श्री. नरेंद्र दामोदर मोदी,यांचा गजर सर्वत्र सुरु आहे.
'अपकी बार मोदी सरकार' हे गोष वाक्य सर्वांच्या मनात रुजले आहे.
अनेकांच्या मनात संदेह आहे, खरचं मोदी पंतप्रधान होणार का?
अनेक ज्योतिषी सांगतात हो मोदी पंतप्रधान होणार, कस असत वाजली तर पुंगी.
काही ज्योतिषी आपल्या विचारसरणी नुसार भविष्य सांगतात,मनात असते मोदी पंतप्रधान होऊ नये.मग, सांगतात मोदी पंतप्रधान होणार नाहीत.
मी काही मोठ्ठा ज्योतिषी नाही, तसेच कुडमुड्या ज्योतिषीही नाही एवढे मात्र खरे.भविष्य कथनात अंदाज चुकू शकतात.कारण यात मेदनिय ज्योतिष, निवडणूक प्रक्रिया,वक्तीगत कुंडली, चलीतातले ग्रह, अनेक अंग आहेत.तरीही कुतूहल असते. अर्थात निवडणूक निकाल जाहीर झाले कि सगळेच बदलेल.
मी आपल्या पुढे मोदींची जन्म लग्नकुंडली , वास्तविक प्रमुख ग्रह, महादशा क्रम, व्यक्तीची देहबोली, तेजोवलय, विचार संक्रमण याचा सर्व बाजूने विचार करून पुस्तकी नाही.पण सुटसुटीत शब्दात मांडतो.
श्री. नरेंद्र दामोदर मोदी,जन्म लग्नकुंडली
![]() |
जन्म१७ /०९/१९५० सकाळी ११;०० मेहसाना गुजरात. |
वृश्चिक लग्न आणि वृश्चिक रास, लग्नी मंगळ आणि चंद्र. वृश्चिक लग्न ०१:१५;२२ अंश त्यामूळे तुला लग्नाचा सुद्धा प्रभाव आहे.
मोदीचे करारी व्यक्तिमत्व, धारदर नेतृत्व, अग्रेसिव लीडरशिप हे वृश्चिक आणि हसरे व्यक्तिमत्व तसेच स्पष्ट विचार हा तुलाचा प्रभाव दाखवतो. जन्मजात शनि महादशा ०९/१०/१९६१ पर्यंत होती भावचलीतात रवि ,बुध दशम स्थानात येतात शुक्र आणि रवि महादशा कसोटीच्या गेल्या. हा कालखंड १०/१०/१९८५ ते ०९/१०/२०११ यात राजकीय उदय, मुख्यमंत्री, आरोप- प्रत्रारोप.त्यात दटून राहणे, न्यायालीन मुकाबला आपण पहिला आहे.
सध्या चंद्र.महादाश्या अंतर्गत राहू अंतरदशा १०/०३/२०१३ ते ०९/०९/२०१४ पर्यंत.
गुरु ३१/०५/२०१३ पासून मिथुन राशीत म्हणजे अष्टमात आहे ,तरीही याच काळखंडात पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून नाव जाहीर झाले. पक्षातले सहकारी यांना मोदी स्वीकारावे लागले,इतर राजकीय विरोधक प्रभाव हरून बसले. सध्या शनि आणि राहू तूळ मध्ये गेले वर्षभर आहेत.राहू कन्येत १३/०७/२०१४ ला येतो आहे म्हणून काळजीचे कारण मला दिसत नाही.
गुरु १७/०९/२०१४ पासून कर्क राशीत येतो.म्हणून काही ज्योतिषी शंका व्यक्त करतात की मोदीना गुरुबळ नाही ते बरोबर वाटत नाही.
एक वेगळी शक्ती मोदीच्या मागे आहे.कुंडलिनी शक्ती क्रियावती झाली की त्याचा प्रभाव इतरांवरही पडतो.
Every thought has tendency to realized यालाच thought dynamics म्हणतात .
झोपलेल्या माणसाच्या पत्रिकेतले ग्रहही झोपलेले असतात,जो क्रियावान आहे त्याचे ग्रह ही फळतात.जो कमकुवत असतो तो ग्रहांचा आधार शोधतो.
मी एवढेच आश्वस्थ करतो की मोदी आपल्या मिशन मध्ये यशस्वी होणार.
अजित भिडे

Ra Game chi kundli kaay sangte?
ReplyDelete