Saturday, 5 October 2013

क्षण……


क्षण सौख्याचा, क्षण दुःखाचा,
क्षण प्रितीचा,    क्षण भीतीचा,
क्षण आनंदाचा,

क्षणा- क्षणाला, क्षणा-क्षणाचा हार गुंफला जातो आणि त्याला आपण जीवन म्हणतो.
क्षणच सारे जीवन बनून जात.

म्हणून प्रत्येक क्षण जगणे महत्वाचे आहे.खरेतर जीवनाला नाकारून नाही तर स्वीकारून जगणे मोलाचे आहे.अनेक प्रसंग येतात, त्या प्रसंगाना आपण सामोरे जातो ,काही आनंद देतात.काही गोष्ठी दुःख देतात. कधी कधी भीती त्रास देते, तणाव निर्माण करते. कोणताही प्रसंग असो .त्यात दटून राहणे म्हणजे धीरता.

परिस्थिती पासून दूर गेलात म्हणून वस्तूस्थिती बदलत नाही.जी परिस्थिती आहे तिला challenge  चुनौती म्हणून स्वीकारणे आणि त्यातून बाहेर येणे महत्वाचे आहे.

पळून प्रश्न सुटणार नाहीत, भीतीने प्रश्नाचे स्वरूप सौम्य होणार नाही. आत्महत्येने प्रश्न सुटणार नाहीत.प्रश्न तुमचे तुम्हालाच सोडवावे लागतात.उत्तर तुमची तुम्हीच शोधायची आहेत. जीवनात tailor made  उत्तर नाहीत.कारण जीवन tailor made  नाही.

नशीब, प्रारब्ध जे काही आपण मानतो ते मुळातच निराकार आहे. आपणच त्याला आकार देतो ,रूप देतो. विसरून कसे चालेल, नियती स्व:ताच निराकार आहे.

क्षण म्हणजे moment   तिला event  समजून चालेल का ?

बघा विचार करा आणि ठरवा आणि कोणताही क्षण कधी हरवू नका.
मृत्यू हा क्षण सुद्धा हरवू नका.


अजित भिडे

Friday, 20 September 2013

Dudhatji , Great Spiritual Master…….

Dudhatji , Great  Spiritual Master…….

22 Sep is the death Anniversary of Our beloved Spiritual Master M l Dudhat.

He was a very different Master. Apart from being a practicing lawyer to a sitting judge of High Court of Mumbai and heading certain commission of inquires, for most of us he was a Spiritual Master. He was associated with Brahmavidya course for about 20years.
His extempore talks on vast subject of spirituality & command over, the subject of discourse he had chosen was unique.

He had a passion for teaching Brahmavidya course. He studied this course from Swami Rammanathanji somewhere in 1980’s.and started the course in suburb of Mumbai i.e. at Chembur. He had support of a great Karmayogi late Mundleji and Dr Kshirsagarji & others. He took the course simultaneously at K C College at Churchgate, Raja shivaji vidyalaya at Dadar west and some short period at Vashi.Cross section of the society and people at large were benefited by his teachings.

Come what may he will never miss his commitment to the class and his teachings. My association with him was over more than a decade. He had good oratory & also had good memory. His voice was commendable and use to penetrate directly to ones spiritual Heart.

What I am today is product of his teachings. What so ever small knowledge I had gathered on spirituality is his gift, sort of divine grace from this selfless Serving Master. Many of us were fortunate to receive the grace of this Master and true Guru.

In the today’s era of high profile, celebrity masters and their so called followers’ one is unable to differentiate real diamond from ordinary piece of glass. He was never controversial as he was honest with his teachings and remained always with highest concept of his truth.
He was not conventional Master or Guru. And never went after creating his empire, spiritual kingdom.All the Brahmavidya Classes run by him over 20years were free of cost, unbelivable, rare things in todays world.

There was a time when I thought I am not deriving the benefit being in his company. I have seen many had better mundane graph and I was miserably failing. Out of anger I stopped attending his lectures’.
My wife understood the mental disturbance level I had. And she said to me remove the mental knot or block you are carrying, no one has stopped you,you can attend the lectures afresh,you need to correct wrong if any
within you.
I know for sure my master coneyed message throught her,she was just instrument to convey to me.  

Next Saturday I stared attending the class. All expectations dropped. No wanting, no desiring, spirituality has become so simple and things started changing, unfolding.

This master has taken Shibirs at Mahabaleshwar I just give you the list of few topics covered……………

Thought Dynamics,
Kundalini shakti...
Vigyan Bhairav Tantra,
Continuity of life in participatory universe,
Zen meditation....
Yog Vashist,
Tanta,
Ashtavakra Gita,
Is there justice in life?
Conversation with God,
Kaivalya Upanishad...
Auro Healing,
Krishna,
Mind,
Tripura Rahasya,

The list is big, essence is vast, and dimensions were very different.

He took the class of Brahmavidya to tall heights. I am sure nobody can match, it is not the respect for my Guru that speaks but fact remains it is truth by itself.

I just cover in few sentences, the topics covered in the course like
Pancha Tatvaa, Right living,
Mind, Time and Space, 
Habits, Master mind formation,
Endocrine Glands, Kundalini
Meditation, recitatations,
Formation of Universe  with big bang & or with Upanishads' version.

