Tuesday, 30 April 2013

कालाहंडीचा म्हातारा .....

कालच वर्तमान पत्रात बातमी वाचली  ओरिसा मधील कालाहंडी आणि रायगडा जिल्ह्यात वेदांताचा अल्युमिनियम प्लांट पुन्हा सुरु व्हावा ,यासाठी दहा हजार लोकांनी निदर्शन केली.बातमीत कालाहंडीचा  उल्लेख आला आणि जे आठवल  ते तुमचाशी share करतो.

तीन चार वर्षा पूर्वी 'वाईज अन्ड अदरवाईज' हे सुधा मूर्ती यांचे मराठीतले अनुवादित पुस्तक वाचनात आले होते. त्याना आलेला अनुभव  म्हणजे कालाहंडीचा म्हातारा त्यांनी रेखाटला होता . मला तो खूप भावला, तो कालाहंडीचा म्हातारा मला  लाओत्सेचे तत्वज्ञान सांगणारा  ज्ञानी ,प्रज्ञावंत वाटतो. बुद्धत्वाला पोचलेला तो आदिवासी म्हातारा माझ्यावर प्रभाव टाकून आहे.


आदिवासी नेहमी घोळक्याने राहतात ,सुसंस्कृत लोक रूढी परंपरा रितीरिवाज यांचा जसा बाऊ करतात  तसा आदिवासी करत नाहीत . खाजगी मालमत्ता हि संकल्पना त्यांच्या जवळ  आढळत नाही. असाच एक सत्तरिचा म्हातारा ,सुधा मूर्तीना भेटतो ,त्या त्याला विचारतात ; ह्या देशावर राज्ज कोणाचे ?'म्हातारा उत्तर  देतो ,
'कंपनी सरकारचे' कंपनी सरकारचे' म्हणजे East India Company.चे थांबा,   विचार  करा  , ह्या  देशाला  चालवतो  कोण ?


सुधा मूर्ती त्याला १०० रुपयाची नोट दाखवतात , गांधीबाबाचा फोटो दाखवतात,देश प्रजासातक झाला, हे पटून देण्याचा यन्त करतात, पण त्याला पटत नव्हते.
आदिवासीन मध्ये आजही Barter system ने व्यवहार होतात.

"ह्या कागदाच्या नोटेने  तू सरपण,आणू शकतोस ,खूप साड्या, गुळ, मिठाची गोणी,आगपेट्या,ज़मिनीचा तुकडा घेऊ शकतोस, जमीन तुमच्या मालकीची  होऊ शकते" .

तो  म्हातारा दया आल्यागत पाहत जे बोलला ते लाख मोलाचे होते. दुभाष्याच्या  साहयाने संवाद सुरु होता.तो कालाहंडीचा म्हातारा बोलून राहतो ,

"तुम्ही ह्या कागदाच्या तुकड्यासाठी आपापसात भांडता,वाडवडीलांनी ठेवलेल्या जमिनी सोडून दूसरीकडे जाता या कागदाच्या तुकड्यावीणा  आमचे वडील सुध्हा जगले''.

''आम्ही देवाची लेकरे आहोत ,कागदाशिवाय पिढानपीडया जगत आलो आहोत.
इथे जमीन कोणाच्या मालकीची नाही ,इथली नदी आम्ही बनवलेली नाही ,
कोणताही पर्वत आम्ही  बनवलेला नाही ,वारा आमची आज्ञा पाळत नाही ,
पाऊस कोसळण्याआधी ,आमची परवानगी घेत नाही .या परमात्म्याच्या देणग्या आहेत ''.

"भूमि खरेदी कोण करणार, मला तुमच समजत नाही ,इथेले  जर काहीच तुमच्या मालकीचे नाही ,तर मग हे देवाणघेवाणिचे व्यवहार  तुम्ही कश्याच्या जोरावर करता? तुमच्या हया लहानश्या कागदाच्या तुकडयाने, आमच्या आयुष्यात उल्थापालाथ घडेल".

