गुरु तोच आहे जो पूर्ण आहे,जो पूर्णत्वाला पोहचला आहे ,जो परमात्म्याचा समीप आहे ज़ो तुम्हाला योग्य मार्गांनी घेऊन जातो त्याला गुरु म्हणतात .त्याच्या प्रती आदर व्यक्त कारणासाठी, स्मरण करण्यासाठी असलेला दिवस म्हणजे गुरु पोर्णिमा.
आज स्वताला गुरु म्हणणारे ,समजणारे खूप आहे.अनेकांनी आपली आध्यात्मिक मालाची दुकाने उघडली आहेत.छान पैकी सजवली आहेत.स्वयंम घोषीत गुरु स्वतःच गुरु पौर्णिमेची जाहिरात देतात.अमुकअमुक फलाना गुरुचे, गुरु पौर्णिमेला lecture अशी जाहिरात वर्तमान पत्रात, चेनेलवर तूम्ही वाचता. त्याचे दर्शन घेण्यासाठी वेगवेगळे रेटस असतात.त्यांचा शिष्य परिवार मोठा असतो असुदे.
पण आज स्थिती अशी आहे गुरूला शिष्य चालवत असतो. शिष्य गुरुचे मार्केटिंग करतो.जितके मार्केटिंग प्रभावी तितका गुरु मोठा. गुरु शिष्यावर अवलंबून असतो, तथाकथित शिष्य गुरूंचे शोषण करत असतो.
गोरख म्हणतो गुरु लोहारासारखा,कबीर म्हणतो गुरु कुंभारासारखा, खरच शांत विचार केलात तर लक्षात येईल........
कुंभारासारखा गुरु नाहीरे जगात
वरी घालतो धपाटा आत आधाराचा हात!!
आधी तुडवी मग हाते कुरवाळी
ओल्या मातीच्या गोळ्याला येई आकृती वेगळी!!
घडे थोराघरी जाती घडे जाती राउलात
कुणी पूजेचा कलश कुणी गोरसाचा माठ!
देता आकार गुरुने ज्याची त्याला लाभे वाट
घट पावती प्रतिष्ठा गुरु राहतो अज्ञान !!
गुरु परमात्मा परेसू ऐसा ज्याचा दृढ विश्वासू तोच जाणतो कि
गुरु आतल्या चैतन्याशी म्हणजेच परमात्म्याच्या समीप आहे.
गुरूचा एक हात तुमच्या हातात, दुसरा हात परमात्म्याच्या हातात. गुरु माणूस असल्याने तो माणसाची भाष्या जाणू शकतो, शिवाय परमात्म्याची भाष्या समजू शकतो. तुमचे सांगणे,तुमचे मागणे ईश्वरापर्यंत पोचवतो.
गुरु द्वार आहे,गुरु दाता आहे,गुरु कडे काय मागायचे लग्न ,घर ,पैसा नोकरी ह्या सारख्या ऐहिक गोष्टी............ का , आशीर्वाद ! तुमचे तुम्ही ठरवा.

शंभर गुरूंची द्वारे ठोठावाल , नव्याण्णव खोटे ठरतील . खरा गुरु भेटायला परमभाग्य लागते शंभराव्हाही पारखून घ्यावा लागतो, तो खरा असेल याचा भरोसा कुणी द्यावा . म्हणून म्हणतो, गुरु शोधणे कठीण गोष्ट आहे, भेटला तर सुद्वैव .
चलनात खऱ्या नोटा असतात, तश्याच खोट्या पण असतात . खोट्या नोटा अधिक असतात . बाजारात, चलनात बनावट नोटा आधी चालतात . गुरु बाबतीतही बनावट ,भोंदू बाजारी गुरु जास्त असतात . गुरु पारखून घ्या.....
माझा तर असा सल्ल्या आहे गुरु शोधण्याच्या भानगडीत पडू नका, ग़ुरु म्हणून कोणी आदरणीय असेल तरी आहारी जाऊ नका,सुरक्षित अंतर ठेवा .
गुरु पारखून घ्या, तुमच्या चैतन्याशी समन्वय ठेवा ,अधिक काही करण्याची आवश्कता नाही .
अजित भिडे

No comments:
Post a Comment