I do remember the word of ‘’ Dudhatji’’
                          
 'Every thought has tendency to realize.'
 'You can achieve whatever you want, 
let good knowledge come from all sides’
‘Even beggar on the street may 
have valid point never  under estimate any one.’
‘Have clarity and avoid confusion.’  


I was fortunate with his grace to conduct the classes for six years in continuity at Dadar after he moved to on a different plane; this was possible with support of you all. It was a divine experience, it transformed me, and it rejuvenated me.

last year I was transferred to Karnataka and my association with Brahmavidya classes was broken but the spiritual bond with my Guru become more intense.May be my Guru wants me to do more Sadhana, move into solitude, silence and experience which are beyond the realm of all experiences.

I owe my Guru, I shall continue to indebted to him throughout my life on this planet Earth or elsewhere or in different bodies.

This blog was posted by me last year,I am reposting the same with minor corrections as tribut to the Great Master Dhudhatji.  

Ajeet Bhide

  

Saturday, 24 August 2013

गौतमाचा अष्टांगिक मार्ग !!

गेल्या दोन ब्लोग मध्ये बुद्धाचा आर्य सत्य आणि अष्टांगिक मार्ग जो सांगत होतो ते पूर्ण करतो . दुःख मुक्त होण्यासाठी बुद्ध कोणतेही पेनकिलर देत नाही सम्यक  दृष्टी,सम्यक वाणी ,सम्यक संकल्पा बरोबर आणखी दिशा तुम्हाला देतो,मार्ग सुचवतो. एकेक समजून घेऊ.

सम्यक उपजीविका.......
बुद्ध हुषार आहे ,तो सम्यक कर्म आणि सम्यक उपजीविका  असे विभागून सांगतो. आधी उपजीविका समजून देतो .
बुद्ध म्हणतो ,कोणत्याही गोष्टींला ,व्ववसाय नका बनवू , उपजीविका नका बनवू Profession नका बनवू.धंदा व्ववसाय करायचा आहे ,पोट भरायचे आहे तर अनेक नेक मार्ग आहेत ,कुणी कसाई बनून पोट भरतो, एखादा कुंटणखाना चालवून ,कुणी स्त्री वेश्या बनून पोट भरते ,एखादा सुपारी घेऊन गेम करतो , sharp shooter, contract killing, sex worker गोंडस नाव द्या, सांगा ह्या काय उपजीविका झाल्या? हे काय पोट भरणे झाले ?
बुद्ध म्हणतो,  ह्या असम्यक उपजीविका.  एखादी सम्यक उपजीविका  शोधा. तुमची उपजीविका सम्यक असे तरच जीवनात शांती अनुभवाल . अशी उपजीविका,जी सृजनात्मक असेल. योग्य असेल .

सम्यक कर्म ….
कर्म म्हणजे जे करायचे आहे ते तेच करणे . तुमचा आतला आवाज जे सांगतो तेच करा . आपण बराच व्यर्थ गोष्ठी करत असतो ,दुसरा करतो म्हणून  आपण करतो . आज एक, उद्या वेगळे.सम्यता ठेवा ,सातत्य ठेवा.जे करायचे आहे ते फोकॅस राहून  करा. जे करायचे आहे ते ध्येयाने ,सहिष्णुतेने हृदयापासून करा ,विश्वासाने करा. कर्म म्हणजे कृती actions . उपजीविका वेगळी आणि इतर कर्म त्या पासून अलग ,म्हणून मी म्हण्टले बुद्ध हुषार आहे .

सम्यक व्यायाम …
भूवया उंच करू नका .समजून घ्या. प्रकृती  नुसार व्यायाम आवश्यक आहे.व्यायामात नुसती शारीरिक हालचाल, आसने, कावायात  नाही .व्यायामात तुमचं शरीर,मन,आहार,विहार सारे येत.म्हणून बुद्ध म्हणतो सम्यक व्यायाम.
जे करायचे आहे ते अति करू नका किवा जास्त करू नका .काहीजण उतावळे असतात,खूप धडपड करतात, काही आळशी असतात, ते  काहीच करत नाहीत आणि उतावळा  जास्त करून बसतो, बुद्ध म्हणतो शुभ संकल्पसाठी  प्रयत्नशील  म्हणजे व्यायाम समजा. मझज्म निकाय, मध्य साधा .

सम्यक स्मृती ….
स्मृती म्हणजे आठवण, मेमरी. बघा, आपण नेहमी चागल्या गोष्टी विसरतो आणि वाईट गोष्ठी लक्ष्यात ठेवतो अपमान,अवहेलना ,पराभव त्यातूनच राग ,लोभ मोह, द्वेष आपण सांभाळत  असतो . सम्यक स्मृती  म्हणजे सार्थ सांभाळणे आणि व्यर्थ विसरणे. स्वतःची ओळख, आतली चेतना विसरतो आणि कचरा गोळा करतो. Garbage in Garbage out अशी आपली गोष्ठ बनून जाते . सार्थ विसरतो, व्यर्थाचां आठव ठेवतो . तुमच्या चेतनेची स्मृती सतत जागी ठेवा .