या माणसाला कोणत्या शब्दात  उत्तर  द्यावे ,सुधा मूर्तीना समजले नाही ,त्यांची समजूत होती त्यांचे ज्ञान, त्याच्याहून जास्त आहे . शेयर बाजार ,चलनफुगवटा ,लोकपाल ,२ जी  स्पेक्टरम,बिलगेट, ओबामा IPL, हे आपल्याला ठाऊक आहे .ह्या आदिवासी  म्हाताराला कशाची माहिती  नाही, पण  त्या पेक्ष्या सखोल चिरंतन सत्य तो जाणत होता आणि जगत सुद्धा  होता .

हा कालाहंडीचा म्हातारा ,म्हणजे मला लाओत्से वाटतो.
त्याच्या डोळ्यात विलक्षण चमक असली पाहिजे ज्ञानी , प्रज्ञावंताची   चमक !

बातमी वाचून विचार आला तो म्हातारा आता अनंतात  विलीन झाला असेल,ती भूमी आता Virgin राहिली नाही .सारेच बदल आहे तरी चिरंतन मुल्य नाही बदलणार,असे आज तरी म्हणूया ……

अजित भिडे

Monday, 22 April 2013

पोपटपंची, न जाणता केलेली व्यर्थ बडबड !



आपणच आपणाला बंधने घातलेली असतात.कधी कधी लादलेल्या बंधनांची आपणांला सवय होते. मी तुम्हाला नेहमी सांगत  असतो जाणीवा म्हणा अथवा Affirmations म्हणा, self talk म्हणा पोपटा सारखे बोलू नका.समजून म्हणा.

मी मुक्त आहे ! I am free! म्हणजे I am truth! मी सत्य आहे !हळू हळू समज येईल.ती तशीच यायला हवी.या मुक्ती सन्दर्भात एक पोपटाची गोष्ट आठवली,सागतो मजेशीर ,गमतीशीर वाटली तरी आपल्या बाबतीतही असे घडू शकते ,नाही घडते सुद्धा! न समजून म्हंटलेल्या जाणीवा कश्या परिणाम शून्य ठरतात ते सांगतो.
एकदा ,एका पर्वतावर उभ्या असलेल्या आश्रमात योगायोगाने गिरीभ्रमण करणारा एक तरुण उतरला संध्याकाळची वेळ होती , त्या आश्रमाच्या दारावर एका पिंजारात पोपट होता. पिंजारा सुंदर होता आणि पोपटही ऐटदार होता. तो सारखा ओरडत होता, स्वातंत्र ! स्वातंत्र ! मुक्ति ! मुक्ति !

पोपटाच्या तोंडून हे शब्द ऐकून तो तरुण खुश झाला आश्रमाचा प्रमुख हा साधू होण्या आधी ,त्याला स्वातंत्राचा ,मुक्तीचा ध्यास होता म्हणून पोपटाला राम राम हे शब्द न शिकवता स्वातंत्र्य,स्वातंत्र्य, मुक्ती हे शिकवले.

रात्र झाली.पोपट ओरडत होता. रात्रीच्या शांततेचा भंग करणारे पोपटाचे ओरडणे स्वातंत्र !स्वातंत्र ! मुक्ति !मुक्ति ! त्या तरुणाने पिंजराचे,दार उघडे आणि म्हणाला जा उडून जा  पोपटा.पण पोपट उडालाच नाही.पोपटाने पिंजऱ्याची जाळी पकडली,पुन्हा ओरडू लागला स्वातंत्र ! स्वातंत्र ! मुक्ति !

तरुणाने ठरवले ह्याला आता मुक्त करायचच,त्याने पोपटाला पिंजारातून बाहेर काढले.पोपटाने त्याच्या हातावर चोच मारली.त्याचा हात रक्तबंबाळ झाला.त्याने पोपटाला पिंजाराबाहेर काढले आकाशात सोडून दिले. तो खूप आनंदाला आज एक आत्मा,जीव स्वतंत्र झाला ,मुक्त झाला. तो समाधानाने  झोपी गेला.सकाळ झाली,पिंजरायचे  दार उघडे होते ,पोपट आत ओरडत होता,
स्वातंत्र्य ! स्वातंत्र्य ! मुक्ती ! मुक्ती !

