Sunday, 21 July 2013

गुरु पोर्णिमा ……………


गुरु तोच आहे जो पूर्ण आहे,जो पूर्णत्वाला पोहचला आहे ,जो परमात्म्याचा समीप आहे ज़ो तुम्हाला योग्य मार्गांनी घेऊन जातो त्याला गुरु म्हणतात .त्याच्या प्रती आदर व्यक्त कारणासाठी, स्मरण करण्यासाठी असलेला दिवस म्हणजे  गुरु पोर्णिमा.

आज स्वताला गुरु म्हणणारे ,समजणारे खूप आहे.अनेकांनी आपली आध्यात्मिक मालाची दुकाने उघडली आहेत.छान पैकी सजवली आहेत.स्वयंम घोषीत गुरु स्वतःच गुरु पौर्णिमेची जाहिरात देतात.अमुकअमुक फलाना गुरुचे, गुरु पौर्णिमेला lecture अशी जाहिरात वर्तमान पत्रात, चेनेलवर तूम्ही वाचता. त्याचे दर्शन घेण्यासाठी  वेगवेगळे रेटस असतात.त्यांचा शिष्य परिवार मोठा असतो असुदे.

पण आज स्थिती अशी आहे गुरूला शिष्य चालवत असतो. शिष्य गुरुचे मार्केटिंग करतो.जितके मार्केटिंग प्रभावी तितका गुरु मोठा. गुरु शिष्यावर अवलंबून असतो, तथाकथित शिष्य गुरूंचे  शोषण करत असतो.

गोरख म्हणतो गुरु लोहारासारखा,कबीर म्हणतो गुरु कुंभारासारखा, खरच शांत विचार केलात तर लक्षात येईल........

कुंभारासारखा गुरु नाहीरे जगात
वरी घालतो धपाटा आत आधाराचा हात!!

आधी तुडवी मग हाते कुरवाळी
ओल्या मातीच्या गोळ्याला येई आकृती वेगळी!!

घडे थोराघरी जाती घडे जाती राउलात
कुणी पूजेचा कलश कुणी गोरसाचा माठ!

देता आकार गुरुने ज्याची त्याला लाभे वाट
घट पावती प्रतिष्ठा गुरु राहतो अज्ञान !!

गुरु परमात्मा परेसू ऐसा ज्याचा दृढ विश्वासू तोच जाणतो कि
गुरु आतल्या चैतन्याशी म्हणजेच परमात्म्याच्या समीप आहे.

गुरूचा एक हात तुमच्या हातात, दुसरा हात परमात्म्याच्या हातात. गुरु माणूस असल्याने तो माणसाची भाष्या जाणू शकतो, शिवाय परमात्म्याची  भाष्या समजू  शकतो. तुमचे सांगणे,तुमचे मागणे ईश्वरापर्यंत पोचवतो.

गुरु द्वार आहे,गुरु दाता आहे,गुरु कडे काय मागायचे लग्न ,घर ,पैसा नोकरी ह्या सारख्या ऐहिक गोष्टी............ का , आशीर्वाद !  तुमचे तुम्ही ठरवा.

शंभर   गुरूंची  द्वारे  ठोठावाल , नव्याण्णव  खोटे  ठरतील . खरा गुरु भेटायला परमभाग्य  लागते शंभराव्हाही पारखून घ्यावा लागतो, तो  खरा असेल याचा भरोसा  कुणी द्यावा . म्हणून म्हणतो, गुरु शोधणे कठीण  गोष्ट आहे, भेटला तर सुद्वैव .

चलनात खऱ्या  नोटा असतात, तश्याच खोट्या पण असतात . खोट्या नोटा अधिक असतात . बाजारात, चलनात बनावट नोटा आधी चालतात . गुरु बाबतीतही बनावट ,भोंदू बाजारी गुरु जास्त असतात . गुरु पारखून घ्या.....

माझा तर असा सल्ल्या आहे गुरु शोधण्याच्या भानगडीत पडू नका, ग़ुरु म्हणून कोणी आदरणीय असेल तरी आहारी जाऊ नका,सुरक्षित अंतर ठेवा .

गुरु पारखून  घ्या,  तुमच्या चैतन्याशी समन्वय ठेवा ,अधिक काही करण्याची आवश्कता  नाही .