सम्यक समाधी….
जास्त खोलात शिरत नाही. दारू ,चरस ,Brown suger, Drugs घेऊन  सुद्धा  समाधीचा अनुभव येऊ शकतो, पण ती समाधी नव्हे,असलीच तर तिला जड समाधी म्हणू . एक धुंदी अनुभवाल.माणूस गाढ  निद्रेत आहे, कोमात आहे, थोड्या काळा साठी मन बंद झाले आहे पण ते मनाच्या अतीत नाही गेल,बेहोषीत आहे. पण चुकून सुद्धा तीला समाधी समजू नका . ती शून्यावस्था नाही. मन गप्प झाले आहे ,वाणी मौन झाली आहे, अंतर्यामी बोध झाला आहे. जागे होऊन , सम्यक स्मृतीने,सजक होवून  आनंदाला प्राप्त होणे वेगळे . ती खरी समाधी .
शुन्यावस्था म्हणजेच दुःख  मुक्तावस्था.

मला वाटते बुद्धाला अभिप्रेत असलेली सम्यक समाधी म्हणजे शुन्यावस्था  ! ! !
बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यापेक्ष्या तीन ब्लोग मध्ये जे सांगितले  आहे  ते आचरणात आणणे हे अधिक प्राक्टीकॅल  नाही वाटत  का ?सोप्या भाषेत समज येईल असा प्रयत्न  केला आहे .

आज इथेच विश्रांती घेऊया.

अजित भिडे 


Sunday, 21 July 2013

गुरु पोर्णिमा ……………


गुरु तोच आहे जो पूर्ण आहे,जो पूर्णत्वाला पोहचला आहे ,जो परमात्म्याचा समीप आहे ज़ो तुम्हाला योग्य मार्गांनी घेऊन जातो त्याला गुरु म्हणतात .त्याच्या प्रती आदर व्यक्त कारणासाठी, स्मरण करण्यासाठी असलेला दिवस म्हणजे  गुरु पोर्णिमा.

आज स्वताला गुरु म्हणणारे ,समजणारे खूप आहे.अनेकांनी आपली आध्यात्मिक मालाची दुकाने उघडली आहेत.छान पैकी सजवली आहेत.स्वयंम घोषीत गुरु स्वतःच गुरु पौर्णिमेची जाहिरात देतात.अमुकअमुक फलाना गुरुचे, गुरु पौर्णिमेला lecture अशी जाहिरात वर्तमान पत्रात, चेनेलवर तूम्ही वाचता. त्याचे दर्शन घेण्यासाठी  वेगवेगळे रेटस असतात.त्यांचा शिष्य परिवार मोठा असतो असुदे.

पण आज स्थिती अशी आहे गुरूला शिष्य चालवत असतो. शिष्य गुरुचे मार्केटिंग करतो.जितके मार्केटिंग प्रभावी तितका गुरु मोठा. गुरु शिष्यावर अवलंबून असतो, तथाकथित शिष्य गुरूंचे  शोषण करत असतो.

गोरख म्हणतो गुरु लोहारासारखा,कबीर म्हणतो गुरु कुंभारासारखा, खरच शांत विचार केलात तर लक्षात येईल........

कुंभारासारखा गुरु नाहीरे जगात
वरी घालतो धपाटा आत आधाराचा हात!!

आधी तुडवी मग हाते कुरवाळी
ओल्या मातीच्या गोळ्याला येई आकृती वेगळी!!

घडे थोराघरी जाती घडे जाती राउलात
कुणी पूजेचा कलश कुणी गोरसाचा माठ!

देता आकार गुरुने ज्याची त्याला लाभे वाट
घट पावती प्रतिष्ठा गुरु राहतो अज्ञान !!

गुरु परमात्मा परेसू ऐसा ज्याचा दृढ विश्वासू तोच जाणतो कि
गुरु आतल्या चैतन्याशी म्हणजेच परमात्म्याच्या समीप आहे.

गुरूचा एक हात तुमच्या हातात, दुसरा हात परमात्म्याच्या हातात. गुरु माणूस असल्याने तो माणसाची भाष्या जाणू शकतो, शिवाय परमात्म्याची  भाष्या समजू  शकतो. तुमचे सांगणे,तुमचे मागणे ईश्वरापर्यंत पोचवतो.

गुरु द्वार आहे,गुरु दाता आहे,गुरु कडे काय मागायचे लग्न ,घर ,पैसा नोकरी ह्या सारख्या ऐहिक गोष्टी............ का , आशीर्वाद !  तुमचे तुम्ही ठरवा.

शंभर   गुरूंची  द्वारे  ठोठावाल , नव्याण्णव  खोटे  ठरतील . खरा गुरु भेटायला परमभाग्य  लागते शंभराव्हाही पारखून घ्यावा लागतो, तो  खरा असेल याचा भरोसा  कुणी द्यावा . म्हणून म्हणतो, गुरु शोधणे कठीण  गोष्ट आहे, भेटला तर सुद्वैव .

चलनात खऱ्या  नोटा असतात, तश्याच खोट्या पण असतात . खोट्या नोटा अधिक असतात . बाजारात, चलनात बनावट नोटा आधी चालतात . गुरु बाबतीतही बनावट ,भोंदू बाजारी गुरु जास्त असतात . गुरु पारखून घ्या.....

