मी मुक्त आहे ! I am free! म्हणजे I am truth! मी सत्य आहे !हळू हळू समज येईल.ती तशीच यायला हवी.या मुक्ती सन्दर्भात एक पोपटाची गोष्ट आठवली,सागतो मजेशीर ,गमतीशीर वाटली तरी आपल्या बाबतीतही असे घडू शकते ,नाही घडते सुद्धा! न समजून म्हंटलेल्या जाणीवा कश्या परिणाम शून्य ठरतात ते सांगतो.
एकदा ,एका पर्वतावर उभ्या असलेल्या आश्रमात योगायोगाने गिरीभ्रमण करणारा एक तरुण उतरला संध्याकाळची वेळ होती , त्या आश्रमाच्या दारावर एका पिंजारात पोपट होता. पिंजारा सुंदर होता आणि पोपटही ऐटदार होता. तो सारखा ओरडत होता, स्वातंत्र ! स्वातंत्र ! मुक्ति ! मुक्ति !
पोपटाच्या तोंडून हे शब्द ऐकून तो तरुण खुश झाला आश्रमाचा प्रमुख हा साधू होण्या आधी ,त्याला स्वातंत्राचा ,मुक्तीचा ध्यास होता म्हणून पोपटाला राम राम हे शब्द न शिकवता स्वातंत्र्य,स्वातंत्र्य, मुक्ती हे शिकवले.
तरुणाने ठरवले ह्याला आता मुक्त करायचच,त्याने पोपटाला पिंजारातून बाहेर काढले.पोपटाने त्याच्या हातावर चोच मारली.त्याचा हात रक्तबंबाळ झाला.त्याने पोपटाला पिंजाराबाहेर काढले आकाशात सोडून दिले. तो खूप आनंदाला आज एक आत्मा,जीव स्वतंत्र झाला ,मुक्त झाला. तो समाधानाने झोपी गेला.सकाळ झाली,पिंजरायचे दार उघडे होते ,पोपट आत ओरडत होता,
स्वातंत्र्य ! स्वातंत्र्य ! मुक्ती ! मुक्ती !
मी मुक्त आहे म्हणजे मी बंधनातीत आहे .सत्य म्हणजे मुक्ती ,सत्य कधीही लादता येत नाही ,तसेच मुक्तीचे आहे. मुक्ती हि बळजबरीने देता येत नाही ,तुम्ही या क्षणी मुक्त आहात,तुम्हीच तुम्हाला बांधले आहे.बन्ध मुक्त होणे म्हणजे कशाचीही कामना नाही ,इच्छा नाही,आग्रह नाही ,जवळीक नाही. तुम्ही तुमच्या इच्छेकडे साक्षीभावाने पहा,बंधमुक्त होणे म्हणजे स्वताःला मनोकाइक्क बंधनातून स्वताःस मोकळे करणे.
आज जरा वेगळ्या प्रकारे संवाद साधला. जाणीवा म्हणा अथवा Affirmations म्हणा ,self talk म्हणा पोपटासारखे बोलू नका .समजून म्हणा ,खूप फरक पडतो. नाहीतर सारी पोपटपंची होते .
अजित भिडे

No comments:
Post a Comment