दादा मुंडले नावाचे एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व होते.दादांचे माझावर खूप प्रेम होते ,विश्वास होता. मला ते आदरणीय होते.चेंबूरमध्ये राहत होते.गोधरा पासून सुरवात झालेली गुजरातमधली दंगल नुकतीच शमली होती.दादांनी ठरवले डिसेंबर मध्ये माउंटअबू विमला ठकार यांना भेटायला जायचे.दादांनीच पत्रव्यवहार केला. विमलाबाईनकडून होकाराचे पत्र आले. दादा मुंडले,मिसेस मुंडले, गोपाल देशपांडे आणि मी अशी मोजकीच माणसे होती.प्रकृती आणि वय यामुळे विमलाजी जास्त कोणाशी भेटत नसत.
माउंटअबूला आम्ही जवळच हॉटेल बुक केले होते, त्यामुळे विमलाजीना भेटणे सोपे जाणार होते.
विमलाजीनी आम्हाला प्रथम भेटीसजवळ जवळ चाळीस मिनटे दिली.नंतर पुन्हा दुसरे दिवशी अर्धा तास,बस तेवढीच भेट !
विमलाजीनची छोटीशी मूर्ती, पांढरी खादीची साडी, स्थूल लोभस पवित्र ,व्यक्तिमत्व आजही मनात घर करून आहे.Spiritual vibrations’ म्हणून जर काही असतील तर तेंव्हा ती मी अनुभवली.आजही विमलाजीनची प्रथम भेटीतला सहवास आठवला की शरीरात विदूतलहर गेली असे वाटते,अंगावर रोमांच उभे राहते, चेहऱ्यावर रक्त प्रवाह वाढला आहे अशी वेगळीच स्थिती होते.
बोलताना दादा मुंडलेनी विमलाबाई बालपणी ११ तास ध्यानावस्थेत होट्या तो विषय काढला. विमलाजीनी डॉ.सर्वपल्ली राधकृष्णांन यांचा ऊलेख केला, आपल्याला प्रेसिडेन्टची दुसरी टर्म मिळावी यासाठी खूप प्रयत्नशील होते, मोह एवढ्या मोठ्या विद्वानाला सुध्हा चुकला नाही.
विषय बदलायच्या ओघात मी म्हणून गेलो ‘आत्मसाक्षात्कार म्हणतात त्यासाठी मी जर मनाला समजावले, तर ते पुरेसे नाही का? मला कधी कधी वाटते मी आयुष्याती महत्वाची वर्ष अध्यात्माच्या नावाखाली फुकट तर घालवत नाहीं ना.”
विमलाजीनी मला ताबडतोब सांगितले, ‘ती मनाच्या पलीकडली अवस्था आहे .
बेटा, तुला असे वाटते वेळ फुकट जातो तर, वेळ फुकट नको घालवू नकोस,हे सगळे सोडून दे ‘.
रूम वर आल्यावर माझ्या मूर्खपणाचा राग आला.विमलाजीनी झेन धक्का तंत्र वापरले होते.मी काही चूक करत नाही, मी ज्या मार्गावेर आहे तो योग्यच आहे, याची समज आली. या गोष्टीला १५/१६ वर्ष झाली आणि आता मी जे सांगतो ते पण ५ वर्ष जुने,
पहाटे चार वाजता ध्यानाला बसलो होतो.साधारण पस्तीस मिनटे झाली, ध्यान खूप छान झाले. चहा घेताना माझ्या बायकोला मी म्हंटले, बरेच दिवसानी ध्यान खूप छान झाले, विमलाबाई ठकार सुध्हा ध्यान करताना बरोबर होत्या.
एक महिना होऊन गेला. विजय तेरवणकर म्हणाला ‘सर तुम्ही नेहमी विमला ठकारांचा उल्लेख करता, एक लेख आला तुम्ही वाचलात का?’ विमलाजी गेल्या ही बातमी मी वाचली नह्वती. विमलाजी गेल्या ही बातमी माझ्या वाचनातून सुटून गेली.घरी आल्यावर मी बायकोला सांगितले विमला ठकार गेल्या, मला माहित नव्हत.
माझी पत्नी म्हणाली ध्यानाला बसला होता तो दिवस आठवा .स्मृती जरा मागे नेली, लक्षात आले तो दिवस ११ मार्च,होळी पौर्णिमा होती.विमलाजी गेल्या ११ मार्च २००९ म्हणजे दोन्ही दिवस एकच होते.ध्यानाला बसलो असता विमलानशी कुठेतरी कनेक्ट झालो, कनेक्शन लागले, आपण जात असल्याचा संदेश बहुदा त्यांनी दिला असावा पण तो मला समजला नाही.योगायोग म्हणावे का
माहित नाही .एकमात्र झाले विमलजीना श्रध्येय का म्हणतात ते मला नव्याने समजले.
विमलाजीनी फारच सुरेख पद्धतीने, किती सोप्या शब्दात “जगावेगळे अध्यात्म “ सांगत.
आधार, आश्रय नव्हे,
आज,आता आणि ईथे महत्वाचे.
अध्यात्मात प्रगती करायची तर मी माझे मला ही 'म' ची बाराखडी विसरायला हवी.
जीवनात समग्रतेने रहा, जे करता,ते करताना अवधान असू द्या,आयाम महत्वाचा आहे.
गती मध्ये शक्ती असते,त्या पेक्षा स्थिरतेत अधिक शक्ती असते,
शब्दात जेवढ सामर्थ्य आहे, त्यापेक्षा अधिक मौना मध्ये सामर्थ्य आहे.
साधनाही काही मिळवण्यासाठी नाही तर्,
शुद्धीकरणासाठी असते, purification of body, mind, perception.
संतांच्या मांदियाळीत फिट बसणारी,
जे.कृष्णमूर्ती आणि विनोबाशी जवळीक असणारी,

भूदान चळवळीत योगदान देणारी,स्ववेदानाशील चारित्र्यसंपन्न,
निस्पुह:... महान विदुषी
संत श्रध्येय विमलजीना,
माझा नम्र प्रणाम.
अजित भिडे

This comment has been removed by the author.
ReplyDelete