अजित भिडे


Thursday, 18 July 2013

बुद्धाचा सम्यक मार्ग ! ! !

असे म्हणतात बुद्धाची शिकवण,  थोडक्यात सर्वंमं दुक्खम, सर्वंमं क्षणीकमं ,सर्वंमं अनात्मनामं .
सर्वंमं दुक्खम साहजिक बुद्ध दुःखाबद्दल विस्ताराने बोलतो आणि त्यालाच आर्य सत्य म्हणतात .
ती मी तुम्हाला समजून दिली.जीवनात दुःख आहे,दुःखाच कारण आहे,दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग आहे ,दुःख मुक्त हि अवस्था आहे.

आर्य अष्टांगिक  मार्ग प्रज्ञा, शील ,समाधी मी सांगू लागलो ,तर हाती विशेष लागणार नाही . सोप्या रोजच्या, व्यव्हाराच्या भाषेत सागितले तरच ते लोकांपर्यंत पोहचते .नाहीतर चर्चा होते ,पांडित्य होते, intellectual  बहस होते , बोजड वाटते .

सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या चित्ताचा शोध ! आपल्या चित्ताचा शोध रोज घेत राहा .त्या द्वारेच तुम्हाला समज येईल काय चांगले,आणखी काय चांगले. जीवनाची सारी समज तुमच्या पुढे उलगडायला लागेल . तुमचे चित्त शुद्ध होत जाईल ,तुमची दृष्टी शुद्ध होत जाईल

त्या आधी बुद्ध म्हणतो वाईट करू नका ,सार्र्या पापांच न करणे . पुण्य करणे ,
तुम्हाला जे चांगले वाटते त्या दिशेने जा ,जे चांगले वाटणार नाही ,त्या दिशेला वळू नका .
सब्ब पापस्स अकरणं, कुशलस्स उपसंपदा !
सच्चित्त परियोदपनं , एतं बुद्धान सांसन  !! हेच बुद्धाचे शासन आहे ,सांगणे आहे.

बुद्ध पाली भाषेत सांगे,

अनुपवादो , कुणाची निंदा  न करणे.
अनुपघातो , कुणाची हि हानी न करणे.
पतिमोक्षात संवर ठेवण ,बुद्ध पुरुषांनी सांगितले ते स्वीकारणे.
भोजनाबद्दल  मात्रा  जाणण,म्हणजे अति न खाणे किवा उपवास करून शरीरावर अन्याय करू नका .

बुद्ध  सांगतो," अधि चित्ते च आयोगो एतं बुद्धान सासनं! " .सद् चित्त परियोदपनं.
स्वताच्या  चित्तामध्ये लीन राहा,थोडक्यात ध्यानात उतारा . 
या, माझ्या समवेत आपण आता  आर्य अष्टांगिक मार्ग समजून घेऊ.

सम्यक  दृष्टी, सम्यक  संकल्प, सम्यक वाणी,
सम्यक  कर्म,   सम्यक उपजीविका,  सम्यक  व्यायाम,
सम्यक स्मृती,  सम्यक   समाधी.

अष्टांगयोगात आणि अष्टांगिक मार्गात शेवटची पायरी नव्हे शिखर समाधी आहे  हे लक्षात असू द्यावे.
 
सम्यक दृष्टी आणि सम्यक वाणी ,आधी समजून देतो.

जे आहे तेच पाहणे ,जसे आहे तसे पाहणे.आपण बघा नेहमी जे पाहतो,त्या मध्ये आपली धारणा आणतो,विचार आणतो,कामना आणतो , वासना आणतो. आपले पाहाणे विपरीत बनते . धारणेचे मेघ, विचारांचं धुके दूर ठेऊन  जसे आहे तसे पाहणे . मोकळे होऊन पाहा . ह्याला सम्यक दृष्टी म्हणतात . मी सांगतो, सम्यक दृष्टीच ,तुम्हाला द्रष्टेपणा  देईल, द्रष्टा बनवेल .

सम्यक वाणी . जे  आहे तेच सांगणे . जसे आहे तसेच सांगणे . आपण तिखट मीठ लाऊन सांगतो किवा कमी करून सांगतो,विपरीत सांगतो. आत एक बाहेर दुसरे . मनात एक असते आणि वाणी वेगळेच बोलते . आपली वाणी ,communication खोटे असते, लबाड असते मुखवट्याचे असते . सम्यक वाणी योग्य तेच बोला, योग्य तेवढाच बोला . balance बोलणे .