माझा तर असा सल्ल्या आहे गुरु शोधण्याच्या भानगडीत पडू नका, ग़ुरु म्हणून कोणी आदरणीय असेल तरी आहारी जाऊ नका,सुरक्षित अंतर ठेवा .

गुरु पारखून  घ्या,  तुमच्या चैतन्याशी समन्वय ठेवा ,अधिक काही करण्याची आवश्कता  नाही .

अजित भिडे


Thursday, 18 July 2013

बुद्धाचा सम्यक मार्ग ! ! !

असे म्हणतात बुद्धाची शिकवण,  थोडक्यात सर्वंमं दुक्खम, सर्वंमं क्षणीकमं ,सर्वंमं अनात्मनामं .
सर्वंमं दुक्खम साहजिक बुद्ध दुःखाबद्दल विस्ताराने बोलतो आणि त्यालाच आर्य सत्य म्हणतात .
ती मी तुम्हाला समजून दिली.जीवनात दुःख आहे,दुःखाच कारण आहे,दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग आहे ,दुःख मुक्त हि अवस्था आहे.

आर्य अष्टांगिक  मार्ग प्रज्ञा, शील ,समाधी मी सांगू लागलो ,तर हाती विशेष लागणार नाही . सोप्या रोजच्या, व्यव्हाराच्या भाषेत सागितले तरच ते लोकांपर्यंत पोहचते .नाहीतर चर्चा होते ,पांडित्य होते, intellectual  बहस होते , बोजड वाटते .

सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या चित्ताचा शोध ! आपल्या चित्ताचा शोध रोज घेत राहा .त्या द्वारेच तुम्हाला समज येईल काय चांगले,आणखी काय चांगले. जीवनाची सारी समज तुमच्या पुढे उलगडायला लागेल . तुमचे चित्त शुद्ध होत जाईल ,तुमची दृष्टी शुद्ध होत जाईल

त्या आधी बुद्ध म्हणतो वाईट करू नका ,सार्र्या पापांच न करणे . पुण्य करणे ,
तुम्हाला जे चांगले वाटते त्या दिशेने जा ,जे चांगले वाटणार नाही ,त्या दिशेला वळू नका .
सब्ब पापस्स अकरणं, कुशलस्स उपसंपदा !
सच्चित्त परियोदपनं , एतं बुद्धान सांसन  !! हेच बुद्धाचे शासन आहे ,सांगणे आहे.

बुद्ध पाली भाषेत सांगे,

अनुपवादो , कुणाची निंदा  न करणे.
अनुपघातो , कुणाची हि हानी न करणे.
पतिमोक्षात संवर ठेवण ,बुद्ध पुरुषांनी सांगितले ते स्वीकारणे.
भोजनाबद्दल  मात्रा  जाणण,म्हणजे अति न खाणे किवा उपवास करून शरीरावर अन्याय करू नका .

बुद्ध  सांगतो," अधि चित्ते च आयोगो एतं बुद्धान सासनं! " .सद् चित्त परियोदपनं.
स्वताच्या  चित्तामध्ये लीन राहा,थोडक्यात ध्यानात उतारा . 
या, माझ्या समवेत आपण आता  आर्य अष्टांगिक मार्ग समजून घेऊ.

सम्यक  दृष्टी, सम्यक  संकल्प, सम्यक वाणी,
सम्यक  कर्म,   सम्यक उपजीविका,  सम्यक  व्यायाम,
सम्यक स्मृती,  सम्यक   समाधी.

अष्टांगयोगात आणि अष्टांगिक मार्गात शेवटची पायरी नव्हे शिखर समाधी आहे  हे लक्षात असू द्यावे.
 
सम्यक दृष्टी आणि सम्यक वाणी ,आधी समजून देतो.

जे आहे तेच पाहणे ,जसे आहे तसे पाहणे.आपण बघा नेहमी जे पाहतो,त्या मध्ये आपली धारणा आणतो,विचार आणतो,कामना आणतो , वासना आणतो. आपले पाहाणे विपरीत बनते . धारणेचे मेघ, विचारांचं धुके दूर ठेऊन  जसे आहे तसे पाहणे . मोकळे होऊन पाहा . ह्याला सम्यक दृष्टी म्हणतात . मी सांगतो, सम्यक दृष्टीच ,तुम्हाला द्रष्टेपणा  देईल, द्रष्टा बनवेल .

सम्यक वाणी . जे  आहे तेच सांगणे . जसे आहे तसेच सांगणे . आपण तिखट मीठ लाऊन सांगतो किवा कमी करून सांगतो,विपरीत सांगतो. आत एक बाहेर दुसरे . मनात एक असते आणि वाणी वेगळेच बोलते . आपली वाणी ,communication खोटे असते, लबाड असते मुखवट्याचे असते . सम्यक वाणी योग्य तेच बोला, योग्य तेवढाच बोला . balance बोलणे .

सम्यक  संकल्प, नेहमी असे पाहण्यात येते की दुराग्रही माणसाला ,हट्टी माणसाला संकल्पवान  समजलं जाते. दुराग्रहात, हट्टात अहंकार आहे.आपण म्हणतो मी हे करेन,ते करेन काहीतरी मिळवण्यासाठी  माझा प्रयन्त म्हणजे संकल्प .

बुद्ध म्हणतो, " दुराग्रहाला संकल्प मानू  नका.जे करण्याजोग आहे ,तेच करायचं आहे .

