Monday, 17 June 2013

सांगावेसे वाटले म्हणून .................


सांगावेसे वाटले म्हणून   ......

संकल्प  प्रत्येक जण करतो .पण अनेकांचे संकल्प हे वरवरचे असतात्त .स्वताचे अपयश झाकण्यासाठी संकल्प केलेला असेल तर त्यात प्रामाणिकपणा असतोच,असे ठामपणे म्हणता येत नाही .आमच्या कार्यालयात एक महाभाग आहे,अनेक वेळेस त्याने  प्रोमोशन साठी प्रयेत्न केला ,  परीक्षात  पास होई, मुलाखत चांगली होई ,पण माशी कुठे शिंके समजायचे नाही. गेली चार/पाच वर्ष हेच घडते , इतरानचे प्रोमोशन होते ,पण त्याचे नाव लिस्ट मधून गायब असायचे .

मग तो सांगू लागला , माझ्या प्रोमोशनची पार्टी  मी देईपर्यंत इतरांच्या प्रोमोशनत  पार्टी सहभागी होणार नाही. ह्या विचाराला त्याने संकल्पाचे गोंडस रूप देले . इतरांची सहानभूती मिळवली. इतरांनचे प्रोमोशन होते माझच का नाही, हा प्रश्न पडू शकतो, म्हणून मी  इतरांच्या  आनंदात  प्रोमोशनत  पार्टीत, मी सहभागी होणार नाही  हे काही ह्या प्रश्नाचे उत्तर बनू  शकत  नाही ? हा नसविकृती प्रकार होय ,मला वाटते  हा प्रकार दबलेल्या, कुंठीत भावनेतून होतो.

ह्याला मी तरी संकल्प म्हणणार नाही.तुमच्याही बाबतीत असे होऊ शकते तेव्हा  तुम्ही असा विचार कराल का ? प्रत्येकाला निर्णय घेण्याची मुभा आहे, पण तो मोकळेपणाने का कुंठित भावनेने निर्णय घ्यायचा तुमचे तुम्ही ठरवा.

तसेच प्रार्थने बद्दल . अनेक  माणसे मी पहिली आहेत. गणेश  उत्सवात अनेक जण लालबागच्या गणपतीला दहा /दहा  तास रांगेत उभे राहून दर्शन घेतात. नवस बोलणारांची रांग वेगळी ,दर्शनासाठी रांग वेगळी ,नवस  फेडायला आलेली वेगळ्या रांगेत .


माझ्या पहाण्यात दोन/तीन माणसे आहेत दर वर्षी रांगेत उभे राहून तोच तोच नवस ,साकडे  त्या गणेशाला घालतात आणि त्या वेठीस धरतात.देवाला लालूच नाही, लाच देवू करतात. चांदीचा मुकुट ,सोन्याचा उंदीर, सोन्याचा मोदकाची लाच , ढेर सारे पैसे देवाला अर्पून , आपण आपल्या इच्छा  पूर्ण करण्याचा वेडेपणा करतो .हे देवाकडे करू घातलेल स्पॉट फिक्सिंग.

देव एकतो हो ?  जरा  टक्केवारी तपासून पहा ,देवावर विसंबून  राहणे फायद्याचे नसले, तरीही तीच तीच चूक आपण करत असतो.
यशाचा मार्ग सातत्य ,आत्मविश्वास आणि योग्य कृती मुळे सफळ होतो. कोणाला सांगयला जावे, तर आपण वेडे ठरतो .

प्रयत्नच  न करण्या पेक्षा, प्रयन्त करून आलेल अपयश श्रेयस्कर असते. प्रयन्त सारेच करतात ,मेहनत सारेच जण घेतात तरी यश सर्वांच्याच पदरात पडतच असे नाही. प्रत्येक आव्हानातून  तुमच्यातील सुप्त शक्तीची ओळख  होते, संघर्षातून बळ  येत ,संभ्रमातून बाहेर यायला सबुरी  ठेवावी लागते .

तुम्ही निर्णय घेण्यास चालढकल केलीत तर नियतीला निर्णय घ्यावा लागतो ,ती थांबत नाही । निर्णय टाळून अपयश टाळता येत नाही . एखादि चांगली संधी मात्र हातातून निसटून जाते,हे अनेकांच्या ध्यानात शिरत नाही.

अजित भिडे

No comments:

Post a Comment