सम्यक  संकल्प, नेहमी असे पाहण्यात येते की दुराग्रही माणसाला ,हट्टी माणसाला संकल्पवान  समजलं जाते. दुराग्रहात, हट्टात अहंकार आहे.आपण म्हणतो मी हे करेन,ते करेन काहीतरी मिळवण्यासाठी  माझा प्रयन्त म्हणजे संकल्प .

बुद्ध म्हणतो, " दुराग्रहाला संकल्प मानू  नका.जे करण्याजोग आहे ,तेच करायचं आहे .

त्या साठी सारे जीवनपणाला लावायचे आहे . ते कुठल्याही अहंकारामुळे अतएव नाही. ते करण्याजोग आहे म्हणून निश्चय बुद्धीने ,सम्यक म्हणजे balance साधून , तोल साधून ,मध्यम मार्गने ,अतिरेक टाळून, जो होतो तो सम्यक संकल्प".

आज इथेच थांबू, साम्यकता  साधु . पुढच्या ब्लोग मध्ये  भेटू .

दोन्ही ब्लोग परत परत वाचा , वेगऴ  समजेल ,तुमची तुम्हाला वेगळी समज येईल .

अजित भिडे
.

Saturday, 6 July 2013

चार आर्य सत्य....

गौतमने ज्या दिवशी पाहिलं मृत्यू  आहे,म्हातारपण आहे ,जीवनात दुःख आहे त्याच रात्री महाल सोडला. दुःखाच्या कारणाच्या शोधा साठी निघाला .संकल्प केला ,संघर्ष केला तपश्चर्या  केली, समर्पण केले , कर्ता विखरुन  गेला ,अहंकार गळून पडला आणि सिद्धार्थाचा बुध्द झाला . तो बुद्ध सांगतो ,"

"जीवनात दुःख आहे,
दुःखाच कारण आहे ,
दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग आहे ,
दुःख मुक्त हि अवस्था आहे
हि चार मूलभूत सत्य आहेत ".त्यालाच त्याने आर्य सत्य  म्हंटले आहे .

आज मुलभूत गोष्ठी,मुलभूत सत्य समजून घेऊ.

बुध्द म्हणतो दुःखाला  खोटे ठरवू नका ,पळ  काढू नका ,डोळे मिटून घेऊ नका. जीवनात हरघडी दुःख आहे. आपण ठरवतो कि ते नाही. ते स्वीकाराची तयारी नसते, डोळे मिटल्याने दुःख नाहीसे थोडेच होते.डोळे उघडा, कारण शोधा. दुःखाच कारण शोधता शोधता तुम्हाला जाण येते ,  दुःखाच कारण जाणलंत  तर दुःख मुक्तीचा मार्गाच हातात येईल .

पतंजली, योगः चित्तवृत्ती निरोधः! असे म्हणतात ,
तर बुध्द दुःख निरोध म्हणतो .
कैवल्य उपनिषद म्हणत, मन एवं  मनुष्याणां कारणं बन्ध मुक्तयोः!

बुध्द साध्या  ,सोप्या  भाषेत विलक्षण सांगून जातो .बुद्ध म्हणतो सुखाची गोष्टच बोलू नका , मी इतकच सांगतो  दुःख असणार नाही. पटते का तुम्हाला म्हणे दुःख असणार नाही. आपले सर्वांचे ध्येय असते सुख ,सारे आयुष्यपणाला लागलेले असते ,सुखाची गोष्टच बोलू नका ,अवघड आहे नाही.

दुःख निरोधातच सुख मिळवणाचा मार्ग आहे .दुःखच उरले नाही ,मग जे उरतो तो आनंद ,सुख नव्हे,आनंद .

जीवनातली सारी उर्जा  दुःखाकडे प्रवाहीत करण्याचे काम मनच करत असते. बुद्ध म्हणतो ,"मनापासून सावध रहा".तुम्ही हि जाणता मनच तुम्हाला गुमराह करते .मनच  वैयताग निर्माण करते, मनच मोहा पर्यंत आणून सोडते, तेच क्रोध निर्माण करते.

