होय ,मला वाटते  हा प्रकार दबलेल्या, कुंठीत भावनेतून होतो.

ह्याला मी तरी संकल्प म्हणणार नाही.तुमच्याही बाबतीत असे होऊ शकते तेव्हा  तुम्ही असा विचार कराल का ? प्रत्येकाला निर्णय घेण्याची मुभा आहे, पण तो मोकळेपणाने का कुंठित भावनेने निर्णय घ्यायचा तुमचे तुम्ही ठरवा.

तसेच प्रार्थने बद्दल . अनेक  माणसे मी पहिली आहेत. गणेश  उत्सवात अनेक जण लालबागच्या गणपतीला दहा /दहा  तास रांगेत उभे राहून दर्शन घेतात. नवस बोलणारांची रांग वेगळी ,दर्शनासाठी रांग वेगळी ,नवस  फेडायला आलेली वेगळ्या रांगेत .


माझ्या पहाण्यात दोन/तीन माणसे आहेत दर वर्षी रांगेत उभे राहून तोच तोच नवस ,साकडे  त्या गणेशाला घालतात आणि त्या वेठीस धरतात.देवाला लालूच नाही, लाच देवू करतात. चांदीचा मुकुट ,सोन्याचा उंदीर, सोन्याचा मोदकाची लाच , ढेर सारे पैसे देवाला अर्पून , आपण आपल्या इच्छा  पूर्ण करण्याचा वेडेपणा करतो .हे देवाकडे करू घातलेल स्पॉट फिक्सिंग.

देव एकतो हो ?  जरा  टक्केवारी तपासून पहा ,देवावर विसंबून  राहणे फायद्याचे नसले, तरीही तीच तीच चूक आपण करत असतो.
यशाचा मार्ग सातत्य ,आत्मविश्वास आणि योग्य कृती मुळे सफळ होतो. कोणाला सांगयला जावे, तर आपण वेडे ठरतो .

प्रयत्नच  न करण्या पेक्षा, प्रयन्त करून आलेल अपयश श्रेयस्कर असते. प्रयन्त सारेच करतात ,मेहनत सारेच जण घेतात तरी यश सर्वांच्याच पदरात पडतच असे नाही. प्रत्येक आव्हानातून  तुमच्यातील सुप्त शक्तीची ओळख  होते, संघर्षातून बळ  येत ,संभ्रमातून बाहेर यायला सबुरी  ठेवावी लागते .

तुम्ही निर्णय घेण्यास चालढकल केलीत तर नियतीला निर्णय घ्यावा लागतो ,ती थांबत नाही । निर्णय टाळून अपयश टाळता येत नाही . एखादि चांगली संधी मात्र हातातून निसटून जाते,हे अनेकांच्या ध्यानात शिरत नाही.

अजित भिडे

Sunday, 2 June 2013

नानकाचा नमाज..............



आज सकाळी फिरावयास गेलो होतो,स्टेशनवर एक चावीवाला दुकान मांडत होता,
मलाही एक एक्स्ट्रा चावी बनून घ्याची होती,म्हणून मी थाबलो चावीवाले बहुधा मुसलमान असतात.

चावीवाल्या बरोबर एक जण हुजत घालत होता ,"जिसे काबा   पढने नही आता, वो मुसलमान नही"
                                                           चावीवाला उसकला,"जो नमाज नहि पढता वो मुसलमान  नहि, 


     जो जुम्मेको तीन बार नमाज पढता वो हि सच्या मुसलमान ".
     चावी बनत होतीवाद गरम होत होता,
     मी ऐकत होतोत्यांना  कुठे सांगू बाबारे 
     कुराण ऐकाचे असेल तरअंतर्यामी ऐका.
     तिथूनच खरी भगवंत वाणी,नाही अल्लाचे शब्द उमटतील.