मी मुक्त आहे म्हणजे मी बंधनातीत आहे .सत्य म्हणजे मुक्ती ,सत्य कधीही लादता येत नाही ,तसेच मुक्तीचे आहे. मुक्ती हि बळजबरीने देता येत नाही ,तुम्ही या क्षणी मुक्त आहात,तुम्हीच तुम्हाला बांधले आहे.बन्ध मुक्त होणे म्हणजे कशाचीही कामना नाही ,इच्छा नाही,आग्रह नाही ,जवळीक नाही. तुम्ही तुमच्या इच्छेकडे साक्षीभावाने पहा,बंधमुक्त होणे म्हणजे स्वताःला मनोकाइक्क बंधनातून स्वताःस मोकळे करणे. 

आज जरा वेगळ्या  प्रकारे संवाद साधला. जाणीवा म्हणा अथवा Affirmations म्हणा ,self talk म्हणा पोपटासारखे बोलू नका .समजून म्हणा ,खूप फरक पडतो. नाहीतर सारी पोपटपंची होते .

अजित  भिडे

Wednesday, 17 April 2013

थांबा, विचार करा , ह्या देशाला चालवतो कोण ?


       
परवा बँकेत एक बाईहसत हसत कन्नड मध्ये सांगत होती.तिला झिरो बाल्लंस चतखाते उघडायचे होते.ती म्हणालीमी कॅर्रिंग  आहे ” ती कॅर्रिंग आहेहे मला का सागते? मला समजले नाही.नंतर तिने सांगितले तिला सरकार कडून गर्भार रहिल्याबद्दल सबसीडी मिळणारआहे.अनुदान रुपये एक हजार गर्भार रहिल्या बद्दल आणि एक हजार मुल पैदा झाल्यावर.

तिला मी सांगितले झिरो  बाल्लंस बचत खाते उघता येणार नाही.
मी तिला म्हणालो शभर रुपयेभरून खाते उघड ”.ती नवरा घेऊन आली,तो हूज्जात घालू लागला, शभर रुपये भरून खाते उघडायला तयार नव्ह्ता. त्याच्या कडे शिधावाटप कार्ड होतेमतदान कार्ड होते,पण शभर रुपये नाहीत.नंतर तो पंचायात ऑफिसात गेला,तिथून फोन आला सरकारची योजना आहे,

तिला गर्भार राहिल्या बद्दल अनुदान रुपये एक हजार मिळणार आहे.

ज्या माणसाकडे शभर रुपये नाहीत,तो मुलाचे ,संगोपन कसे 
करणार? मुल पैदा करण्यासाठी अनुदान.हिंदुस्थांत लोकशाही आहे, प्रत्येकाला संतती निर्माण करण्याचे स्वातंत्र्य आहे.ही सुविधा दोन मुले होईपर्यंत आहे.हे अनुदान खूपच कमी आहे असे नाही वाटत तुम्हाला
शंभर रुपये भरून खाते उघडण्याची वानवा तिथे,दोन हजार रुपये कुपोषण आणि बाळाची काळजी घेऊ शकेल?

आपली अर्थव्यवस्था किती विचीत्रहे.मेल्यावर सुद्धा लाकडावर केंद्र सरकार सेवा कर घेते आणि मुल पैदा करण्यासाठी सबसीडी.

रात्री पलंगावर झोपलो होतो ,झोप येत नव्ह्ती ,रात्रभर विचार येत होता, देश कुठे चालला आहे बियाणे ,कर्ज ,पेट्रोल,डीएजेल,शिक्षण सारेच अनुदानीत ! 

ह्या देशाला चालवतो कोण सबसीडी ! ! ! 

आपण सारेच संवेदनशील आहोत ,म्हणून हे तुमच्या  बरोबेर share  केले.

अजित भिडे




Saturday, 13 April 2013


साप घोडा आणि माणूस……………..

तुम्ही ज्योतिस्शाकडे जाता.तो पत्रिका पाहतो आणि तुम्हाला कालसर्पयोग सांगतो.तो नारायण नाग बळी करायला सांगतो.तो तुम्ही तो करता.

आध्यात्माचा अभ्यास करताना एका वळणावर कुंडलिनी शक्ती समजून घेण्याचा प्रयत्न करता. इंग्रजीमध्ये तिला sleeping serpent power अस म्हणतात.
तत्वज्ञानात सर्परजुउचे उदाहरण देतात.
रूढीपरंपरेमध्ये अडकलेला समाज नागपंचमीला नागाची पूजा करतो.