सुखः दुःख्ये समेकृत्वा समजून घेतलत ,
सुखःदुःख विवेकाची  चर्चा केलीत ,
स्थितप्रज्ञ  शब्दाचा  अर्थ समजून  घेतलात,
काहीहि फरक पडणार नाही.परिस्थिती आहे तशीच राहणार .

हे  जरा समजून देतो ,समजून घ्या.लोक काम बदलतात ,व्यवसाय बदलतात,गाव बदलतात,शहर बदलतात, देश बदलतात,गाडी बदलतात,कपडे बदलतात,पती -पत्नी सुद्धा बदलतात..मनाचे सूर जूळत नाहीत ह्या सदरा खाली आता आपल्याकडे हि पती -पत्नी बदल हा ट्रेन्ड आला आहे .

आता हे सारे केलेत तर ,थोडा काळ करमणूक होईल ,मजा वाटेल ,नवीन गोष्टीत मन रमेल, मनाला विरंगुळा मिळेल ,engage राहाल, व्यस्त राहाल.हा नव्याचा रंग थोडेच दिवसात उडून जाईल, मन  थांबत नाही, त्याला त्याच त्याच गोष्टींचा कंटाळा येतो,मन उदास बनते .मनच बंध निर्माण करते मनच दुःखाचे कारण आहे, पतंजली, दुःखाला केल्श म्हणतात .

पतंजली काय ,बुद्ध काय वेगवेगळ्या कालखंडातील मानसशास्त्रज्ञच!

माझी अशी समज आहे आध्यात्म हे सुद्धा वरच्या दर्जाच मानसशास्त्र,नीतिशास्त्र ह्या सदरात बसते .

बुध्द म्हणतो मुक्तीगामी आर्य अष्टांगिक मार्ग आहे ,दुःख मुक्तीसाठी आठ अंग आहेत.त्याबद्दल पुढच्या ब्लॉग मध्ये  विस्ताराने बोलेन.

अजित भिडे
 

Monday, 1 July 2013

प्रेम कविता………………. प्रेम कविता


घरी मी एकटाच होतो.पुस्तकाच्या कपाटातील पुस्तकं चाळत होतो.माझ्या आईने  M.A. ला मराठी विषय घेतला होता. आई जाऊन पण १६ वर्ष झाली.२५/३० वर्ष  धूळखात असलेले एक पुस्तक, पु.शि. रेगे यांच्या प्रेम कविता हे हातात आले.

पुस्तक सहज चाळत, असता दोन कविता वाचल्या आवडल्या एक  'गोफ '

समज सैलसा कमरेत तुझ्या ,  

                  गोफच नुसता निळा रेशमी …

स्वर्गच फसवा कमरेवरचा

                   अटळ खालची गणिन धरा मी.

 स्वर्गच फसवा अथांग वरचा

                  जेथे माझ्या वृत्ती  नटती ;

 अटळ खालची ऊन धरा ही

                 जेथे माझ्या वृत्ती   फिटती …

 नकोच तसला पुन्हा वाटे

                 क्षीतिजाचा कटिबंध  परंतू ,

 स्वर्ग, धरा मज हवी एकदम

                चंचल ,अविचल एकसंध तू .

आणि  दुसरी  कविता  'पुष्कळा'

पुष्कळ अंग तुझं , पुष्कळ  पुष्कळ मन,

पुष्कळातली  पुष्कळ तू

पुष्कळ  पुष्कळ  माझ्यासाठी,

पुष्कळ  पुष्कळ  ओठ;

बघताना किती डोळे  पुष्कळ तुझे,

देताना बाहू गळ्यात पुष्कळ  पुष्कळ,

पुष्कळ ऊर

पुष्कळाच तू  पुष्कळावंती,

पुष्कळ  पुष्कळ  पुष्कळणारी .

पुष्कळ शब्दाचे संदभ भराभर बदलून किती विलक्षण परिणाम साधणारी आगळी वेगळी प्रेम कविता.गोफ’ कवितेत  शृन्गारातला हळुवारपणा नाजूकपणे जपला आहे.वर्षा ऋतूचे आगमन झाले आहे, कविता वाचून शृन्गारात चिबभिजलो आहोत अस वाटण हेच  या कवितेचे नवेपण आहे ……

कविता मला लुभावली, म्हणून तुमच्याशी Share केली .

अजित भिडे