त्या साठी सारे जीवनपणाला लावायचे आहे . ते कुठल्याही अहंकारामुळे अतएव नाही. ते करण्याजोग आहे म्हणून निश्चय बुद्धीने ,सम्यक म्हणजे balance साधून , तोल साधून ,मध्यम मार्गने ,अतिरेक टाळून, जो होतो तो सम्यक संकल्प".

आज इथेच थांबू, साम्यकता  साधु . पुढच्या ब्लोग मध्ये  भेटू .

दोन्ही ब्लोग परत परत वाचा , वेगऴ  समजेल ,तुमची तुम्हाला वेगळी समज येईल .

अजित भिडे
.

Saturday, 6 July 2013

चार आर्य सत्य....

गौतमने ज्या दिवशी पाहिलं मृत्यू  आहे,म्हातारपण आहे ,जीवनात दुःख आहे त्याच रात्री महाल सोडला. दुःखाच्या कारणाच्या शोधा साठी निघाला .संकल्प केला ,संघर्ष केला तपश्चर्या  केली, समर्पण केले , कर्ता विखरुन  गेला ,अहंकार गळून पडला आणि सिद्धार्थाचा बुध्द झाला . तो बुद्ध सांगतो ,"

"जीवनात दुःख आहे,
दुःखाच कारण आहे ,
दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग आहे ,
दुःख मुक्त हि अवस्था आहे
हि चार मूलभूत सत्य आहेत ".त्यालाच त्याने आर्य सत्य  म्हंटले आहे .

आज मुलभूत गोष्ठी,मुलभूत सत्य समजून घेऊ.

बुध्द म्हणतो दुःखाला  खोटे ठरवू नका ,पळ  काढू नका ,डोळे मिटून घेऊ नका. जीवनात हरघडी दुःख आहे. आपण ठरवतो कि ते नाही. ते स्वीकाराची तयारी नसते, डोळे मिटल्याने दुःख नाहीसे थोडेच होते.डोळे उघडा, कारण शोधा. दुःखाच कारण शोधता शोधता तुम्हाला जाण येते ,  दुःखाच कारण जाणलंत  तर दुःख मुक्तीचा मार्गाच हातात येईल .

पतंजली, योगः चित्तवृत्ती निरोधः! असे म्हणतात ,
तर बुध्द दुःख निरोध म्हणतो .
कैवल्य उपनिषद म्हणत, मन एवं  मनुष्याणां कारणं बन्ध मुक्तयोः!

बुध्द साध्या  ,सोप्या  भाषेत विलक्षण सांगून जातो .बुद्ध म्हणतो सुखाची गोष्टच बोलू नका , मी इतकच सांगतो  दुःख असणार नाही. पटते का तुम्हाला म्हणे दुःख असणार नाही. आपले सर्वांचे ध्येय असते सुख ,सारे आयुष्यपणाला लागलेले असते ,सुखाची गोष्टच बोलू नका ,अवघड आहे नाही.

दुःख निरोधातच सुख मिळवणाचा मार्ग आहे .दुःखच उरले नाही ,मग जे उरतो तो आनंद ,सुख नव्हे,आनंद .

जीवनातली सारी उर्जा  दुःखाकडे प्रवाहीत करण्याचे काम मनच करत असते. बुद्ध म्हणतो ,"मनापासून सावध रहा".तुम्ही हि जाणता मनच तुम्हाला गुमराह करते .मनच  वैयताग निर्माण करते, मनच मोहा पर्यंत आणून सोडते, तेच क्रोध निर्माण करते.

सुखः दुःख्ये समेकृत्वा समजून घेतलत ,
सुखःदुःख विवेकाची  चर्चा केलीत ,
स्थितप्रज्ञ  शब्दाचा  अर्थ समजून  घेतलात,
काहीहि फरक पडणार नाही.परिस्थिती आहे तशीच राहणार .

हे  जरा समजून देतो ,समजून घ्या.लोक काम बदलतात ,व्यवसाय बदलतात,गाव बदलतात,शहर बदलतात, देश बदलतात,गाडी बदलतात,कपडे बदलतात,पती -पत्नी सुद्धा बदलतात..मनाचे सूर जूळत नाहीत ह्या सदरा खाली आता आपल्याकडे हि पती -पत्नी बदल हा ट्रेन्ड आला आहे .

आता हे सारे केलेत तर ,थोडा काळ करमणूक होईल ,मजा वाटेल ,नवीन गोष्टीत मन रमेल, मनाला विरंगुळा मिळेल ,engage राहाल, व्यस्त राहाल.हा नव्याचा रंग थोडेच दिवसात उडून जाईल, मन  थांबत नाही, त्याला त्याच त्याच गोष्टींचा कंटाळा येतो,मन उदास बनते .मनच बंध निर्माण करते मनच दुःखाचे कारण आहे, पतंजली, दुःखाला केल्श म्हणतात .

पतंजली काय ,बुद्ध काय वेगवेगळ्या कालखंडातील मानसशास्त्रज्ञच!

माझी अशी समज आहे आध्यात्म हे सुद्धा वरच्या दर्जाच मानसशास्त्र,नीतिशास्त्र ह्या सदरात बसते .