नाग,साप,सर्प हे शब्द आपल्या ऐकीवाचे आहेत. आपण शहरात राहतो.शहरामध्ये साप बद्दल कमी ऐकला येती.गारुडी टोपलीतून नाग काढून दाखवतो तेव्हाच त्याचे दर्शन होते.आजच्या धकाधकीच्या जीवनात सापाला पाहायला खरोखरच वेळेच कुठे आहे.पण गावामध्ये शेतात,गवताळ भागात जंगलात, खडकामध्येओसरीवर साप नजरेस पडतो.

विनोबा म्हणतात" साप सोवळा ब्राह्मण त्याला घाण अजीबात खपत नाही.चिखलात माखलेला, घाणेरडा साप  तूम्ही पहिला हे का? साप तेजस्वी ,ऐकांत प्रिय, ध्यानस्थ ऋषी.शंकराच्या गळ्यात नाग,गणपतीच्या कमरेला साप,विष्णूचा बिछाना नागांचा. आपली संस्कृती सापाला ईश्वरीय औंश मानते.

परवा पेपर मध्ये बातमी वाचली,गोन्दियामध्ये चार जणांना साप चावला आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात नेताना दोन जण मेली.योगायोगाने,सर्पदंशापासून माणसांचा जीव वाचवणारे प्रतिविष कसे बनवतात ते जाणून घेण्याचा योग आला.आज माझ्या ब्लोग वर तुमच्याशी share करतो आहे.

सापला कान नसतात,त्यामुळे तो पूगी ऐकून डोलतो हे बरोबरनाही.नाग,साप डूख धरतो अस समजणे हि बरोबर नाही, कारण सापाची स्मरणशक्ती  पूर्ण विकसीत नाही .साप हा सस्तन प्राणी नाही,तो दुध पीत नाही.सापाचा डोक्यावर मणी नसतो.
विषारी साप चावला कि रक्ताभिसरणसंस्थेवर, मज्जासंस्थेवर परिणाम होतो.मृत्यू अटळ असतो.It is fatal. मांत्रिक उपयोगाचा नसतो.Anti Snack venin, वापरावे लागते.ते प्राप्त करण्यासाठी घोडा माध्यम आहे.

घोडा शौर्याचे प्रतिक आहे पूर्वी घोड्यावरून स्वाऱ्या व्हायच्या, आता डोंगर, काश्मीर घाटी प्रदेशात घोडा, खेचर यांचा उपयोग रसद पोचवण्यासाठी होतो. सैन्यातले घोडे, रेसचे घोडे, रपेटचे घोडे, टांग्याचे घोडे वेगवेगळे असतात.

विनोबा म्हणतात" घोडा सुंदर उमदा स्वामिनिष्ठ.अरबचे घोड्यावर प्रेम असते.अडचणीत असता अरब सौदागरला घोडा विकतो. पैशाची थैली घेऊन तो तबेल्यात येतो.घोड्याच्या गंभीर प्रेमळ डोळ्याकडे त्याची नजर जाते, तो थैली फेकतो जीव गेल्या तरी घोडा विकणार’’.

नाग फुरसे मण्यार आणि घोणस यांचे विष घोड्यांना दिले जाते. ह्या immunize   झालेल्या घोड्यांच्या वजनाचा एक टक्का रक्त काढले जाते. घोड्याच्या शरीरात सर्पविशाशी मुकाबला करताना antibody  तयार होतात.रक्तातील प्लाझमा मधून नको असलेले प्रोटीन्स वेगळे केले जातात आणि liquid  form मध्ये प्रतिविष तयार होते आणि शेवटी पावडरच्या स्वरुपात रुग्णांना उपलब्ध केले जाते.

हे immunize झालेले घोडे फुत्कारात नव्हते डोळ्यातले तेज, रुबाबदारपणा हरवून बसले होते. डोळ्यात दिसत होती, हृदय हेलावणारी करुणा. हा विषय इथे संपतो .

मी कोणी सर्पमित्र नाही, प्राणीमित्र नाही. एक संवेदनशील माणूस जरूर आहे. आज फणा काढणार नाग black  cobra  नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. का तर, त्याचे विष आणि कात म्हणजे
कातडीला बाजारात खूप किंमत आहे .बस एवढेच. 


