Friday, 28 June 2013

थोडासं हटकून, जरा हे करून पहा …


परवा  कुमटा  स्टेशनहून  ट्रेनने मुंबईला येत होतो. मडगावला ट्रेनमध्ये दोन मराठी  कुटुंबे चढली नवरा बायको आणि दोन मुले अशी सहाजण होती .ट्रेन सुरु झाली.त्यांच्या गप्पा रंगायला लागल्या .एका बाईने पर्संमधून  प्लास्टीकच्या अंगठी सारखे बोटात सहाही जणाना  घालावयास दिले.प्रत्येक जण ते छोटेसे यंत्र वापरत होते.कुतूहलापोटी मी विचारले तेव्हा त्यांनी सांगितले ‘आम्ही जप करतो आणि किती जप झाला याची गणना करतो.’

याला नामस्मरण म्हणायचे कि जप? माझ्या अध्यात्मिक साधनेत बसत नव्हते.

टेनिसन(Tennyson) नावाचा एक इंग्रजी कवी होता. Early spring आणि Break, Break, Break ह्या कविता तुम्ही वाचल्या असतील, नसतील तरीही हरकत नाही.

त्याने लिहून ठेवले आहे कि "मी जेव्हा लहान होतो तेव्हा मला लवकर झोपायला पाठवत. घरातले लोक उशिरा पर्यंत जागे असत,मुलांना मात्र लवकर झोपायला पाठवत.प्रत्येकाच्या खोल्या स्वतंत्र होत्या .

टेनिसन म्हणतो" मला लवकर झोप येत नसे. दरवाजे बंद केले असत, खोलीत अंधार असे रात्री अंधारया खोलीत मी एकटा, झोप येत नाही म्हणून बिछान्यावर पडलेला असे. कुठे काही आवाज झाला भीती वाटायची लहानपणी भुताच्या गोष्टी ऐकलेल्या असायच्या भीतीने थरकाप व्हायचा"

'माझे वडील नास्तिक होते त्यांनी मला प्रार्थना शिकवली नाही, देवाचे नाव घ्यायला शिकावले नाही, मग मी काय करणार?
घाबरून कोणाला हाक मारावी कोणी येणार नाही, हे मला माहित होते. मग मी स्वताःलाच  हाक मारायला सुरवात केली, मी म्हणू लागलो, ‘टेनिसन ,टेनिसन, टेनिसन......
मला थोडासा धीर येई मी मोकळा होई मग मला झोप लागे.बघा तुम्ही घरी एकटे आहात तुम्हाला झोप येत नाही, वाचनाची हि आवड नाही मग तुम्ही  T.V. लावता. Channel फिरवता समोर चित्र दिसतात, आवाज ऐकू येतो तुम्हाला सुरक्षित वाटू लागते टेनिसन म्हणतो" टेनिसन टेनिसन म्हणायची मला सवय लागली.कधी
कुठलाही तणाव वाटला कि टेनिसन म्हणत असे. टेनिसन हा माझा मंत्र झाला.

कोणी म्हणतात मला गुरूने अमुक एका नावाचा  जप सांगितला आहे.कोणी म्हणते मला "नाम" द्या मग मी जप सुरु करतो .


तुम्ही टेनिसनची गोष्ट ऐकलीत मी म्हणतो, तुम्ही स्वताःच्या नावाचा जप सुरु केलात तरीही खूप आहे ते ! स्वताःचे नामहि तुम्हाला परमात्म्याकडे पोचवू शकते .

दोन शब्दाच्या उच्चारामध्ये, अंतर्यामी एक स्पंद, शांतता अनुभवता येते. हळूहळू तुम्ही साक्षी होता.

जप नामस्मरण हे काही गप्पा मारताना time pass  चे साधन नाही.

अजित भिडे


No comments:

Post a Comment