बुध्द म्हणतो मुक्तीगामी आर्य अष्टांगिक मार्ग आहे ,दुःख मुक्तीसाठी आठ अंग आहेत.त्याबद्दल पुढच्या ब्लॉग मध्ये  विस्ताराने बोलेन.

अजित भिडे
 

Monday, 1 July 2013

प्रेम कविता………………. प्रेम कविता


घरी मी एकटाच होतो.पुस्तकाच्या कपाटातील पुस्तकं चाळत होतो.माझ्या आईने  M.A. ला मराठी विषय घेतला होता. आई जाऊन पण १६ वर्ष झाली.२५/३० वर्ष  धूळखात असलेले एक पुस्तक, पु.शि. रेगे यांच्या प्रेम कविता हे हातात आले.

पुस्तक सहज चाळत, असता दोन कविता वाचल्या आवडल्या एक  'गोफ '

समज सैलसा कमरेत तुझ्या ,  

                  गोफच नुसता निळा रेशमी …

स्वर्गच फसवा कमरेवरचा

                   अटळ खालची गणिन धरा मी.

 स्वर्गच फसवा अथांग वरचा

                  जेथे माझ्या वृत्ती  नटती ;

 अटळ खालची ऊन धरा ही

                 जेथे माझ्या वृत्ती   फिटती …

 नकोच तसला पुन्हा वाटे

                 क्षीतिजाचा कटिबंध  परंतू ,

 स्वर्ग, धरा मज हवी एकदम

                चंचल ,अविचल एकसंध तू .

आणि  दुसरी  कविता  'पुष्कळा'

पुष्कळ अंग तुझं , पुष्कळ  पुष्कळ मन,

पुष्कळातली  पुष्कळ तू

पुष्कळ  पुष्कळ  माझ्यासाठी,

पुष्कळ  पुष्कळ  ओठ;

बघताना किती डोळे  पुष्कळ तुझे,

देताना बाहू गळ्यात पुष्कळ  पुष्कळ,

पुष्कळ ऊर

पुष्कळाच तू  पुष्कळावंती,

पुष्कळ  पुष्कळ  पुष्कळणारी .

पुष्कळ शब्दाचे संदभ भराभर बदलून किती विलक्षण परिणाम साधणारी आगळी वेगळी प्रेम कविता.गोफ’ कवितेत  शृन्गारातला हळुवारपणा नाजूकपणे जपला आहे.वर्षा ऋतूचे आगमन झाले आहे, कविता वाचून शृन्गारात चिबभिजलो आहोत अस वाटण हेच  या कवितेचे नवेपण आहे ……

कविता मला लुभावली, म्हणून तुमच्याशी Share केली .

अजित भिडे






Friday, 28 June 2013

थोडासं हटकून, जरा हे करून पहा …


परवा  कुमटा  स्टेशनहून  ट्रेनने मुंबईला येत होतो. मडगावला ट्रेनमध्ये दोन मराठी  कुटुंबे चढली नवरा बायको आणि दोन मुले अशी सहाजण होती .ट्रेन सुरु झाली.त्यांच्या गप्पा रंगायला लागल्या .एका बाईने पर्संमधून  प्लास्टीकच्या अंगठी सारखे बोटात सहाही जणाना  घालावयास दिले.प्रत्येक जण ते छोटेसे यंत्र वापरत होते.कुतूहलापोटी मी विचारले तेव्हा त्यांनी सांगितले ‘आम्ही जप करतो आणि किती जप झाला याची गणना करतो.’

याला नामस्मरण म्हणायचे कि जप? माझ्या अध्यात्मिक साधनेत बसत नव्हते.

टेनिसन(Tennyson) नावाचा एक इंग्रजी कवी होता. Early spring आणि Break, Break, Break ह्या कविता तुम्ही वाचल्या असतील, नसतील तरीही हरकत नाही.

त्याने लिहून ठेवले आहे कि "मी जेव्हा लहान होतो तेव्हा मला लवकर झोपायला पाठवत. घरातले लोक उशिरा पर्यंत जागे असत,मुलांना मात्र लवकर झोपायला पाठवत.प्रत्येकाच्या खोल्या स्वतंत्र होत्या .

टेनिसन म्हणतो" मला लवकर झोप येत नसे. दरवाजे बंद केले असत, खोलीत अंधार असे रात्री अंधारया खोलीत मी एकटा, झोप येत नाही म्हणून बिछान्यावर पडलेला असे. कुठे काही आवाज झाला भीती वाटायची लहानपणी भुताच्या गोष्टी ऐकलेल्या असायच्या भीतीने थरकाप व्हायचा"

'माझे वडील नास्तिक होते त्यांनी मला प्रार्थना शिकवली नाही, देवाचे नाव घ्यायला शिकावले नाही, मग मी काय करणार?
घाबरून कोणाला हाक मारावी कोणी येणार नाही, हे मला माहित होते. मग मी स्वताःलाच  हाक मारायला सुरवात केली, मी म्हणू लागलो, ‘टेनिसन ,टेनिसन, टेनिसन......
मला थोडासा धीर येई मी मोकळा होई मग मला झोप लागे.बघा तुम्ही घरी एकटे आहात तुम्हाला झोप येत नाही, वाचनाची हि आवड नाही मग तुम्ही  T.V. लावता. Channel फिरवता समोर चित्र दिसतात, आवाज ऐकू येतो तुम्हाला सुरक्षित वाटू लागते टेनिसन म्हणतो" टेनिसन टेनिसन म्हणायची मला सवय लागली.कधी
कुठलाही तणाव वाटला कि टेनिसन म्हणत असे. टेनिसन हा माझा मंत्र झाला.

