Monday, 1 July 2013

प्रेम कविता………………. प्रेम कविता


घरी मी एकटाच होतो.पुस्तकाच्या कपाटातील पुस्तकं चाळत होतो.माझ्या आईने  M.A. ला मराठी विषय घेतला होता. आई जाऊन पण १६ वर्ष झाली.२५/३० वर्ष  धूळखात असलेले एक पुस्तक, पु.शि. रेगे यांच्या प्रेम कविता हे हातात आले.

पुस्तक सहज चाळत, असता दोन कविता वाचल्या आवडल्या एक  'गोफ '

समज सैलसा कमरेत तुझ्या ,  

                  गोफच नुसता निळा रेशमी …

स्वर्गच फसवा कमरेवरचा

                   अटळ खालची गणिन धरा मी.

 स्वर्गच फसवा अथांग वरचा

                  जेथे माझ्या वृत्ती  नटती ;

 अटळ खालची ऊन धरा ही

                 जेथे माझ्या वृत्ती   फिटती …

 नकोच तसला पुन्हा वाटे

                 क्षीतिजाचा कटिबंध  परंतू ,

 स्वर्ग, धरा मज हवी एकदम

                चंचल ,अविचल एकसंध तू .

आणि  दुसरी  कविता  'पुष्कळा'

पुष्कळ अंग तुझं , पुष्कळ  पुष्कळ मन,

पुष्कळातली  पुष्कळ तू

पुष्कळ  पुष्कळ  माझ्यासाठी,

पुष्कळ  पुष्कळ  ओठ;

बघताना किती डोळे  पुष्कळ तुझे,

देताना बाहू गळ्यात पुष्कळ  पुष्कळ,

पुष्कळ ऊर

पुष्कळाच तू  पुष्कळावंती,

पुष्कळ  पुष्कळ  पुष्कळणारी .

पुष्कळ शब्दाचे संदभ भराभर बदलून किती विलक्षण परिणाम साधणारी आगळी वेगळी प्रेम कविता.गोफ’ कवितेत  शृन्गारातला हळुवारपणा नाजूकपणे जपला आहे.वर्षा ऋतूचे आगमन झाले आहे, कविता वाचून शृन्गारात चिबभिजलो आहोत अस वाटण हेच  या कवितेचे नवेपण आहे ……

कविता मला लुभावली, म्हणून तुमच्याशी Share केली .

अजित भिडे






No comments:

Post a Comment