असे म्हणतात बुद्धाची शिकवण, थोडक्यात सर्वंमं दुक्खम, सर्वंमं
क्षणीकमं ,सर्वंमं अनात्मनामं .
सर्वंमं दुक्खम साहजिक बुद्ध दुःखाबद्दल विस्ताराने बोलतो आणि त्यालाच आर्य सत्य म्हणतात .
ती मी तुम्हाला समजून दिली.जीवनात दुःख आहे,दुःखाच कारण आहे,दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग आहे ,दुःख मुक्त हि अवस्था आहे.
आर्य अष्टांगिक मार्ग प्रज्ञा, शील ,समाधी मी सांगू लागलो ,तर हाती विशेष लागणार नाही . सोप्या रोजच्या, व्यव्हाराच्या भाषेत सागितले तरच ते लोकांपर्यंत पोहचते .नाहीतर चर्चा होते ,पांडित्य होते, intellectual बहस होते , बोजड वाटते .
सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या चित्ताचा शोध ! आपल्या चित्ताचा शोध रोज घेत राहा .त्या द्वारेच तुम्हाला समज येईल काय चांगले,आणखी काय चांगले. जीवनाची सारी समज तुमच्या पुढे उलगडायला लागेल . तुमचे चित्त शुद्ध होत जाईल ,तुमची दृष्टी शुद्ध होत जाईल
त्या आधी बुद्ध म्हणतो वाईट करू नका ,सार्र्या पापांच न करणे . पुण्य करणे ,
तुम्हाला जे चांगले वाटते त्या दिशेने जा ,जे चांगले वाटणार नाही ,त्या दिशेला वळू नका .
सब्ब पापस्स अकरणं, कुशलस्स उपसंपदा !
सच्चित्त परियोदपनं , एतं बुद्धान सांसन !! हेच बुद्धाचे शासन आहे ,सांगणे आहे.
बुद्ध पाली भाषेत सांगे,
अनुपवादो , कुणाची निंदा न करणे.
अनुपघातो , कुणाची हि हानी न करणे.
पतिमोक्षात संवर ठेवण ,बुद्ध पुरुषांनी सांगितले ते स्वीकारणे.
भोजनाबद्दल मात्रा जाणण,म्हणजे अति न खाणे किवा उपवास करून शरीरावर अन्याय करू नका .
बुद्ध सांगतो," अधि चित्ते च आयोगो एतं बुद्धान सासनं! " .सद् चित्त परियोदपनं.
स्वताच्या चित्तामध्ये लीन राहा,थोडक्यात ध्यानात उतारा .
या, माझ्या समवेत आपण आता आर्य अष्टांगिक मार्ग समजून घेऊ.
सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी,
सम्यक कर्म, सम्यक उपजीविका, सम्यक व्यायाम,
सम्यक स्मृती, सम्यक समाधी.
अष्टांगयोगात आणि अष्टांगिक मार्गात शेवटची पायरी नव्हे शिखर समाधी आहे हे लक्षात असू द्यावे.
सम्यक दृष्टी आणि सम्यक वाणी ,आधी समजून देतो.
जे आहे तेच पाहणे ,जसे आहे तसे पाहणे.आपण बघा नेहमी जे पाहतो,त्या मध्ये आपली धारणा आणतो,विचार आणतो,कामना आणतो , वासना आणतो. आपले पाहाणे विपरीत बनते . धारणेचे मेघ, विचारांचं धुके दूर ठेऊन जसे आहे तसे पाहणे . मोकळे होऊन पाहा . ह्याला सम्यक दृष्टी म्हणतात . मी सांगतो, सम्यक दृष्टीच ,तुम्हाला द्रष्टेपणा देईल, द्रष्टा बनवेल .
सम्यक वाणी . जे आहे तेच सांगणे . जसे आहे तसेच सांगणे . आपण तिखट मीठ लाऊन सांगतो किवा कमी करून सांगतो,विपरीत सांगतो. आत एक बाहेर दुसरे . मनात एक असते आणि वाणी वेगळेच बोलते . आपली वाणी ,communication खोटे असते, लबाड असते मुखवट्याचे असते . सम्यक वाणी योग्य तेच बोला, योग्य तेवढाच बोला . balance बोलणे .
सम्यक संकल्प, नेहमी असे पाहण्यात येते की दुराग्रही माणसाला ,हट्टी माणसाला संकल्पवान समजलं जाते. दुराग्रहात, हट्टात अहंकार आहे.आपण म्हणतो मी हे करेन,ते करेन काहीतरी मिळवण्यासाठी माझा प्रयन्त म्हणजे संकल्प .
बुद्ध म्हणतो, " दुराग्रहाला संकल्प मानू नका.जे करण्याजोग आहे ,तेच करायचं आहे .
त्या साठी सारे जीवनपणाला लावायचे आहे . ते कुठल्याही अहंकारामुळे अतएव नाही. ते करण्याजोग आहे म्हणून निश्चय बुद्धीने ,सम्यक म्हणजे balance साधून , तोल साधून ,मध्यम मार्गने ,अतिरेक टाळून, जो होतो तो सम्यक संकल्प".
आज इथेच थांबू, साम्यकता साधु . पुढच्या ब्लोग मध्ये भेटू .
दोन्ही ब्लोग परत परत वाचा , वेगऴ समजेल ,तुमची तुम्हाला वेगळी समज येईल .
अजित भिडे
.

No comments:
Post a Comment