कोणी म्हणतात मला गुरूने अमुक एका नावाचा  जप सांगितला आहे.कोणी म्हणते मला "नाम" द्या मग मी जप सुरु करतो .


तुम्ही टेनिसनची गोष्ट ऐकलीत मी म्हणतो, तुम्ही स्वताःच्या नावाचा जप सुरु केलात तरीही खूप आहे ते ! स्वताःचे नामहि तुम्हाला परमात्म्याकडे पोचवू शकते .

दोन शब्दाच्या उच्चारामध्ये, अंतर्यामी एक स्पंद, शांतता अनुभवता येते. हळूहळू तुम्ही साक्षी होता.

जप नामस्मरण हे काही गप्पा मारताना time pass  चे साधन नाही.

अजित भिडे


Monday, 17 June 2013

सांगावेसे वाटले म्हणून .................


सांगावेसे वाटले म्हणून   ......

संकल्प  प्रत्येक जण करतो .पण अनेकांचे संकल्प हे वरवरचे असतात्त .स्वताचे अपयश झाकण्यासाठी संकल्प केलेला असेल तर त्यात प्रामाणिकपणा असतोच,असे ठामपणे म्हणता येत नाही .आमच्या कार्यालयात एक महाभाग आहे,अनेक वेळेस त्याने  प्रोमोशन साठी प्रयेत्न केला ,  परीक्षात  पास होई, मुलाखत चांगली होई ,पण माशी कुठे शिंके समजायचे नाही. गेली चार/पाच वर्ष हेच घडते , इतरानचे प्रोमोशन होते ,पण त्याचे नाव लिस्ट मधून गायब असायचे .

मग तो सांगू लागला , माझ्या प्रोमोशनची पार्टी  मी देईपर्यंत इतरांच्या प्रोमोशनत  पार्टी सहभागी होणार नाही. ह्या विचाराला त्याने संकल्पाचे गोंडस रूप देले . इतरांची सहानभूती मिळवली. इतरांनचे प्रोमोशन होते माझच का नाही, हा प्रश्न पडू शकतो, म्हणून मी  इतरांच्या  आनंदात  प्रोमोशनत  पार्टीत, मी सहभागी होणार नाही  हे काही ह्या प्रश्नाचे उत्तर बनू  शकत  नाही ? हा नसविकृती प्रकार होय ,मला वाटते  हा प्रकार दबलेल्या, कुंठीत भावनेतून होतो.

ह्याला मी तरी संकल्प म्हणणार नाही.तुमच्याही बाबतीत असे होऊ शकते तेव्हा  तुम्ही असा विचार कराल का ? प्रत्येकाला निर्णय घेण्याची मुभा आहे, पण तो मोकळेपणाने का कुंठित भावनेने निर्णय घ्यायचा तुमचे तुम्ही ठरवा.

तसेच प्रार्थने बद्दल . अनेक  माणसे मी पहिली आहेत. गणेश  उत्सवात अनेक जण लालबागच्या गणपतीला दहा /दहा  तास रांगेत उभे राहून दर्शन घेतात. नवस बोलणारांची रांग वेगळी ,दर्शनासाठी रांग वेगळी ,नवस  फेडायला आलेली वेगळ्या रांगेत .


माझ्या पहाण्यात दोन/तीन माणसे आहेत दर वर्षी रांगेत उभे राहून तोच तोच नवस ,साकडे  त्या गणेशाला घालतात आणि त्या वेठीस धरतात.देवाला लालूच नाही, लाच देवू करतात. चांदीचा मुकुट ,सोन्याचा उंदीर, सोन्याचा मोदकाची लाच , ढेर सारे पैसे देवाला अर्पून , आपण आपल्या इच्छा  पूर्ण करण्याचा वेडेपणा करतो .हे देवाकडे करू घातलेल स्पॉट फिक्सिंग.

देव एकतो हो ?  जरा  टक्केवारी तपासून पहा ,देवावर विसंबून  राहणे फायद्याचे नसले, तरीही तीच तीच चूक आपण करत असतो.
यशाचा मार्ग सातत्य ,आत्मविश्वास आणि योग्य कृती मुळे सफळ होतो. कोणाला सांगयला जावे, तर आपण वेडे ठरतो .

प्रयत्नच  न करण्या पेक्षा, प्रयन्त करून आलेल अपयश श्रेयस्कर असते. प्रयन्त सारेच करतात ,मेहनत सारेच जण घेतात तरी यश सर्वांच्याच पदरात पडतच असे नाही. प्रत्येक आव्हानातून  तुमच्यातील सुप्त शक्तीची ओळख  होते, संघर्षातून बळ  येत ,संभ्रमातून बाहेर यायला सबुरी  ठेवावी लागते .

तुम्ही निर्णय घेण्यास चालढकल केलीत तर नियतीला निर्णय घ्यावा लागतो ,ती थांबत नाही । निर्णय टाळून अपयश टाळता येत नाही . एखादि चांगली संधी मात्र हातातून निसटून जाते,हे अनेकांच्या ध्यानात शिरत नाही.