अजित भिडे




गरुड़ झेप, गरुड़ भरारी………….

अस बघा, बराच वेळेला पूर्व आयुष्यात यशस्वी ठरलेली माणसे उत्तर आयुष्यात अयशस्वी दिसतात,  केविलव्वाणी दिसतात, पराभूत वाटतात.हे अस का होत्ते ?

काहीतरी बिघड्लेले असते.बिनसलेले असते. आयुष्यात अगरक्रमांचा फेर विचार करणे गरजेच असते.मुल्यांकन बदलण्याची गरज असते.Valuation बदलण्याची गरज असते.

गरुड़ झेप, गरुड़ भरारी हा श्हब्द तुम्हाला माहित असेल.गरुड़ पक्षी आकाशात उंच उडतो. दोनही पंख पसरून उंच भरारी घेतो.जणू काही तो आकाशाला कवेत घेउन उडतो. तो जी भरारी घेतो त्याला आपण गरुड़ झेप ,गरुड़ भरारी समजतो.

पण मला वाटते गरुड़ झेपेचा खरा अर्थ वेगळाच आहे,तो मी सांगतो.पण त्या आधी काही गोष्टी समजुन घ्या.
गरुड़  पक्ष्यास साधारण सत्तर वर्षाचे आयुष असते. हया सत्तर वर्षाचे आयुष्यात, चाळीस वर्षा नंतर त्याला एक कठोर निर्णय घ्यावा लागतो. हा गरुड़पक्षी एकशेपन्नास दिवसाच्या अज्ञातवासात जातो.
Discovery िवा Animal Planet channel वर पाहीलेही असेल. ह्या चाळीस वर्षा नंतर त्याची चोच जड होते, वेगाने उडता येत नाही.त्या जड झालेल्या चोचीने, बोथट नखाने तो आपले भक्ष पकडू शकत नाही, झडप घालू शकत नाही.

तो एकशेपन्नास दिवसाच्या अज्ञातवासात  निर्जन डोंगराचा कपारीवर दगड्वर तो आपली चोच आपटतो.त्याला खूप वेदना होतात. कालांतराने जुनी चोच गळून पडते,नवी चोच येते. नव्या दणकट चोचीने तो बोथट झालेली नखे ओरबाडून काढतो. तेव्हा सुद्धा त्याला अतोनात वेदना होतात. एक हि पेन किल्लेर न घेता, तो त्या सहन करतो.त्याला माहित असते हे सारे सहन केलच पाहीजे,हालअपेष्टा सहन कारायलाच हव्यात.तेव्हाच उरलेले तीस वर्षाचे आयुष्य, तो नीट जगू शकतो.

बघा, चाळीस वर्षा नंतर आपले शरीर थकते, मानसिक थकवा येतो,अधिक काहि करु नये असे वाटते. यालाच विद्य्यकीय भाषेत Mid life crises   Hormonal changes  असे म्हणतो.
एका ठराविक वेळेनंतर, काळानंतर तुम्हाला तुमची जीवनशैली बदलायला पाहिजे.
Life style change म्हणा हवेतर! ते आवशक होते गरजेचे होते,अपरिहार्य होते.

आपला आहार,व्यायाम,छंद, जीवन्तले अग्रकमाचा फेरविचार करावा लागलो. आपले गुण कोणते, आपले दोष कोणते, कमतरता कोणत्या जाणून,आलेल्या,येणाऱ्या संधी ओळखून समभावय धोके ओळखून नवा Action Plan   ठरवणे म्हणजे ‘SWAT Analysis’
 पुढे जावून  Business process re-engineering आवशकता बनते. फेरविचार, मुल्यांकन valuation बदलण्याची गरज असते.यालाच काळा बरोबर ,वर्तमान काळा बरोबर जगणे असे म्हणतात.

स्वताचे जड झालेले विचार आणि जड झालेलेली जीवन शैली टाकून देवून मुल्यांकन बदलण्याची,गरज

असते. नाहीतर सारेच विस्कटून जाते. आपले नाते वर्तमानाशी असते.रोजच्या आयुष्यात, वर्तमानात पूर्णपणे जगणं म्हणजे ‘गरुड़ भरारी गरुड़ झेप.

 अजित  भिडे