चावी बनवुन झाली, तिथून निघालो.मनात विचार आला लाख शब्द पाठ केलेत, कुराण  शेरीफ 
पाठ केलेत त्याचे काय मोल. परमात्मा कुठला विचार नाही, तर्क नाही.नमाजही कर्मकांड,सवय ,
अहंकार बनून राहिला आहे.

माझे विनोबाचे कुराण-सार पुस्तकाचे वाचन सुरु होते ,त्यामुळे ती बडबड मला अर्थ हीन वाटली. नमाज,ध्यान,प्रार्थना जे काही आहे, सगळे विचार विरहित वाहावयास हवे.

नानकाच्या जीवनतील एक घटना, प्रसंग आठवला तो सांगतो, नानक म्हणायचा," कोणी हिंदू नाही कोणी  मुसलमान नाही",

नानक एका मुसलमान नबाबाकडे उतरला होता.नबाब म्हणाला,"तुम्ही  म्हणता कोणी हिंदू नाही, कोणी मुसलमान नाहीउद्या शुक्रवार आहे, तुम्ही आमचे बरोबर  नमाज पढावा ".
नानक म्हणाला," एक अट आहे तुम्ही नमाज पढला तर मी पण पढेन".

बातमी हाहा म्हणता सगळीकडे परसली ,पाच हजाराचा गाव,आजूबाजूच्या गावातले पाच हजार.खूप मोठी भीड जमा झाली.नानक आता मुसलमान होणार हिन्दुनमध्ये चुळबुळ आणि मुसलमानान मध्ये उत्साह .आपल्या मुलाचे डोके फिरले तर नाहीकाय भानगड आहे हे जाणून घेण्यासाठी त्याचे वडील कालू मेहता हि हजार झाले .

नमाजाची वेळ झाली . मुल्ला ,नबाब,काझी आणि इतर खानदानी  मुसलमान नमाज पाढायाला बसले . गुढगे टेकले, माथा जमिनीवर ,वज्रासनाची  possition घेतली . नानक उभाच राहिला .  उभ्या, उभ्या  का कोणी नमाज पढतो ?

नमाज संपला . नबाब उसकला ,"नानक तू खोटा आहेस ,नमाज पढायचे कबूल करुन तू खोटा वागलास ,मोठा गुनाह  केलास, विश्वासघात केला आहेस" . इतर सारे जमलेले मुसलमान त्याच संतापात होते,वातावरण तापले होते.

नानक म्हणाला," हो मी कबूल  केले होते पण मी म्हणालो होतो ,तुम्ही नमाज पढलात तर मी नमाज पढेन .
तुम्ही तर नमाजा मध्ये नव्हता ,सारे मला पाहत होता,डोळे किलकिले करुन ,हळूच मन वर करून पाहत होता मी नमाज पाढतो का ते ." एकदम शांतता झाली.



"नबाबसाहेब ,मला सागा , काबूलला जावून नवा घोडा आणण्यासाठी जाण्याचा तुम्ही विचार नमाज पढत असता करत होता ,हा मुल्ला शेतात आलेंले पीक कापण्यासाठी मजुराची चिन्ता करत होता ,असा असतो नामज ? मी वाट पाहत होतो तुमचा नमाज सुरु होण्याची".                                                                    
गोष्ट खरी होती नबाबाचा उमदा घोडा नुकताच मरण पावला होता,मुल्ला कापणीची  चिंत्ता वाहत होता, नानकाचे अंतर्यामी  डोकावणे , आपला नमाज वरवर होता याची समज आली आणि नबाबाची बोलती बंद झाली.अशा गोष्टी नेहमीच्याच, रोजच्या जीवनात घडतात .प्राथॆना ,पूजा ,नमाज ,ध्यानात  मी जोपर्यंत जागा असतो तेव्हा
ते वरवरच असत ते कोरड, शुष्क असते.

नानक म्हणतो  ते  खरे आहे, कोणी हिंदू नाही कोणी  मुसलमान नाही .
तुम्ही आहात सल्लग्न विराट अस्तित्वाशी .ती तुमची खरी  ओळख .

अजित भिडे