अजित भिडे

Sunday, 2 June 2013

नानकाचा नमाज..............



आज सकाळी फिरावयास गेलो होतो,स्टेशनवर एक चावीवाला दुकान मांडत होता,
मलाही एक एक्स्ट्रा चावी बनून घ्याची होती,म्हणून मी थाबलो चावीवाले बहुधा मुसलमान असतात.

चावीवाल्या बरोबर एक जण हुजत घालत होता ,"जिसे काबा   पढने नही आता, वो मुसलमान नही"
                                                           चावीवाला उसकला,"जो नमाज नहि पढता वो मुसलमान  नहि, 


     जो जुम्मेको तीन बार नमाज पढता वो हि सच्या मुसलमान ".
     चावी बनत होतीवाद गरम होत होता,
     मी ऐकत होतोत्यांना  कुठे सांगू बाबारे 
     कुराण ऐकाचे असेल तरअंतर्यामी ऐका.
     तिथूनच खरी भगवंत वाणी,नाही अल्लाचे शब्द उमटतील.

चावी बनवुन झाली, तिथून निघालो.मनात विचार आला लाख शब्द पाठ केलेत, कुराण  शेरीफ 
पाठ केलेत त्याचे काय मोल. परमात्मा कुठला विचार नाही, तर्क नाही.नमाजही कर्मकांड,सवय ,
अहंकार बनून राहिला आहे.

माझे विनोबाचे कुराण-सार पुस्तकाचे वाचन सुरु होते ,त्यामुळे ती बडबड मला अर्थ हीन वाटली. नमाज,ध्यान,प्रार्थना जे काही आहे, सगळे विचार विरहित वाहावयास हवे.

नानकाच्या जीवनतील एक घटना, प्रसंग आठवला तो सांगतो, नानक म्हणायचा," कोणी हिंदू नाही कोणी  मुसलमान नाही",

नानक एका मुसलमान नबाबाकडे उतरला होता.नबाब म्हणाला,"तुम्ही  म्हणता कोणी हिंदू नाही, कोणी मुसलमान नाहीउद्या शुक्रवार आहे, तुम्ही आमचे बरोबर  नमाज पढावा ".
नानक म्हणाला," एक अट आहे तुम्ही नमाज पढला तर मी पण पढेन".

बातमी हाहा म्हणता सगळीकडे परसली ,पाच हजाराचा गाव,आजूबाजूच्या गावातले पाच हजार.खूप मोठी भीड जमा झाली.नानक आता मुसलमान होणार हिन्दुनमध्ये चुळबुळ आणि मुसलमानान मध्ये उत्साह .आपल्या मुलाचे डोके फिरले तर नाहीकाय भानगड आहे हे जाणून घेण्यासाठी त्याचे वडील कालू मेहता हि हजार झाले .

नमाजाची वेळ झाली . मुल्ला ,नबाब,काझी आणि इतर खानदानी  मुसलमान नमाज पाढायाला बसले . गुढगे टेकले, माथा जमिनीवर ,वज्रासनाची  possition घेतली . नानक उभाच राहिला .  उभ्या, उभ्या  का कोणी नमाज पढतो ?

नमाज संपला . नबाब उसकला ,"नानक तू खोटा आहेस ,नमाज पढायचे कबूल करुन तू खोटा वागलास ,मोठा गुनाह  केलास, विश्वासघात केला आहेस" . इतर सारे जमलेले मुसलमान त्याच संतापात होते,वातावरण तापले होते.

नानक म्हणाला," हो मी कबूल  केले होते पण मी म्हणालो होतो ,तुम्ही नमाज पढलात तर मी नमाज पढेन .
तुम्ही तर नमाजा मध्ये नव्हता ,सारे मला पाहत होता,डोळे किलकिले करुन ,हळूच मन वर करून पाहत होता मी नमाज पाढतो का ते ." एकदम शांतता झाली.



"नबाबसाहेब ,मला सागा , काबूलला जावून नवा घोडा आणण्यासाठी जाण्याचा तुम्ही विचार नमाज पढत असता करत होता ,हा मुल्ला शेतात आलेंले पीक कापण्यासाठी मजुराची चिन्ता करत होता ,असा असतो नामज ? मी वाट पाहत होतो तुमचा नमाज सुरु होण्याची".                                                                    
गोष्ट खरी होती नबाबाचा उमदा घोडा नुकताच मरण पावला होता,मुल्ला कापणीची  चिंत्ता वाहत होता, नानकाचे अंतर्यामी  डोकावणे , आपला नमाज वरवर होता याची समज आली आणि नबाबाची बोलती बंद झाली.अशा गोष्टी नेहमीच्याच, रोजच्या जीवनात घडतात .प्राथॆना ,पूजा ,नमाज ,ध्यानात  मी जोपर्यंत जागा असतो तेव्हा
ते वरवरच असत ते कोरड, शुष्क असते.

नानक म्हणतो  ते  खरे आहे, कोणी हिंदू नाही कोणी  मुसलमान नाही .
तुम्ही आहात सल्लग्न विराट अस्तित्वाशी .ती तुमची खरी  ओळख .

अजित भिडे